MR/Prabhupada 0180 - हरे कृष्ण मंत्र, निस्संक्रामक आहे

Revision as of 14:57, 24 April 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0180 - in all Languages Category:MR-Quotes - 1969 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.5.11 -- New Vrindaban, June 10, 1969


प्रभुपाद: विनापि पाद-चातुर्यम् भगवद-यश:-प्रधानम् वच: पवित्रम इति अह तद वाग पवित्र इति ।

हे इतके शुद्ध आहे. काय म्हणतात? जंतुनाशक. मायेच्या प्रभावामुळे संपूर्ण जग संक्रमित झाले आहे, आणि कृष्णभावनामृत चळवळ , हरे कृष्ण मंत्र , निर्जंतुकीकरण आहे. हे निश्चित आहे.

तद-वाग-विसर्गो जनताघ-विप्लव: भगवद-यश:-प्रधानम् वच: :पवित्रम इति अह तद वाग इति,
स चासौ वाग-विसर्गो वच: प्रयोग: जनानाम समुहो जनता, तस्य अघम विपलवति नश्यति ।

विप्लव म्हणजे ते नाश करते . कारण जंतुनाशक आहे. उदाहरणार्थ, आपले हे कृष्ण भावनामृत चळवळ कसे निर्जंतुकीकरण करू शकते , कि ज्यांनी हे गांभीर्याने घेतले आहे, ते लगेच पापयुक्त संसर्ग सोडून देतात , चार तत्त्वे, नियमन तत्त्वे, अवैध लैंगिक जीवन, नशा, जुगार व मांस खाणे . हे निर्जंतुकीकरण कसे करते . या चार तत्त्वांमुळे पापी क्रियाकलाप वाढतात. इतर सर्व पापी क्रियाकलाप एका नंतर एक, एका नंतर एक येतात. . चोरी करणे, नंतर फसवणूक करणे, मग ...हि चार तत्त्वे पाळली तर इतर अनेक गोष्टी येतील. आणि जर आपण या चार तत्त्वांना सोडले तर पुढील पापी क्रियाकलाप करण्याचा स्विच बंद होईल . आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे.

आणि त्याची देखभाल कशी करता येईल? या जंतुनाशक पद्धतीने, हरे कृष्ण मंत्राचा जाप करून . अन्यथा, ते केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे शक्य नाही. तर हे खरंच जंतुनाशक आहे. जनताघ-विप्लव: ते व्यक्तीचे पुढील पापी क्रियाकलाप थांबवितात. आणि जर आपण पुढे चालू ठेऊ, "ठीक आहे, माझ्याकडे एक जंतुनाशक पद्धत आहे , हरे कृष्ण जपण्याची. म्हणून मी हि चार पापे करत राहू शकतो आणि मी (नि) संक्रमित होईन ." जसे ख्रिश्चन चर्च मध्ये ते जातात आणि कबूल करतात . हे सर्व ठीक आहे कबूल करणे हे जंतुनाशक आहे. पण तुम्ही पुन्हा ते कसे करू शकता ? त्याचा काय अर्थ होतो? आपण चर्चमध्ये जा, कबूल कार . ते फारच छान आहे. आता आपल्या पापी क्रियाकलाप निष्फळ झाल्या आहेत.हे सर्व ठीक आहे . परंतु आपण पुन्हा तेच कृत्य का करत आहात ? त्याचे उत्तर काय आहे? काय उत्तर असू शकते , जर मी कोणत्याही ख्रिश्चन गृहस्थांना विचारले की: "तुम्ही पापयुक्त क्रियाकलाप करत आहात, प्रभू येशू ख्रिस्तापुढे चर्चमध्ये कबूल करता, ठीक आहे, तो प्रतिनिधी असतो, किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा देव.

तुमचे पापी क्रियाकलाप सर्व निष्फळ होतात , माफ केल्या जातात. हे सर्व ठीक आहे. पण आपण पुन्हा तसेच का वागत आहात ? " उत्तर काय असेल?

नरा-नारायण: ते पुन्हा कबूल करतील.

प्रभुपाद: ते पुन्हा कबूल करतील.याचा अर्थ हा व्यवसाय झाला आहे. कि "मी पाप करेन ..."ही कल्पना नाही. आमच्या , या आक्षेपार्ह यादीत आपण पहिले असेल, आक्षेपार्ह यादी, ज्याला मनाई आहे ... नामनो बलाद यस्य हि पाप-बुद्धिहि . जो कोणी असा विचार करतो कि "मला ही जंतुनाशक पद्धत मिळाली आहे, म्हणून मी पापी कृत्य करू शकेन आणि मी हरे कृष्ण जपेन आणि मला माफी मिळेल," तर ते सर्वात मोठे पाप आहे.