MR/Prabhupada 0051 - सुस्त बुद्धी या शरीराच्या पलीकडे काय आहे हे समजू शकत नाही: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0051 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - C...")
 
No edit summary
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Hindi|HI/Prabhupada 0050 - पूरे वेदों की दिशा प्रवृत्ति निवृत्ति के लिए है|0050|HI/Prabhupada 0052 - भक्त्त और कर्मी में अंतर|0052}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0050 - त्यांना माहित नाही पुढचा जन्म काय आहे|0050|MR/Prabhupada 0052 - भक्त आणि कर्मी यांच्यातला फरक|0052}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<div class="center">
<div class="center">
Line 19: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|1oQZJVsaJuA|सुस्त_बुद्धी_या_शरीराच्या_पलीकडे_काय_आहे_हे_समजू_शकत_नाही <br /> - Prabhupāda 0051}}
{{youtube_right|fBtx6VHNvzM|सुस्त बुद्धी या शरीराच्या पलीकडे काय आहे हे समजू शकत नाही<br /> - Prabhupāda 0051}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->


Line 42: Line 41:
मुलाखतकार : मानवतेच्या अनुवंशिक परिपूर्णतेची खूप चर्चा चालू आहे , किंवा असे म्हणा की जनुकीय परिपूर्णतेचा प्रयत्न चालू आहे .  
मुलाखतकार : मानवतेच्या अनुवंशिक परिपूर्णतेची खूप चर्चा चालू आहे , किंवा असे म्हणा की जनुकीय परिपूर्णतेचा प्रयत्न चालू आहे .  


प्रभूपाद : अनुवंशिक काय आहे ? मुलाखतकार :
प्रभूपाद : अनुवंशिक काय आहे ?


मुलाखतकार : अच्छा .. अनुवांशिक पूर्णता काय आहे ?  
मुलाखतकार : अच्छा .. अनुवांशिक पूर्णता काय आहे ?  

Latest revision as of 04:44, 1 June 2021



Interview with Newsweek -- July 14, 1976, New York


मुलाखतकार : तूम्हाला असे वाटते का की एखाद्या दिवशी कृष्ण भावना चळवळ जगाच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचेल?

प्रभुपाद: ते शक्य नाही. हे मनुष्यातल्या सर्वात बुद्धिमान वर्गासाठी आहे. तर ही चळवळ मनुष्यातल्या सर्वात बुद्धिमान वर्गासाठी आहे.

मुलाखतकार : पण सर्वात बुद्धिमान वर्गामध्ये.

प्रभूपाद : एखादा मनुष्य बुद्धिमान वर्गात असल्याशिवाय , त्याला समजणार नाही . तर आम्ही अपेक्षा करत नाही कि सर्व जण बुद्धिमान असले पाहिजेत . कृष्ण ये भज से बडा चतुर . एखादा खूप बुद्धिमान असल्याशिवाय , तो कृष्ण भावना युक्त नाही बनू शकत .कारण हा एक वेगळ्या प्रकारचा विषय आहे . लोक देहबुद्धीत तल्लीन आहेत . हे त्या पलीकडचे आहे. म्हणूनच सुस्त बुद्धी या शरीराच्या पलीकडे काय आहे हे समजू शकत नाही. तर तुम्ही अपेक्षा नाही करू शकत कि प्रत्येक जण कृष्ण भावनेला समजू शकेल . ते शक्य नाही .

मुलाखतकार : मानवतेच्या अनुवंशिक परिपूर्णतेची खूप चर्चा चालू आहे , किंवा असे म्हणा की जनुकीय परिपूर्णतेचा प्रयत्न चालू आहे .

प्रभूपाद : अनुवंशिक काय आहे ?

मुलाखतकार : अच्छा .. अनुवांशिक पूर्णता काय आहे ?

बली मर्दन : आपण अनुवांशिकी विज्ञाना बद्दल काल चर्चा करत होतो . ते लक्षणं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत , शरीर आणि मन कसे तयार होतात आणि नंतर ते बदलण्याचा प्रयत्न करतात.

प्रभुपाद: ते आपण आधीच ... ते पुस्तक कुठे आहे ?

रामेश्वर: स्वरूप दामोदरांचे पुस्तक .

प्रभुपाद: हो . आण . रामेश्वर: तुमचा प्रश्न काय आहे ?

मुलाखतकार : माझा प्रश्न आहे ... आपण पूर्वी तांत्रिक साधने वापरण्याचा उल्लेख करीत होता, आणि जर एखादा असा समाज आहे , जिथे काही

प्रभुपाद: ते पुस्तक इथे नाही? कुठेच नाही?

मुलाखतकार : मी तुम्हाला विचारू इच्छिते . तंत्रज्ञानाच्या माध्यमाने मानवजातीत थोडी सुधारणा झाली असल्यास, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, सरासरी माणूस जास्त बुद्धीमान होतो , ज्याला आपण आता बुद्धिमान माणूस समजू शकतो ...

प्रभुपाद: बुद्धीमान मनुष्य ... जर एखादा समजू शकतो की तो हे शरीर नाही - तो शरीरात आहे ... जसे तुमच्याकडे एक शर्ट आहे , तुम्ही शर्ट नाही . कोणीही समजू शकतो आपण शर्टच्या आत आहोत . त्याचप्रमाणे, एखादा मनुष्य जो समजतो की तो हे शरीर नाही- तो शरीराच्या आत आहे ... कोणालाही समजू शकते कारण शरीर मृत झाल्यानंतर काय फरक आहे? कारण शरीराच्या आतली जिवंत शक्ती निघून गेली आहे म्हणून आम्ही शरीराला मृत घोषित करतो .

मुलाखतकार : पण काही बुद्धिमान माणसे आहेत ज्यांना अध्यात्मिक ज्ञान नाही , कदाचित असे पुरुष जे समजतात कि हे शरीर सर्वस्व किंवा ते हे शरीर नाही आहेत . शरीर मृत आहे आणि दुसरे काही अस्तित्वात आहे असे लोक आध्यात्मिक रूपात का जागरूक नाहीत?

प्रभुपाद: जर कोणी ही साधी गोष्ट समजू शकत नाही , कि तो शरीर नाही, तर तो प्राण्यांपेक्षा उत्तम नाही. ही आध्यात्मिक व्यासपीठाची पहिली समज आहे. जर तो असा विचार करतो कि तो हे शरीर आहे , तर तो प्राण्यांच्याच श्रेणीत मोडतो .

रामेश्वर:त्यांचा प्रश्न असा आहे ... समजा, एखाद्याला मृत्यूनंतर च्या जीवनावर विश्वास आहे, आणि भौतिक प्रमाणाप्रमाणे तो बुद्धिमान माणूस देखील असू शकतो. तो आपोआप का नाही ...?

प्रभुपाद: नाही. भौतिक प्रमाण म्हणजे बुद्धिमत्ता नाही. भौतिक मानक आहे कि "मी हे शरीर आहे. मी अमेरिकन आहे . मी भारतीय आहे . मी कोल्हा आहे . मी कुत्रा आहे . मी माणूस आहे . ही भौतिक समज आहे. अध्यात्मिक समज त्या पलीकडे आहे, कि मी हे शरीर नाही . आणि जेव्हा तो ही आध्यात्मिक ओळख समजण्याचा प्रयत्न करतो, तर तो बुद्धिमान आहे . अन्यथा तो बुद्धिमान नाही.

मुलाखतकार : मग याचा अर्थ असा होतो ...

प्रभुपाद: त्यांचे मूढा असे वर्णन केले आहे . मूढा म्हणजे गाढव. तर ही पहिली समज आहे की, आपण हे शरीर म्हणून आपली ओळख बनवू नये

मुलखातकार : यांच्यानंतर कोणती समज येते .. .?

प्रभुपाद: जसे कुत्रा, कुत्रा समजतो कि तो शरीर आहे . जर माणूस असे समजत असेल की तो शरीर आहे - मग तो कुत्र्यापेक्षा काही चांगला नाही.

मुलखातकार : यानंतर येणारी दुसरी कोणती समज आहे ?

बलि-मर्दन : आपण शरीर नाही आहोत हे लक्षात आल्यानंतर , पुढे काय येतं ?

प्रभुपाद : हा ! हा बुद्धिमान प्रश्न आहे. मग आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की "मी केवळ जीवनाच्या या शारीरिक संकल्पनामध्ये व्यस्त आहे. मग माझे कर्तव्य काय आहे ? " सनातन गोस्वामीची ही चौकशी आहे, की "आपण या भैतिक प्रतिबद्धतेतून मला मुक्त केले आहे. आता मला सांगा की माझे कर्तव्य काय आहे. " त्यासाठी एखाद्याला आध्यात्मिक गुरुकडे जावे लागेल , जाणून घेण्यासाठी, समजण्यासाठी , आता त्याचे काय कर्तव्य काय आहे जर मी हे शरीर नाही तर माझे काय कर्तव्य आहे ? कारण मी या शरीरासाठी दिवस आणि रात्रभर व्यस्त आहे. मी खात आहे, मी झोपत आहे , मी समागम करत आहे, मी बचाव करतो - या सर्व शारीरिक गरजा आहेत . जर मी हे शरीर नाही तर माझे कर्तव्य काय आहे ? ही बुद्धिमत्ता आहे.

रामेश्वर : तर आपण म्हणालात, "आपण हे शरीर नसल्याची जाणीव झाल्यावर पुढची गोष्ट काय आहे?" प्रभुपाद म्हणतात की पुढची गोष्ट ही आहे की आपण काय केले पाहिजे हे शोधून काढणे आणि त्यासाठी, आपण एक आत्म साक्षात्कार झालेल्या किंवा अध्यात्मिक गुरुकडून माहिती घेतली पाहिजे .

मुलखातकार : अध्यात्मिक गुरु त्याच्या पुस्तकाच्या रूपात .

बलि-मर्दन : वैयक्तिकरित्या की ...

पुष्ट कृष्ण: प्रभुपाद समजावून सांगत होते कि या देहबुद्धी मध्ये आपल्याकडे बरीच कर्तव्ये आहेत. आपण काम करत आहोत , आपल्याला संभोग जीवन उपभोगत आहोत , आपण खात आहोत, झोपणे , स्वतःचे रक्षण करणे - बऱ्याच गोष्टी. हे सर्व शरीराशी संबंधित आहे. पण जर मी हे शरीर नाही तर माझं कर्तव्य काय आहे? माझी जबाबदारी काय आहे? तर पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्याला हे समजेल तेव्हा त्याला अध्यात्मिक गुरूकडून उपदेश घ्यावा लागेल प्रगती करा आणि वास्तविक कर्तव्य काय आहे ते समजून घ्या. हे फार महत्वाचे आहे

प्रभुपाद: खाणे, झोपा, लैंगिक जीवन आणि संरक्षण यासाठीही आपल्याला शिक्षकाकडून ज्ञानाची आवश्यकता भासते . खाण्यासाठी म्हणा , आपण तज्ज्ञांकडून माहिती घेतो की आपण कोणत्या प्रकारचे अन्न घेतले पाहिजे , कोणत्या प्रकारचे व्हिटॅमिन, कशा प्रकारचे ... तर त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि झोपण्यासाठी देखील शिक्षणाची आवश्यकता आहे. तर शारीरिक संकल्पनेत एखाद्याला इतरांकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे. तर जेव्हा तो या देहबुद्धीतून वर येतो - त्याला समजते की "मी हे शरीर नाही; मी चैतन्य आत्मा आहे" - तर त्याचप्रमाणे त्याला तज्ञाकडून धडा व शिक्षण घ्यावं लागेल .