MR/Prabhupada 0136 - गुरु परंपरेद्वारे ज्ञान पुढच्या पिढी पर्यंत पोहोचते

Revision as of 12:01, 17 April 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0136 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture with Translator -- Sanand, December 25, 1975


तर पूर्ण पुरुषोत्तम म्हणजे भगवान. परम सत्य तीन अवस्थांद्वारे जाणता येते; ब्रम्हेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते (श्रीमद्-भागवत १.२.११) सुरवातीला परम सत्याचा साक्षात्कार ब्रह्मजोतीच्या रूपात होतो. जे ज्ञानींचे उद्दिष्ट आहे. आणि त्यानंतर परमात्मा, जे योगींच उद्दिष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी भगवान, परम सत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार होतो. अंतिम उद्दिष्ट भगवंतांपर्यंत पोचणे हे आहे. जसे आपण सूर्यगोलाचे स्वरूप जणू शकतो. तिथे सर्वश्रेष्ठ व्यक्ती सूर्यनारायण आहे. किंवा सूर्यगोलातील मुख्य व्यक्ती. भगवद् गीतेत त्यांचं नाव सांगितलं आहे. -विवस्वान. चौथ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, इमं विवस्वते योगं प्रोत्त्कवानहमव्ययम् (भ गी ४।१))

"मी सर्व प्रथम भगवद् गीतेतील विज्ञान, योगविद्येचा उपदेश सूर्यदेव,विवस्वानाला सांगितला." विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेSब्रवीत् आणि विवस्वान सूर्यदेवांनी तो उपदेश मनूला केला, आणि मनूने तो उपदेश आपल्या मुलाला केला. अशा रीतीने गुरु परंपरेद्वारे ज्ञान पुढच्या पिढी पर्यंत पोचत, तर आपण ज्ञानाबद्दल बोलतो,ते व्यक्तीकडूनच शिकलं पाहिजे. तर भगवान,परम सत्य जाणण्याचा अंतिम शब्द. भगवद् गीतेत त्यानी सांगितलंय. तर व्यासदेव स्पष्टपणे ह्याचा उल्लेख करतात, भगवान उवाच. ते कृष्ण उवाच म्हणत नाहीत,कारण कधीकधी मुर्ख कृष्ण नावाचा गैरसमज करून घेतात. तर भगवान उवाच, हा शब्द, म्हणजे त्यांनी जेकाही सांगितलंय,त्यात काही दोष किंवा कमतरता नाही. आपल्या सारख्या सामान्य माणसात चार दोष असतात:भ्रम, प्रमाद, विप्रलीप्सा,कर-नापातव तर भगवान श्रीकृष्ण किंवा आत्मसाक्षात्कारी माणूस. श्रीकृष्णांचे सेवक, ज्यांनी श्रीकृष्णांना जाणले आहे. त्यांच्यासाठी कसलीही कमतरता नाही.ते परिपूर्ण आहेत. . ह्या कारणासाठी श्रीकृष्ण उपदेश देतात.

तद् विद्धी प्रनिपतेन
परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षन्ति तद् ज्ञानम्
ज्ञानिनस् तत्व दर्षिन:  :(भ गी ४।३४)


ज्यांनी सत्य वास्तवात पाहिले किंवा जाणले आहे,त्याच्याकडून ज्ञान मिळवले पाहिजे. तर आपण अश्या व्यक्तींकडे गेले पाहिजे. नाहीतर,जर आपण स्वतःची मते मांडणाऱ्याकडे गेलो, तर आपण वास्तविक ज्ञान मिळवू शकत नाही. तर जे स्वतःची मत मांडणारी असतात,ती भगवंतांना जाणू शकत नाहीत. म्हणूनच ते चुका करतात, "भगवंत असे आहेत," "भगवंत तसे आहेत," "ईश्वर अस्तित्वात नाहीत," "ते निराकार आहे." या सर्व मूर्ख गोष्टी प्रस्तावित करतात, कारण अपूर्ण असतात. म्हणून भगवंत सांगतात,

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् (भ गी ९।११)

कारण ते आपल्या फायद्यासाठी मानव सदृश रूपात अवतीर्ण होतात. मूर्ख आणि दुष्ट व्यक्तीच त्यांना साधारण मानव समजतात. जर भगवंत सांगतात,

अहं बीजप्रदः पिता (भ गी १४।४)

मी बीज प्रदान करणारा पिता आहे. तर आपण, आपल्यापैकी प्रत्येक जण,आपल्याला माहित असत की आपले वडील एक व्यक्ती आहेत. त्यांचे वडीलही एक व्यक्तीआहेत. आणि सर्वश्रेष्ठ व्यक्ती किंवा सर्वश्रेष्ठ पिता ते निराकार कसे असतील? का? आणि म्हणून आपण भगवंतांकडून शिकलं पाहिजे, सर्वश्रेष्ठ व्यक्ती,परिपूर्ण ज्ञान. म्हणून भगवद् गीता हे पूर्णपुरुषोत्तम भगवंतांकडून मिळालेले परिपूर्ण ज्ञान आहे आपण भगवद् गीतेतील एकही शब्द बदलू शकत नाही. ती मूर्खता होईल. तर आपली कृष्णभावनामृत चळवळ हे तत्व पाळत आहे. आम्ही कोणत्याही स्वतःच्या गोष्टी निर्माण करत नाही. आम्ही फक्त भगवंतांचा संदेश वितरित करीत आहोत. आणि हे प्रत्यक्ष व्यवहारात प्रभावी होत आहे.