MR/Prabhupada 0109 - आम्ही कोण्याही आळशी माणसाला परवानगी देत नाही

Revision as of 09:47, 19 February 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0109 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.7.24 -- Vrndavana, September 21, 1976


तू तुझे कर्तव्य नीट निभावतो आहेस. आपला धर्म म्हणजे आपले व्यावसायिक कर्तव्य. समजा तू अभियंता आहेस. तू तुझे कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत आहेस किंवा वैद्यकीय क्षेत्रातला माणूस असो किंवा व्यावसायिक माणूस असो किंवा कोणीही-सगळ्याजणांना काहीतरी केले पाहिजे. तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन नुसते रिकामे बसून मिळणार नाही. जरी तुम्ही सिंह असलात तरी तुम्हाला काम केले पाहिजे. न हि सुप्तस्य सिंम्ह्स्य प्रविशन्ति मुखे मृग: हे.... भौतिक जग हे असच असत. जरी तुम्ही सिंहासारखे ताकदवान असलात,तरी तुम्ही नुसते झोपून राहू शकत नाही. जर तुम्ही विचार करत असाल,"मी सिंह आहे,मी जंगलाचा राजा." मी झोपून रहातो, आणि प्राणी येतील आणि माझ्या तोंडात जातील. नाही,ते शक्य नाही. जरी तुम्ही प्राणी असाल, तुम्हाला दुसऱ्या प्राण्याला पकडायला लागणार. तेव्हाच तुम्ही खाऊ शकाल. नाहीतर तुम्हाला उपाशी रहावं लागेल. म्हणून कृष्णाने सांगितलंय,नियतम कुरु कर्म त्वम कर्म ज्यायो ह्यअकर्मण: "तुला तुझं कर्तव्य पार पडलं पाहिजे."

शरीर-यत्रापि च ते ना प्रसिध्येद् अकर्मण: असा विचार करु नका... दुष्ट सांगतात की "कृष्णभावनामृत संघ लोकांना निसटायला शिकवतात. ते बनले आहेत... " नाही,असा सल्ला कृष्णाने दिलेला नाही. आम्ही कोणत्याही आळशी माणसाला परवानगी देत नाही. तो व्यस्त असला पाहिजे. ही खरी कृष्णभावनामृत चळवळ. ती कृष्णाची आज्ञा आहे.नियतम कुरु कर्म. अर्जुन युद्धाला नकार देत होता. तो अहिंसक सभ्य माणूस बनण्याचा प्रयत्न करत होता. कृष्णाने त्याला परवानगी दिली नाही. "नाही,नाही,तू ते करु नकोस.ती तुझ्यातील कमतरता आहे. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्: तुम्ही स्वतःला दुष्ट सिद्ध करता.हे आहे अनार्यजुष्टम ह्या प्रकारचा प्रस्ताव अनार्यांसाठी आहे.असभ्य माणूस. ते करु नकोस." ते कृष्णाचे... म्हणून असा विचार करु नका कृष्णभावनामृत संघ,जे कोणी कृष्णभावनामृत, ते आळशी बनतील आणि हरिदास ठाकुरांची नक्कल करतील. त्याला कृष्णभावनामृत म्हणत नाहीत.

कृष्णभावनामृत म्हणजे, कृष्णांनी ज्या सूचना दिल्या आहेत,तुम्ही सतत खुप व्यस्त राहिले पाहिजे, चोवीस तास. ते आहे कृष्णभावनामृत.नाही की आळशी माणूस बनणे,जेवा आणि झोपा,नाही. ह्याला म्हणतात धर्मस्य ग्लानी:. पण तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ह्या भौतिक जीवनात तुमचं ध्येय इंद्रिय तृप्ती कशी करु हे असत. आणि कृष्णभावना म्हणजे तुम्ही त्याच भावनेने काम केले पाहिजे. त्याच जोमाने, पण तुम्ही स्वतःची इंद्रिय तृप्ती नकरता कृष्णाला संतुष्ट केलं पाहिजे. त्याला अध्यात्मिक जीवन म्हणतात. असे नाही की आळशी बनणे. फरक असा, की लेखक,कृष्णदासांनी सांगितलंय,

आत्मेन्द्रिय-प्रीती-वांछा तारे बली 'काम' (चै च आदि ४।१६५)

काम म्हणजे काय? काम म्हणजे जेव्हा आपण आपल्या स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा करतो. त्याला काम म्हणतात. कृष्णेन्द्रिय-प्रीती-इच्छा धरे 'प्रेम' नाम. आणि प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे जेव्हा आपण कृष्णाची इंद्रिय तृप्त करण्यात गुंतलेले राहतो. . गोपी सर्वश्रेष्ठ भक्त का आहेत? कारण त्या फक्त कृष्णाची इंद्रिय तृप्त करण्याचा प्रयत्न करत. म्हणून चैतन्य महाप्रभु शिफारस करतात,रम्या काचीद उपासना व्रज-वर्गेन या कल्पिता. त्यांना इतर कशात रस नव्हता. वृन्दावन म्हणजे,जे वृन्दावनमध्ये आहेत... प्रत्यक्षात जर कोणाला वृन्दावनमध्ये राहायचे असेल, तर त्यांनी फक्त कृष्णाची इंद्रिये संतुष्ट करण्याचा विचार केला पाहिजे. त्याला वृन्दावन म्हणतात. असे नाही की "मी वृन्दावनमध्ये राहीन आणि माझी इंद्रिये संतुष्ट करीन." त्याला वृन्दावन-वासी. म्हणत नाहीत.

अशा प्रकारचे जगणे म्हणजे... तिथे अनेक माकडं,कुत्रे आणि डुक्करं आहेत; ते सुध्दा वृन्दावनमध्ये आहेत. तुम्हाला असं म्हणायचंय का ते पण वृन्दावनमध्ये राहतात? नाही. ज्यांना वृन्दावनमध्ये स्वतःची इंद्रिय तृप्त करायची आहेत, त्याचा पुढील जन्म कुत्र्याचा,डुक्कराचा,आणि माकडाचा असेल. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणून कोणीही वृन्दावनमध्ये इंद्रिय तृप्ती करण्याचा विचार करु नये. ते सगळ्यात मोठे पाप आहे. फक्त कृष्णाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.