MR/Prabhupada 0087 - भौतिक प्रकृतीचे नियम

Revision as of 09:07, 30 March 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0087 - in all Languages Category:MR-Quotes - 1970 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Sri Isopanisad Invocation Lecture -- Los Angeles, April 28, 1970


होय. या भौतिक जगातले सर्व काही, त्याला एक निश्चित वेळ आहे. आणि त्या ठराविक वेळेत सहा प्रकारचे बदल होतात. प्रथम जन्म, नंतर वाढ, नंतर वास्तव्य , नंतर उत्पादन नंतर कमी होत जाणे, नंतर नष्ट होणे. हा भौतिक निसर्गाचा नियम आहे. हे फुल एका अंकुराप्रमाणे जन्माला येते , मग वाढते , नंतर दोन, तीन दिवस टिकते, नंतर ते एक बीज उत्पन्न करते, उत्पादन करून मग हळूहळू सुकत जाते , आणि मग नाश पावते . (बाजूला) तू असे बस. तर याला 'सद् -विकार' म्हणतात, सहा प्रकारचे बदल .

तर आपण आपल्या तथाकथित भौतिक विज्ञानाने हे थांबवू शकत नाही. नाही. ही अविद्या आहे. लोक स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि काहीवेळा मूर्खपणे बोलत आहेत की वैज्ञानिक ज्ञानामुळे माणूस अमर होईल. रशियन असे म्हणतात. तर हे अविद्या, अज्ञान आहे. आपण भौतिक कायद्यांची प्रक्रिया थांबवू शकत नाही . म्हणूनच भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की,

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४)


भौतिक निसर्गाची प्रक्रिया, जी तीन गुणांनी बनलेली आहे - सत्व-गुण , रजो-गुण, तमो-गुण... त्रि-गुण. गुणाचा आणखी एक अर्थ म्हणजे दोर . जसे आपण दोर पाहिला असेल , ते तीन प्रक्रियेमध्ये वळलेले असतात . सर्वप्रथम पातळ दोरा , मग त्यातळे तीन,मग ते गुंडाळले जातात , मग पुन्हा तीन वळले जातात . आणि पुन्हा तीन. तो खूप मजबूत जोड होतो . तर हे तीन गुण, सत्त्व, रज, तमो-गुण , ते एकत्र होतात. पुन्हा ते काही उप-उत्पादन करतात, पुन्हा मिसळून पुन्हा एकत्र येतात .


अशाप्रकारे एक्याऐंशी वेळा ते वळवले जातात. तर गुणमयी माया, तुम्हाला अधिक आणि अधिक बांधत जाते .. त्यामुळे तुम्ही या भौतिक विश्वाच्या बंधनातून बाहेर पडू शकत नाही. बंधनकारक म्हणूनच त्याला 'अपवर्ग' म्हणतात. कृष्ण भावनामृताची हि प्रक्रिया म्हणजे पवर्ग प्रक्रिया रद्दबातल करणे. काल मी हे पवर्ग म्हणजे काय ते गर्गमुनींना समजावून सांगत होतो . या पवर्ग चा अर्थ असा आहे की वर्णमालेतली प ची ओळ . ज्यांनी या देवनागरीचा अभ्यास केला आहे, त्यांना माहिती आहे देवनागरी वर्णमाला आहेत, क ख ग घ न च छ ज झ ण . अशा प्रकारे पाच गट , एक ओळ. मग येतो पाचवा गट , प फ ब भ म . तर हे प्रवर्ग म्हणजे प . सर्वप्रथम प. प म्हणजे परव , पराभूत .


प्रत्येकजण प्रयत्न करत आहे, जगण्यासाठी धडपड करत आहे , पण शेवटी पराभूत. प्रथम पवर्ग. प म्हणजे परव. आणि मग फ . फ म्हणजे फेस. घोड्याप्रमाणे, अतिशय कष्टाने काम करताना, त्याच्या तोंडातून फेस बाहेर येताना आढळेल, कधीकधी, जेव्हा आपण खूप थकतो फार कठोर परिश्रम घेतल्याने जीभ कोरडी होते आणि काही फेस बाहेर येतो. तर प्रत्येकजण इंद्रिय संतुष्टीसाठी खूप कठोर परिश्रम घेत आहेत, परंतु पराभूत होत आहे . प फ आणि ब . ब म्हणजे बंधन . तर प्रथम प , द्वितीय फ , मग तृतीय बंधन . मग ब भ . भ म्हणजे लढणे , भय . नंतर म . म म्हणजे मृत्यू किंवा मरण . तर हि कृष्ण भावनामृत प्रक्रिया म्हणजे अपवर्ग आहे . अप . अ म्हणजे अभाव . पवर्ग . हि भौतिक जगाची लक्षणे आहेत , आणि जेव्हा तुम्ही अ हा शब्द जोडता , अपवर्ग , त्याचा अर्थ रद्द करणे .