MR/Prabhupada 0106 - भक्ती - कृष्णापर्यंत पोहोचण्याचा जलद मार्ग

Revision as of 09:09, 19 February 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0106 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 18.67 -- Ahmedabad, December 10, 1972


मम वर्त्मानुवर्तन्ते म्हणजे, जसे सगळ्यात उंच, जसे अमेरिकेत खूप मोठया गगनचुंबी इमारती आहेत. एकशे पाच माजली. मला वाटत ती सगळ्यात नवीन बांधलेली आहे. जर तुम्हाला सगळ्यात वरच्या मजल्यावर जायचं असेल तर तिथे जिना आहे प्रत्येकजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणी दहा पायऱ्या चढला, दुसरा पन्नास चढला. आणखी कोणी शंभर चढला.

पण समजा, दोन हजार पायऱ्या.तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. जिना एकच आहे.मम वर्त्मानुवर्तन्ते कारण सगळ्यात वरच्या मजल्यावर जायचे हेच प्रत्येकाचे ध्येय आहे. पण ज्यांनी दहा पायऱ्या चढल्या, ते ज्यांनी पन्नास पायऱ्या चढल्या त्याच्यापेक्षा मागे राहतील. आणि जे पन्नास पायऱ्या चढले, ते शंभर पायऱ्या चढले त्यांच्या मागे राहतील. तसेच,वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण सगळ्याच पद्धती सारख्या नाहीत. त्या सगळ्यांचे एकच लक्ष आहे, कर्म,ज्ञान,योग,भक्ती,पण कारण जेंव्हा तुम्ही भक्तीच्या स्तरापर्यंत येता. तेव्हा तुम्ही श्रीकृष्णांना जाणू शकता. कर्म,ज्ञान,योगमार्गाने ते शक्य नाही. तुम्ही प्रयत्न करताय ,तुम्ही त्या मार्गाने जात आहेत. पण भगवान कृष्ण सांगतात,

भक्त्या मामभिजानाती (भ गी १८|५५)

त्यांनी असं सांगितलेलं नाही,"ज्ञानमार्गाने,कर्ममार्गाने,योगमार्गाने." नाही. तुम्हाला ते समजणार नाही, तुम्ही आणखी एक पायरी वर जाता. पण जर तुम्हाला श्रीकृष्णांना जाणायच असेल,तर भक्ती.

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वत: (भ गी १८|५५)

हिच खरी पद्धत आहे. म्हणूनच मम वर्त्मानुवर्तन्ते म्हणजे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार प्रत्येकजण माझ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्याला खरोखरच मला जाणायचे आहे, सोपी पद्धत...." जसे पायऱ्या आहेत,पण ह्या देशात नाही,युरोप आणि अमेरिकी देशात, तेथे बाजूला लिफ्ट आहे,उद्वाहक सगळ्यात वरच्या मजल्यावर पायऱ्यांनी जाण्यापेक्षा,तुम्ही उद्वाहकाच्या मदतीने जाऊ शकता. तुम्ही लगेच पोहचू शकता, एका सेकंदात. म्हणून जर तुम्ही उद्वाहकाच्या मार्गाने भक्तीमार्ग अवलंबलात, तर तुम्ही त्वरित भगवंतांच्या संपर्कात येता पायऱ्या चढून जाण्यापेक्षा. तुम्ही का घेता? म्हणून भगवान कृष्ण सांगतात,

सर्वधर्माप्नरित्यज्य मामेकं शरणं व्रज: (भ गी १८|६६)

"तु केवळ मला मला शरणं ये. तुला इतर काही करायची गरज नाही. एक एक पायरी चढून जायची मेहनत तु कशाला करतोस?