MR/Prabhupada 0169 - श्रीकृष्णांना पाहायला अडचण कुठे आहे

Revision as of 04:53, 27 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0169 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 4.24 -- August 4, 1976, New Mayapur (Marathi farm)


योगेश्वर: त्यांनी आत्ता सांगितलं, कारण आपण आजून श्रीकृष्णांना भगवंत म्हणून प्रत्यक्ष बघायला तेवढे प्रगत नाही आपण त्यांचे चिंतन कसे करावे?

प्रभुपाद: तू देवळात श्रीकृष्णांना बघत नाहीस ? (हशा) आम्ही संदिग्ध गोष्टीची पूजा करत आहोत? तुम्ही श्रीकृष्णांना पाहिलं पाहिजे जसे श्रीकृष्णांनी सांगितलंय सध्याच्या क्षणी... ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी सांगितलंय

रसोSहमप्सु कौन्तेय (भगवद् गीता ७.८). श्रीकृष्ण सांगतात "मी पाण्यातील चव आहे." तुम्ही श्रीकृष्णांना पाण्यातल्या चवीत पहा. ते तुम्हाला प्रगत बनवेल. विविध टप्प्यानुसार... श्रीकृष्ण सांगतात "मी पाण्यातील चव आहे." तर जेव्हा तुम्ही पाणी पिता,तुम्ही श्रीकृष्णांना का बघत नाही. "अरे,ही चव श्रीकृष्ण आहेत. रसोSहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: जेव्हा तुम्ही सूर्य प्रकाश,चंद्र प्रकाश पहाता. श्रीकृष्ण सांगतात "मी सूर्य प्रकाश आहे, मी चंद्र प्रकाश आहे." तर जेव्हा तुम्ही सकाळी सूर्य प्रकाश बघता, तुम्ही श्रीकृष्णांना बघता. रात्री जेव्हा तुम्ही चंद्र प्रकाश बघता, तुम्ही श्रीकृष्णांना बघता. प्रणवः सर्ववेदेषु. कुठलाही वैदिक मंत्र तुम्ही म्हणतलातः ओम तत् विष्णू पर,हा ओंकार म्हणजे श्रीकृष्ण. "पौरुषं विष्णू" आणि कोणीही कुठलीही असामान्य केलीली गोष्ट ती श्रीकृष्ण आहेत. तर तुम्ही या प्रकारे श्रीकृष्णांना पहिले पाहिजे. नंतर, हळूहळू, तुम्हाला दिसेल, श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करतील, तुम्हाला दिसेल. पण पाण्याच्या चवीत श्रीकृष्ण जाणवणे आणि श्रीकृष्णांना व्यक्तिशः पाहणे यात काही फरक नाही. त्यात काही फरक नाही. तर तुमच्या सध्याच्या परिस्थतीत तुम्ही श्रीकृष्णांना त्यात पहा... मग तुम्ही हळूहळू त्यांना पाहाल. जर तुम्हाला ताबडतोब श्रीकृष्णांची रासलीला पहायची असेल तर ते शक्य नाही. तुम्हाला पहायला लागेल... जिथे उष्णता आहे, तुम्हाला समजले पाहिजे तिथे आग आहे. जसे जिथे धूर आहे, तुम्हाला माहित आहे की तिथे आग आहे. अगदी तुम्ही प्रत्यक्ष आग बघितली नाही. पण आपण समजू शकतो,कारण बर्फ, नाही, धूर दिसत आहे तिथे नक्की आग आहे. तर अश्या प्रकारे, सुरवातीला,तुम्ही श्रीकृष्णांना जाणले पाहिजे. ते सातव्या अध्यायात सांगितले आहे. शोधा.
रसोSहमप्सु कौन्तेय
प्रभास्मि शशिसूर्ययो:
प्रणवः सर्ववेदेषु.(भगवद् गीता ७.८)

जयतीर्थ : हे कुंतीपुत्र,पाण्यातील रस मी आहे,चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओमकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे.

प्रभुपाद: तर अश्याप्रकारे श्रीकृष्णांना पहा. अडचण कोठे आहे? कोणी हा प्रश्न विचारला? श्रीकृष्णांना पहायला अडचण कुठे आहे? काही अडचण आहे का? श्रीकृष्णांना पाहायला. मन्मना भव मद्भत्त्को, श्रीकृष्णांनी सांगितलंय: 'सतत माझा विचार करा'. तर जेव्हा तुम्ही पाणी पिता, लगेच चव घेता आणि म्हणता 'अरे इथे श्रीकृष्ण आहेत; अडचण कुठे आहे? इथे अडचण नाही. सगळंकाही इथे आहे. अडचण काय आहे?

अभिनंद: श्रीकृष्ण भगवान आहेत लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

प्रभुपाद: तू त्यांच्याबद्दल काय विचार करत आहेस? (सगळे हसतात) (बंगाली) हे म्हणजे, एखाद्याने संपूर्ण रामायण वाचलं आणि वाचून झाल्यावर, तो विचारतो: 'सीता-देवी, ती कोणाचा पिता आहे? (हशा) सीता-देवी कोणाचा पिता आहे? (जोरदार हशा) तुझा प्रश्न त्याप्रमाणे आहे. (अधिक हशा)

अभिनंद: कारण गेल्या वर्षी, मायापुरमध्ये, श्रीला प्रभुपाद, तुम्ही आम्हाला सांगितलं की आपण श्रीकृष्ण भगवान आहेत हे विसरू नये. तुम्ही हे अनेकवेळा सांगितलं आहेत.

प्रभुपाद: हो, तर तू का विसरतोस? (भक्त हसतात) हे काय आहे?

भक्त: जर भक्ताचे भक्तिमार्गवरुन पतन झाले (चरणांबुज ते जयंतक्रीत: तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचं भाषांतर केलं पाहिजे.) ह्याचा भागवतात उल्लेख केलेल्या नरकाच्या वर्णनाशी त्याचा काही संबंध आहे का?

प्रभुपाद:भक्ताचे कधीही पतन होत नाही. (हशा)

भक्त: जय! जय श्रीला प्रभुपाद!