MR/Prabhupada 0178 - कृष्णाने दिलेला आदेश धर्म आहे

Revision as of 14:51, 24 April 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0178 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.10.1 -- Mayapura, June 16, 1973


धर्म म्हणजे जो सर्वोच्च परमेश्वराने दिला आहे . तो धर्म आहे. तुम्ही धर्म निर्माण करू शकत नाही. जसे आजकाल इतक्या धर्मांचे उत्पादन केले गेले आहे. ते धर्म नाहीत. धर्म म्हणजे परमेश्वराने दिलेला आदेश. तो धर्म आहे. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ,

सर्व-धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज (भगी १८।६६).

आम्ही अनेक धर्मांचे निर्माण केले आहेत: हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, पारसी धर्म, बुद्ध धर्म, हा धर्म, तो धर्म. ते धर्म नाहीत. ते मानसिक बनावट आहेत , मानसिक मिश्रण . अन्यथा, विरोधाभास असतील. उदाहरणार्थ , हिंदूंना वाटते की गो-हत्या हे अधर्म आहे आणि मुस्लिमांना असे वाटते की गो-हत्या हा त्यांचा धर्म आहे. मग काय योग्य आहे? गाय हत्या हे अधर्म आहे कि धर्म आहे ? तर ही मानसिक रचना आहे. चैतन्य-चरिताम्रत म्हणते, एई भल एई मंद सब मनोधर्म, "मानसिक रचना ." सर्वोच्च दैवी अस्तित्वाने जे सांगितलं आहे तोच वास्तविक धर्म आहे. तो धर्म आहे. म्हणून कृष्ण म्हणतो ,

सर्व-धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज (भगी १८।६६)
"तुमचे सर्व निर्माण केलेले धर्म सोडून द्या, इथे वास्तविक धर्म आहे." शरणम व्रज ." फक्त मला शरण या , आणि हाच वास्तविक धर्म आहे."
धर्मम तु साक्शाद भगवत-प्रनितम ( श्री भ ६।३।१९) .

कायद्याप्रमाणेच . कायदा निर्माण केला जाऊ शकतो किंवा सरकारद्वारे सांगितला जाऊ शकतो . तुम्ही कोणताही कायदा आपल्या घरी करू शकत नाही. तो कायदा नाही. कायदा म्हणजे सरकारद्वारा दिलेला आदेश. सर्वोच्च सरकार हे सर्वोच्च परमेश्वर आहे.

अहम सर्वस्य प्रभवो (भगी १०।८)
मत्त: परतरम नान्यत (भगी ७।७)

कृष्णापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. म्हणून कृष्णाने दिलेला आदेश हा धर्म आहे. आपली ही कृष्णभावनामृत चळवळ धर्म आहे. श्रीकृष्ण म्हणतो ,सर्व-धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज (भगी १८।६६). "तुम्ही इतर सर्व तथाकथित धर्मांचा त्याग करा, हा धर्म, तो धर्म , अनेक धर्म .फक्त मलाच शरण या " तर आम्ही याच तत्त्वाचा प्रचार करीत आहोत, आणि चैतन्य महाप्रभु यांनी याची खात्री केली आहे ,श्री चैतन्य महा ...

अामार अाज्ञाय गुरु हन तार एई देश, यारे देख तारे कह कृष्ण उपदेश (चैच मध्य ७।१२८)

हा धर्म आहे. चैतन्य महाप्रभु यांनी कोणत्याही नवीन प्रणालीचा किंवा धर्माचा निर्माण केला नाही. नाही. चैतन्य महाप्रभु स्वतः कृष्ण आहेत .

नमो माहा-वदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय ते,
कृष्णाय कृष्ण चैतन्य-नामिने (चैच मध्य १९।५३)

तर फक्त फरक आहे कि ... ते स्वतः कृष्ण आहेत. फरक एवढाच आहे की कृष्ण, ईश्वराचे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून, थेट आदेश देत आहे "तू सर्व मूर्खपणा सोडून दे ; फक्त मला शरण ये ." हा कृष्ण आहे. कारण तो परमेश्वराचे सर्वोच्च अस्तित्व आहे, तो थेट आदेश देत आहे. तोच कृष्ण, कारण लोकांनी त्याच्याविषयी गैरसमज केला ... मोठे, मोठे विद्वान ते सुद्धा म्हणतात, "हे अति होत आहे , कृष्ण जे अशा प्रकारे आदेश देत आहे." पण ते मूर्ख आहेत. त्यांना माहीत नाही. ते श्रीकृष्ण काय आहे ते समजू शकत नाही. कारण लोक त्याला चुकीचे समजले , कृष्ण भक्त म्हणून अवतरित झाला हे शिकवण्यासाठी कि कृष्णाला संपूर्ण शरण कसे जावे , कृष्ण आला .

जसे कधी कधी माझे सेवक मला मालिश करतात . मी त्याचे डोके चेपून दाखवतो "हे असे कर " तर मी त्याचा सेवक नाही, पण मी त्याला शिकवत आहे. त्याचप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभु स्वतः कृष्ण आहेत, परंतु ते कृष्णापुढे कसे जायचे , कृष्णाची सेवा कशी करावी ते उत्तम प्रकारे शिकवत आहेत, तेच तत्त्व. श्रीकृष्णाने म्हटले, "तूम्ही मला शरण या " आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात , "तुम्ही कृष्णाला शरण जा." तर तत्त्वानुसार तिथे बदल नाही.