MR/Prabhupada 0171 - लाखो वर्षासाठी चांगले सरकार विसरा , जोपर्यंत ...

Revision as of 09:32, 27 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0171 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.2.28-29 -- Vrndavana, November 8, 1972


म्हणूनच वर्णाश्रम धर्मानुसार,प्रशिक्षण असलं पाहिजे. पुरुषांच्या काही वर्गांना उत्कृष्ट ब्राम्हण म्हणून प्रशिक्षण दिले पाहिजे. काही लोकांना क्षत्रिय म्हणून प्रशिक्षित केले पाहिजे. काही लोकांना वैश्य म्हणून प्रशिक्षित केले पाहिजे. आणि शूद्रांना गरज नाही... प्रत्येकजण शुद्र जन्मना जायते शुद्र:आहे. जन्मजात, प्रत्येकजण शुद्र आहे. संस्काराद भवेद द्विजः. प्रशिक्षणाने, एखादा वैश्य बनेल, एखादा क्षत्रिय बनेल, एखादा ब्राम्हण बनेल. ते प्रशिक्षण कुठे आहे? सगळे शुद्र. आणि चांगल्या सरकारची कशी अपेक्षा ठेवता, शुद्र सरकार? सगळे शूद्र काहीही करून मत मिळवत आहेत. आणि ते सरकारी पद अडवून बसले आहेत. म्हणून त्यांचा एकमात्र व्यवसाय... कली, विशेषतः या युगात,म्लेच्छा राजन्य-रूपीनः खाणे आणि पिणे, मांस खाणे, दारू पिणे. म्लेंच्छ,यवन,ते सरकारी पद स्वीकारतात.

काय तुम्ही चांगल्या सरकारची अपेक्षा करणार? विसरा,लाखो वर्षे चांगलं सरकार विसरा, जोपर्यंत तुम्ही वर्णाश्रम धर्म स्थापन करत नाही. तिथे चांगल्या सरकारचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रथम-दर्जाचे क्षत्रिय असले पाहिजेत,जे सरकारची जबाबदारी घेऊ शकतील ज्याप्रमाणे परीक्षित महाराज. ते त्यांच्या दौऱ्यावर होते,आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की एक काळा माणूस गायीची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. लगेच त्यांनी आपली तलवार काढली: : तू कोण आहेस,दुष्ट?" तो खरा क्षत्रिय आहे. तो वैश्य आहे. जो गोयीला संरक्षण देऊ शकतो.

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् (भगवद् गीता १८.४४)

सर्व स्पष्टपणे दिलेले आहे. संस्कृती कुठे आहे? म्हणून ही कृष्णभावनामृत चळवळ इतकी महत्वाची आहे. संघाचे नेते, त्यांनी खूप गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे. कसे तुम्ही जगाच्या सामाजिक स्थितीत सुधारणा करू शकता. फक्त इथे नाही सगळीकडे, सगळीकडे,फक्त अज्ञान आणि माया आहे, अस्पष्ट, स्पष्ट कल्पना नाही, इथे स्पष्ट कल्पना आहे: वासुदेव-परा वेदा:. वेद, ज्ञान, तुम्ही लोकांना शिकवीत करता, पण तुमचं शिक्षण वासुदेवाबद्दल,कृष्णांनबद्दल लोकांना कुठे शिकवत आहे.

भगवद् गीतेला मनाई आहे. वासुदेव स्वतःबद्दल सांगत आहेत,पण त्याला मनाई आहे. आणि जर कोणे वाचत असला, कोणी दुष्ट वाचत आहे, तो वासुदेवांना वगळत आहे. एवढेच. भगवद् गीता वजा श्रीकृष्ण. हे चाललं आहे. सगळा मूर्खपणा. तुम्ही मूर्ख समाजात तुम्ही मानवी संस्कृतीची अपेक्षा ठेऊ शकत नाही. इथे मनुष्य जीवनाचा खरा उद्देश आहे. वासुदेवपरा वेदा वासुदेवपरा मखा: वासुदेवपरा योगा. इथे अनेक योगी आहेत. मी स्पष्टपणे सांगू शकतो, की वासुदेवांशिवाय, योग - केवळ नाक दाबणे. .एवढंच. हा योग नाही.