MR/Prabhupada 0190 - भौतिक जगाविषयी विरक्ती वाढवा

Revision as of 15:01, 3 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0190 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 7.6.11-13 -- New Vrindaban, June 27, 1976


जर आपण या भक्ती-मार्गाच्या तत्त्वांचे पालन केले तर आपल्याला अलिप्त कसे व्हायचे ते वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. अलिप्तपणा आपोआपच येईल .

वासुदेवे भगवति-भक्ति-योग: प्रयोजित:

जनयति अाशु वैरागज्ञम (SB 1.2.7)

वैराग्यम म्हणजे अलिप्तपणा. भक्ती-योगाला वैराग्य असेही म्हणतात. वैराग्य . सर्वभौम भट्टाचार्य यांनी वैराग्याबद्दल श्लोक लिहिले आहेत.

वैराग्य-विद्या-निज-भक्ति-योगा-
शिक्शार्थम एक: पुरुश: पुराण:
श्री -कृष्ण-चैतन्य-शरीर-धारि
कृपाम्बुधिर् यस तम अहम् प्रपद्ये (CC Madhya 6.254)

इथे श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू जे स्वतः कृष्ण आहेत . त्यांना आम्हाला वैराग्य-विद्या शिकवण्याकरता यावे लागले .हे फार कठीण आहे. सामान्य माणसांना हि वैराग-विद्या समजून घेणे फार कठीण आहे. त्यांचा व्यवसाय आहे कि या शरीराची आसक्ती कशी वाढवावी, आणि कृष्ण भावनामृत चळवळ भौतिक जीवनाची अलिप्तपणा कशी वाढवायची त्यासाठी आहे. म्हणूनच त्याला वैराग्य-विद्या म्हणतात. वैराग्या-विद्या सहजपणे प्राप्त करता येऊ शकते, जसे ते सल्ला देतात,

वासुदेवे भगवति-भक्ति-योग: प्रयोजित:
जनयति अाशु वैरागज्ञम (SB 1.2.7)

फारच लवकर, फार लवकर. जनयति अाशु वैरागज्ञम ज्ञानम् च . मानवी जीवनात दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक गोष्ट म्हणजे ज्ञानम, ज्ञानम्-विज्ञानम अास्तिक्यम् ब्रह्म-कर्म स्व-भाव-जम . या ज्ञानम चा अर्थ, ज्ञाना ची सुरुवात "मी हे शरीर नाही. मी जीव आत्मा आहे." हे ज्ञान आहे. आणि जेव्हा एखादा ज्ञानाच्या व्यासपीठावर येतो, तेव्हा हे सोपे होते . लोक या शरीराच्या फायद्यासाठी सर्वत्र गुंतले आहेत. पण जर एखादा समजतो , तो 'ज्ञानम 'च्या व्यासपीठावर येतो, मग नैसर्गिकरित्या तो अलिप्त होतो,' मी हे शरीर नाही. मी या शरीरासाठी इतके का राबत आहे?"

ज्ञानम च यद अहैतुकम (SB 1.2.7) .

साहजिकच ... दोन गोष्टी आवश्यक आहेत. चैतन्य महाप्रभु अनेक ठिकाणी आहे, त्यांनी यावर जोर दिला आहे, आणि त्यांच्या जीवनाद्वारे त्यांनी ज्ञानम आणि वैराग्यम शिकवले आहे. एका बाजूला ज्ञानम, रुपा गोस्वामीना , सनातन गोस्वामी दिलेल्या शिकवणीत, शिक्षण, चर्चा करताना सर्वभौम भट्टाचार्य, प्रकाशनन्द सरस्वतिबरोबर , रामानंद रायांसोबत. आम्ही या सर्व गोष्टी आमच्या भगवान चैतन्याच्या शिकवणींमध्ये दिल्या आहेत. तर ते ज्ञानम आहे. आणि त्यांनी त्याच्या उदाहरणावरून त्यांच्या जीवनात , सन्यास घेऊन, ते वैराग्य शिकवत आहेत. ज्ञान आणि वैराग्य, या दोन गोष्टी आवश्यक आहेत. तर अचानक एकाएकी आपण 'ज्ञानम' आणि 'वैराग्यम' च्या व्यासपीठावर जाऊ शकत नाही, पण जर आपण सराव केला तर ते शक्य आहे. असे नाही कि ते अशक्य आहे. ते सांगितले आहे:

वासुदेवे भगवति-भक्ति-योग: प्रयोजित:
जनयति अाशु वैरागज्ञम ज्ञानम च यद अहैतुकम (SB 1.2.7)

ते आवश्यक आहे. म्हणून कृष्ण भावनामृत चळवळ ज्ञानम आणि वैराग्यम् प्राप्त करण्यासाठी आहे. जर आपण या भौतिक जगामध्ये खूप अधिक गुंतलो तर ... आणि आपण कसे आसक्त होतो ? प्रह्लाद महाराज यांनी स्पष्ट वर्णन केले आहे. पत्नी, मुले, घर, प्राणी आणि नोकर, फर्निचर, कपडे , इत्यादी, इत्यादी, बर्याच गोष्टी. लोक रात्रंदिवस इतके कठोर परिश्रम करतात फक्त या गोष्टींसाठी. छान बंगला, छान प्राणी, , इतक्या छान गोष्टी आपल्याला दिसत आहेत ? कशासाठी? आसक्ती वाढवण्यासाठी. जर आपण आसक्ती वाढवली , तर मग या भौतिक बंधातून सुटण्याचा प्रश्नच येत नाही. तर आपल्याला या विरक्तीचा सराव केला पाहिजे.