MR/Prabhupada 0105 - हे विज्ञान गुरु शिष्य परंपरेने समजेल

Revision as of 09:04, 19 February 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0105 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 18.67 -- Ahmedabad, December 10, 1972

भक्त: श्रीला प्रभुपाद, कोणीतरी प्रश्न विचारत आहे की : "तुमच्या मागून हे आंदोलन कोण पुढे चालवेल?

प्रभुपाद : ज्यांनी मला विचारलं, तेच पुढे चालवतील. (हशा)

भारतीय माणूस (५): मी माझ्या भक्तांना तुमच्या योजना पुढे चालवायला सांगू शकतो, श्रीला भक्तिवेदांत प्रभुनंतर, हे आंदोलन पुढे रेटायला. ही परंपरा पुढे न्यायला,ही परंपरा पुढे चालू ठेवायला: हरे कृष्णा, हरे कृष्णा.

प्रभुपाद : ते भगवद-गीते मध्ये सांगितले आहे.

इमं विवस्वते योगं
प्रोक्तवान् अहम् अव्ययम्
विवस्वान् मनवे प्राह
मनुर् इक्ष्वाकवे ऽब्रवीत् (भ गी ४. १)

सगळ्यात पहिल्यांदा,कृष्णाने भगवंताविषयीचे हे विज्ञान सूर्यदेवाला, आणि सूर्यदेव विवस्वानाने ते विज्ञान आपला मुलगा मनूला सांगितले. आणि मनूने ते विज्ञान आपला मुलगा इक्ष्वाकुला सांगितले.

एवं परम्परा-प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः (भ गी ४.२)

म्हणून हे विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे समजुन घेतले पाहिजे. जसे आपण माझ्या गुरुमहाराजांकडून हे विज्ञान समजून घेतले. जर माझ्या शिष्यानंपैकी कोणी हे विज्ञान समजुन घेतले, तर तो ही परंपरा पुढे चालू ठेवेल. ही खरी पद्धत आहे. ह्यात नवीन काही नाही. ही जुनीच बाब आहे. फक्त आपण त्याचा प्रसार योग्य प्रकारे केला पाहिजे. कारण आपण आधीच्या आचार्यांकडून ऐकल आहे. म्हणून भगवद -गीतेत अशी शिफारस केली आहे की: आचार्य उपासनं; " त्याने आचार्यांची शिकवण स्वीकारली पाहिजे. "आचार्यवान पुरुषो वेद". फक्त तर्क करण्यापेक्षा,तथाकथित शिष्यवृत्तीने, हे शक्य नाही. आचार्यांची शिकवण सीकरल्याशिवाय, हे शक्य नाही. आचार्य परंपरेद्वारे आलेला असतो,गुरुशिष्य परंपरा. म्हणून कृष्णाने शिफारस केली आहे की,

तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया। (भ गी ४.३४)

आध्यात्मिक गुरुंना शरण जाऊन,त्त्यांच्याकडून हे तत्व जाणले पाहिजे." ही सम्पूर्ण बाब आध्यात्मिक गुरुंना शरण जाण्यावर अवलंबुन आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते . शरण जाण्याची प्रकिया,कृष्णाला समजणे हे , किती प्रमाणात शरण गेलात ह्यावर अवलंबून आहे. जर आपण पूर्ण शरणागत असलो,तर आपण भगवान कृष्णांना समजु शकू. जर आपण पूर्णपणे शरणागत नसलो, तर कृष्णाला अंशता समजु शकू. ये यथा मां प्रपद्यन्ते .हे शरण जाण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे. जो पूर्णपणे शरण गेला आहे,तो हे तत्त्वज्ञान समजु शकेल. आणि तो कृष्ण कृपेने, प्रचार करु शकेल.