MR/Prabhupada 0063 - मी एक महान मृदंग वादक असायला पाहिजे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0063 - in all Languages Category:MI-Quotes - 1975 Category:MI-Quotes - A...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 2: Line 2:
[[Category:1080 Marathi Pages with Videos]]
[[Category:1080 Marathi Pages with Videos]]
[[Category:Prabhupada 0063 - in all Languages]]
[[Category:Prabhupada 0063 - in all Languages]]
[[Category:MI-Quotes - 1975]]
[[Category:MR-Quotes - 1975]]
[[Category:MI-Quotes - Arrival Addresses]]
[[Category:MR-Quotes - Arrival Addresses]]
[[Category:MI-Quotes - in USA, Dallas]]
[[Category:MR-Quotes - in USA, Dallas]]
[[Category:MI-Quotes - in USA]]
[[Category:MR-Quotes - in USA]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MI/Prabhupada 0062 - चौबीस घंटे कृष्ण को देखें|0062|MI/Prabhupada 0064 - सिद्धि का अर्थ है जीवन का सिद्ध होना|0064}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0062 - चौवीस तास कृष्णाला पहा|0062|MR/Prabhupada 0064 - सिद्धी म्हणजे जीवनाची परीपूर्णता|0064}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|DYG3BLh3hqE|मी एक महान मृदंग वादक असायला पाहिजे <br /> - Prabhupāda 0063}}
{{youtube_right|woeOdhQg76k|मी एक महान मृदंग वादक असायला पाहिजे <br /> - Prabhupāda 0063}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 17:53, 1 October 2020



Arrival Lecture -- Dallas, March 3, 1975


मी इकडचे वातावरण पाहून खूप आनंदी आहे . शिक्षण म्हणजे कृष्ण भावना . तेच शिक्षण आहे . जर आपण फक्त हे समजू शकलो कि "कृष्ण परम पुरुष आहे" तो महान आहे आणि आपण गौण आहोत . तर आपले कर्तव्य आहे कृष्णाची सेवा करणे " ह्या दोन ओळी जर आपण समजलो तर आपले जीवन उत्तम आहे . जर आपण फक्त शिकू शकलो कि, कृष्णाची पूजा कशी करावी ,त्याला प्रसन्न कसे करावे , त्याची वेशभूषा छानपणे कशी करावी , त्याला छान पदार्थ कसे द्यावे , त्याला अलंकार आणि फुलांनी सुशोभित कसे करावे , त्याला सन्मानार्थ आदर कसा अर्पण करावा , त्याचे नाम कसे जपावे , याप्रकारे आपण जर फक्त विचार करू शकलो , कोणत्याही तथाकथित शिक्षणाशिवाय आपण विश्वातला एक परिपूर्ण व्यक्ती बनू शकतो. हि आहे कृष्ण भावना . त्यासाठी ए बी सी डी शिकण्याची गरज नाही आहे .

त्यासाठी फक्त भावनेतला बदल गरजेचा आहे तर , जर या मुलांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच शिकवले जात असेल ... आम्हाला असेच आमच्या पालकांकडून शिकण्याची संधी मिळाली . बरेच संत व्यक्ती माझ्या वडिलांच्या घरी भेटायला यायचे . माझे वडील वैष्णव होते. ते वैष्णव होते आणि मी सुद्धा वैष्णव बनावे अशी त्यांची इच्छा होती . जेव्हा कधी संत व्यक्ती घरी यायचे तेव्हा ते त्यांना सांगायचे , "माझ्या मुलाला आशीर्वाद द्या की तो राधारांनीच सेवक बानू शकेल ." ही त्याची प्रार्थना होती. त्यांनी इतर कशासाठीही प्रार्थना केली नाही. आणि त्यांनी मला मृदंग कसे वाजवायचे ते शिकवले . माझी आई विरोधात होती. तिथे दोन शिक्षक होते - एक ए बी सी डी शिकवण्यासाठी आणि एक मृदंग शिकवण्यासाठी .

तर एक शिक्षक प्रतीक्षा करायचा आणि दुसरा शिक्षक मृदंग शिकवायचा . माझ्या आईला रागवायची "हा काय मूर्खपणा आहे ? तूम्ही मृदंग शिकवत आहेत ? तो या मुदंगा घेऊन काय करणार आहे ? पण कदाचित माझ्या वडिलांची इच्छा होती की भविष्यात मी एक महान मृदंग वादक व्हायला हवे . (हशा) म्हणूनच मी माझ्या वडिलांचा खूप ऋणी आहे, आणि मी माझं पुस्तक , कृष्ण पुस्तक , त्यांना समर्पित केले आहे. त्यांना ते हवं होतं . त्यांची इच्छा होती कि मी भागवत , श्रीमद भागवतं चा उपदेशक बनावं . आणि मृदंग वादक आणि राधाराणीचा सेवक बनावं तर प्रत्येक पालकाने असा विचार करायला हवा; अन्यथा कोणी आई आणि वडील होऊ नये. हा शास्त्रामध्ये दिलेला आदेश आहे. हे श्रीमद- भागवतम् मध्ये नमूद केले आहे , पाचवा अध्याय

पिता न स स्याज जननी न स स्याद गुरुर न स स्यात् स्व-जनो न स स्यात् (श्री भा ५।५।१८ )

अशाप्रकारे निष्कर्ष निघतो कि , न मोचयेद य: समुपेत-मृत्युम (श्री भा ५।५।१८ ) जर एखादा आपल्या शिष्याला वाचवू शकत नाही येणाऱ्या मृत्यूच्या धोक्यापासून , तर त्याने गुरू बनू नये. ते तसे करू शकत नसल्यास , एखाद्याने आई किंवा वडील बनू नये. अशाप्रकारे, तो मित्र नाही, नातेवाईक नाही, वडील नाही ..., जर एखादा त्याच्या दुसर्या पक्षाला , मृत्यूच्या तावडीतून कसे निघावे याचे शिकवण देऊ शकत नाही तर या शिक्षणाची संपूर्ण जगभरात गरज आहे. आणि साधी गोष्ट म्हणजे एखादा टाळू शकतो जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि रोग यांचे चक्र , फक्त कृष्ण भावनायुक्त होऊन .