MR/Prabhupada 0202 - एका उपदेशकापेक्षा चांगले प्रेम कोण करू शकेल

Revision as of 10:45, 14 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0202 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - M...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Morning Walk -- May 17, 1975, Perth


अमोघा : शहामृग जमिनीवर एका भोका मध्ये त्यांचे डोके चिकटून ठेवतात .

प्रभुपाद: होय. परमहंस: पण तिथे काही प्रगती असली पाहिजे कारण बरेच जण हरे कृष्ण आंदोलनात सामील होत आहेत.

प्रभुपाद: ते खरी प्रगती करत आहेत . भव-महा दावाग्नि-निर्वापनम . त्यांच्या या भौतिक चिंता संपतील. ते प्रगती करत आहेत.

चेतो-दर्पण-मार्जनम् भव-महा-दावाग्नि-निर्वापनम (CC Antya 20.12)

हरे कृष्ण जप करून त्यांचे गलिच्छ हृदय शुद्ध होईल आणि जेव्हा ते पूर्णपणे स्वच्छ होईल तेव्हा भौतिक अस्तित्त्वाची समस्या संपुष्टात येईल. आणखी चिंता नाही . परमहंस: ते आनंदी दिसत आहेत, परंतु ... कृष्णाचे भक्त सुखी असतात, परंतु ते जास्त व्यावहारिक काम करत नाही आहेत . ते नेहमी गाणे आणि नृत्य करतात आणि काही पैसे मागतात. पण ते कोणत्याही व्यावहारिक गोष्टी करीत नाहीत. आपण खूप साऱ्या व्यावहारिक गोष्टी करत आहोत प्रभुपाद: नृत्य हे काम नाही का ? आणि पुस्तक लिहिने काम नाहि का? पुस्तक विक्री काम नाही का ? मग काम काय आहे? हम्म? जसे माकड उड्या मारत आहे ? होय? ते कार्य करीत आहे?

अमोघा : पण आम्ही लोकांना प्रात्यक्षिक शिकवत आहोत जसे रुग्णालयात किंवा मद्य व्यसनींमध्ये ...

प्रभुपाद: नाही, काय ... तुम्ही कशा प्रकारे मदत करत आहात? तुम्हाला वाटते एखादा हॉस्पिटलमधे गेला तर तो मरणार नाही? आणि आपण कशा प्रकारे मदत करत आहात? तुम्ही विचार करत आहात की तुम्ही मदत करत आहात.

अमोघा : पण तो जास्त आयुष्य जगतो . प्रभुपाद: हा आणखी एक मूर्खपणा आहे. तुम्ही किती काळ जगू शकाल? जेव्हा मृत्यूचा काळ येईल तेव्हा तुम्ही एक क्षणहि अधिक जगू शकत नाही. जेव्हा एखादा माणूस मरणार असतो , त्याचे जीवन संपलेले असते. तुमचे इंजेक्शन, औषध, एक मिनिटांचे अधिक जीवन देऊ शकेल? असे औषध आहे का?

अमोघा : पहा , तसे वाटत आहे. प्रभुपाद: नाही ...अमोघा: काहीवेळा जेव्हा ते औषध देतात तेव्हा ते अधिक काळ जगतात.

परमहंस: ते म्हणतात की हृदय प्रत्यारोपण करून ते लोकांना जगवू शकतात ...

प्रभुपाद: ते म्हणतील, ... कारण आम्ही त्यांना मूर्ख समजतो , आपण त्यांचे शब्द का मानावे ? आपन त्यांना एक मूर्ख म्हणून समजावे , बस . (कोणीतरी मागे जोरात ओरडतो , प्रभुपाद त्याच्यावर ओरडतात ) (हशा) आणखी एक दुष्ट तो जीवनाचा आनंद घेत आहे. तर जग दुष्टांनी भरले आहे . आपण या जगाविषयी आशावादी होण्याऐवजी निराशावादी असणे आवश्यक आहे. आपण निराशवादी नसलो तर , आपण परत घरी जाण्यासाठी सक्षम राहणार नाही. जर तुम्हाला या जगाचे थोडे जरी आकर्षण - "हे चांगले आहे" - मग तुम्हाला इथे रहावे लागेल . होय. कृष्ण खूप कठोर आहे. परमहांस: पण येशूने म्हटले: "स्वतःप्रमाणे तुझ्या बंधूंवर प्रेम कर." तर जर आम्ही आपच्या बंधूवर प्रेम केले ...

प्रभुपाद: आपण प्रेम करत आहोत. आपण कृष्ण भावनामृत वाटत आहोत. ते प्रेम, खरे प्रेम आहे. आपण त्याला शाश्वत जीवन देत आहोत, शाश्वत आनंद जर आपण त्यांना प्रेम करत नाही, तर आपण इतके त्रास का घेत आहोत? प्रचारकाने लोकांवर प्रेम केले पाहिजे. अन्यथा तो का ते करत आहे? तो घरी स्वत: साठी ते करू शकतो . तो इतका त्रास का घेत आहे? ऐंशी वर्षांच्या वयात मी इथे का आलो आहे , जर माझे प्रेम नसते तर ? तर एका उपदेशकापेक्षा चांगले प्रेम कोण करू शकेल? तो प्राण्यांवरही प्रेम करतो . त्यामुळे ते उपदेश देत आहेत, "मांस खाऊ नका." ते प्राण्यांवर प्रेम करतात का , दुष्ट ? ते खात आहेत, आणि ते आपल्या देशावर प्रेम करतात, बस . कुणीही प्रेम करत नाही आहे नाही . ती फक्त इंद्रिय अर्थ तृप्ती आहे . जर कुणी प्रेम करत असेल तर तो कृष्ण भावनामृतात आहे , बस . इतर सर्व धूर्त आहेत . ते स्वत: च्या इंद्रिय तृप्तीच्या मागे आहेत, आणि ते एक फलक लावतात , "मी सर्वांवर प्रेम करतो." हा त्यांचा व्यवसाय आहे. आणि मूर्ख लोक स्वीकारत आहेत, "अरे, हा मनुष्य अतिशय परोपकारी आहे." तो कोणत्याही पुरुषावर प्रेम नाही त्याला केवळ इंद्रियांवर प्रेम करतो . फक्त इंद्रियांचा गुलाम ,बस .