MR/Prabhupada 0192 - संपूर्ण मानव समाजाला अंधकारमय जगातून बाहेर काढा

Revision as of 15:41, 7 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0192 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 6.1.62 -- Vrndavana, August 29, 1975


भगवद्गीते मध्ये असे म्हटले आहे ,

परम ब्रह्मा परम धाम पवित्रम परमम् भवान, पुरुषम शाश्वतम अाद्यम (BG 10.12)

कृष्ण ,भगवान, त्याचे पुरुष म्हणून वर्णन आहे, आणि सर्व जीवांचे प्रकृती म्हणून वर्णन आहे.

अपरेयम इतस् तु विधी प्रकृतिम परा, जीव भूतो महा-भावो ययेदम् धारयते जगत (BG 7.5)

कृष्णाने समजावले आहे, भौतिक ऊर्जा आणि अध्यात्मक ऊर्जा आहे . तर, जीव-भूत । जीव-भूत, जीव, त्यांना प्रकृती म्हणून संबोधण्यात आले आहे, आणि प्रकृती म्हणजे स्त्रित्व . आणि कृष्णाचे पुरूष म्हणून वर्णन करण्यात आले आहे. तर पुरूष हा आनंद घेणारा, आणि प्रकृती जिचा आनंद घेतला जातो ती आहे. "आनंद" म्हणजे फक्त संभोग असा अर्थ काढू नका .नाही . "आनंद घेणे " म्हणजे अधीन असणे , पुरुषाच्या आज्ञेचे पालन करणे . हि कृष्ण आणि आपली भूमिका आहे. आपण त्याचे भाग आहोत, जसे हात आणि पाय माझ्या शरीराचे भाग आहेत. तर हात आणि पाय यांचे कर्तव्य आहे की माझ्या आज्ञेचे पालन करणे. मी पायांना म्हणतो "मला तिथे घेऊन जा." ते करतील ... ते लगेचच करतील . माझ्या हाताला सांगितले - "ते घे ." मी ते घेईन. हात ते घेईल. तर हे प्रकृती आणि पुरूष आहेत . पुरुष आदेश देतो आणि प्रकृति कर्तव्य पार पाडते. हे सत्य आहे ..., असे नाही कि जेव्हा आपण प्रकृती आणि पुरूष म्हणतो तेथे संभोगाचा प्रश्न उद्भवतो .नाही. म्हणजे ... प्रकृती म्हणजे आज्ञाधारक, पुरुषाची आज्ञा पाळणारी . हा नैसर्गिक मार्ग आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ते कृत्रिमरित्या समान बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु ते नैसर्गिक रित्या शक्य नाही. आणि तिथे असा कोणताही प्रश्न नाही , श्रेष्ठत्व किंवा न्यूनता . नाही. जसे सुरुवातीला ,

यतो वा इमानि भूतानि जायन्ते . जन्मादि अस्य यत: (SB 1.1.1)

पुरूष व प्रकृतीमधील या नातेसंबंधाला सुरुवात कशी झाली? जन्मादि अस्य यत:.हे परिपूर्ण सत्या पासून सुरु आहे. म्हणून संपूर्ण सत्य आहे राधा-कृष्ण , एकच पुरूष आणि प्रकृती. परंतु, राधारणी सेवा करणारी , सेवक आहे. राधाराणी इतकी तज्ज्ञ आहे की ती नेहमी कृष्णाला तिच्या सेवेद्वारे आकर्षित करते. हे राधाराणीचे स्थान आहे. कृष्णाला मदन मोहन म्हणतात. इथे वृन्दावनामध्ये मध्ये मदन-मोहन आहे आणि राधाराणीला मदन-मोहन-मोहिनी म्हणतात. कृष्ण इतका आकर्षक आहे की ... आम्ही कामदेवामुळे आकर्षित होतो आणि कृष्ण कामदेवाला आकर्षित करतो. म्हणून त्याचे नाव मदन-मोहन आहे. आणि राधाराणी इतकी उच्च आहे की ती कृष्णाला आकर्षित करते. म्हणून ती सर्वोच्च आहे.

म्हणूनच वृन्दावनामध्ये मध्ये, लोकांना कृष्णाच्या नावापेक्षा राधाराणीचे नाव जपण्याची सवय आहेत - "जय राधे." होय . तुम्हाला कृष्णची कृपा हवी असल्यास, तुम्ही केवळ राधाराणी ला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. तर हा मार्ग आहे. आता इथे असे म्हटले आहे, मन मदन-वेपितम: "मन उत्तेजित झाले." म्हणून मदन मोहनाकडे जोपर्यंत आकर्षित होत नाही तोपर्यंत मनाची अस्वस्थता चालूच राहील. जर आम्ही मदन मोहनाकडून आकर्षित होऊ शकत नाही, जोपर्यंत आपण मदन मोहनाद्वारे आकर्षित होत नाही आपण मदनाद्वारे आकर्षित केले जाऊ , मदन-वेपितम . हि प्रक्रिया आहे . आणि जोपर्यंत आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही आपल्या मनाला मदनापासून विचलित होण्यापासून वाचवू शकत नाही , तोपर्यंत मोक्ष किंवा मुक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. जीवनाचे अंतिम ध्येय हे आहे की या या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे, जन्म, मृत्यूची पुनरावृत्ती आणि तीनपट दु:ख. ती पूर्णता आहे. त्यांना जीवनाचे लक्ष्य काय आहे ते माहित नाही, जीवनाची , संपूर्ण जगची परिपूर्णता काय आहे.

विशेषतः या काळात ते इतक्या खालच्या पातळीवर आहेत कि त्यांना जीवनाचे ध्येय काय आहे हे माहिती नाही. हे मोठे मोठे राजकीय पक्ष, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक त्यांना काहीही ज्ञान नाही. ते अंधारात आहेत. म्हणूनच अंधारातले भ्रम म्हटले जाते. पण आम्हाला माहीत आहे कि कृष्ण सूर्यसम : "कृष्ण अगदी सूर्याप्रमाणेच आहे." कृष्ण सूर्य सम, माया अंधकार : "आणि हा अंधकार म्हणजे माया"

कृष्ण सूर्य सम, माया अंधकार, यहां कृष्ण,
ताहाँ नाहि मायार अधिकार (CC Madhya 22.31)
माम एव तु प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते (BG 7.14)

ही प्रक्रिया आहे. तर हे एक महान विज्ञान आहे. कृष्ण भावनामृत चळवळ हि संपूर्ण मानवी समाजाला अंधकाराचा विळख्यातून मुक्त करण्याकरता सर्वात वैज्ञानिक चळवळ आहे.