MR/Prabhupada 0064 - सिद्धी म्हणजे जीवनाची परीपूर्णता

Revision as of 15:25, 6 December 2017 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0064 - in all Languages Category:MI-Quotes - 1975 Category:MI-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 6.1.15 -- Denver, June 28, 1975


केचीत चा अर्थ आहे " एखादा " "खूप दुर्लभ" । "एखादा " म्हणजे "खूप दुर्लभ" वासुदेव-परायना: बनणे इतके सोपे नाही . काल मी समजवले की भगवंत , कृष्ण म्हणतात ,

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेति तत्वत: , मनुष्याणां सहस्रेशु कश्चिद्यतति सिद्धये : (भ गी ७।३ ) ।

सिद्धी म्हणजे जीवनाची परीपूर्णता . साधारणपणे ते योग-पद्धतीच्या अष्ट सिद्ध मध्ये येतात . अणिमा ,लघिमा, महिमा, प्राप्ति, सिद्धि, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य. तर यांना म्हणतात सिद्धी , योग्य सिद्धी . योग्य सिद्धी म्हणजे तुम्ही अति सूक्ष्म आकार घेऊ शकता . आपला वास्तविक आकार खूप सूक्ष्म आहे . तर योग सिध्दीने , हे भौतिक शरीर असताना देखील , एखादा योगी लहान आकारात येऊ शकतो . आणि तुम्ही त्याला कुठेही बंद करून ठेवा , तो बाहेर येईल. याला म्हणतात अणिमा सिद्धी . त्याचप्रमाणे , महिमा सिद्धी , गरिमा सिद्धी आहे . तो कापसाच्या पट्टीपेक्षाही हलका होऊ शकतो. योगी ते इतके हलके होऊ शकतात .

भारतात अजूनही असे योगी आहेत . हो , माझ्या बालपणी मी काही योगी पाहिले आहेत , ते माझ्या वडिलांकडे यायचे . तर तो म्हणाला की तो अगदी काही सेकंदांतच कुठेही जाऊ शकतो. आणि कधी कधी ते पहाटे , जगन्नाथ पुरी वरून रामेश्वरम् आणि तिथून हरिद्वारला जायचे . आणि गंगा आणि इतर नद्यांमध्ये आंघोळ करायचे . याला म्हणतात लघिमा-सिद्धी . तुम्ही खूप हलके बनता . ते असे म्हणत असत की "आम्ही आमच्या गुरुंजवळ बसलो आहोत आणि फक्त स्पर्श करत आहोत . आम्ही येथे बसलो आहोत, आणि काही सेकंदांनंतर आम्ही एका वेगळ्या ठिकाणी बसू . " याला म्हणतात लघिमा-सिद्धि . तर अशा अनेक योग-सिद्धी आहेत. लोक या योग सिद्धीला पाहून खूप गोंधळून जातात. पण कृष्ण सांगतो , " यततामपि सिद्धानां : (भ गी ७।३ ) "अशा अनेक सिध्दांपैकी , ज्यांना योग सिद्धी मिळाली आहे,"

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेति तत्वत: (भ गी ७।३ ) , एखादाच मला जाणू शकतो . "

तर एखादा काही योग-सिद्धी मिळवू शकतो , तरीही कृष्णाला समजू शकत नाही . ते शक्य नाही . कृष्णाला फक्त अशा व्यक्ती समजू शकतात ज्यांनी आपले सर्वस्व कृष्णाला अर्पण केले आहे . म्हणून कृष्णाची ती इच्छा किंवा मागणी आहे ,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं (भ गी १८।६६ )

कृष्णाला केवळ त्याचे शुद्ध भक्तच समजू शकतात , इतर कोणीही नाही.