MR/Prabhupada 0208 - जो कृष्ण भक्त आहे अशा व्यक्तीचा आश्रय घ्या

Revision as of 03:26, 27 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0208 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 6.1.16 -- Denver, June 29, 1975


एक वैष्णव कधीही पापपूर्ण कृती करत नाही आणि पूर्वी त्यांनी जे काही केले होते ते देखील पूर्ण झाले असते . हे कृषणाद्वारे सांगितले गेले आहे . किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही जर स्वताला भक्तिभावाने प्रभूची सेवा करण्यात गुंतवाल , तर नक्कीच तुम्ही पापी क्रियाकलापांच्या प्रतिक्रियेपासून मुक्त व्हाल . तर हे कसे शक्य आहे? यथा कृष्णार्पित-प्राण.: प्राण. , प्राणेर अर्थेर धिया वाचा । प्राण, प्राण म्हणजे जीवन. कृष्णाची सेवा करण्यासाठी आपले जीवन ज्याने समर्पित केले आहे , अशी व्यक्ती . कृष्णाच्या सेवेसाठी जीवनाचे असे समर्पण कसे शक्य होऊ शकेल ? ते देखील नमूद केले आहे: तत-पुरुष-निशेवया . जो कृष्णाचा भक्त आहे अशा व्यक्तीची शरण तुम्हाला घ्यावी लागेल आणि सेवा करावी लागेल. याचा अर्थ आपल्याला आपल्या मार्गदर्शक म्हणून एक भक्त, एक खरा भक्त, एक शुद्ध भक्त स्वीकारणे जरुरी आहे . ही आमची प्रक्रिया आहे.

रुप गोस्वामी भक्ति-रसाम्रत-सिंधु मध्ये म्हणतात , "पहिली पायरी म्हणजे , अादौ गुरुवाश्रयम , गुरूंचा स्वीकार करणे " गुरूंना स्वीकारा गुरू म्हणजे कृष्णाचा प्रतिनिधी . जो कृष्णाचा प्रतिनिधी नाही, तो गुरु होऊ शकत नाही. कोणताही मूर्ख गुरु होऊ शकत नाही . नाही . केवळ पुरूष तत् -पुरुष . तत् पुरुष म्हणजे तो व्यक्ती ज्याने परमोच्च ईश्वरालाच सर्व काही म्हणून स्वीकार केले आहे . तत् -पुरूष-नीसेवाया याचा अर्थ वैष्णव, शुद्ध भक्त . तर हे फार कठीण नाही. कृष्णाच्या कृपेने शुद्ध भक्त आहेत, तर एखाद्याला त्याचा आश्रय घेतला पाहिजे .. अादौ गुरुवाश्रयम. मग सद-धर्म-पृच्छात: प्रामाणिक अध्यात्मिक गुरु स्वीकारल्यानंतर , तो कृष्णाचे विज्ञान काय आहे हे जाणून घेण्यासाठी जिज्ञासू असला पाहिजे . सद-धर्म-पृच्छात साधु-मार्ग-अनुगमनम . आणि हे कृष्ण भावनामृत म्हणजे एखाद्याला भक्तांच्या पावलांचे अनुसरण करावे लागते ,साधु-मार्ग-अनुगमनम . तर ते साधु कोण आहेत? त्याचा देखील शास्त्रामध्ये उल्लेख आहे, आपण आधीच चर्चा केली आहे.

स्वयमभूर् नारद: शम्भु: कुमार: कपिलो मनु:
प्रहलादो जनको भीश्मो बलिर वैयासकिर वयम (श्रीभ ६।३।२०)

विशेषतः बारा व्यक्तींचा उल्लेख केला आहे, की ते महाजन आहेत, ते अधिकृत आहेत, प्रामाणिक गुरु आहेत, आणि तुम्हाला त्यांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल . हे कठीण नाही आहे . तर सयंभू म्हणजे भगवान ब्रह्म. स्वयमभू नारद: शंभू: शंभू म्हणजे भगवान शिव . तर त्यांच्यातली प्रत्येकजण ... या बारा महाजनांपैकी चार अतिशय प्रमुख आहेत. ते आहेत स्वंयंभू, म्हणजे ब्रह्मा आणि नंतर शंभू , भगवान शिव आणि नंतर कुमार: आणि तिथे अजून एक संप्रदाय आहे , श्री संप्रदाय , लक्ष्मीजी पासून . तर आपल्याला अध्यात्मिक गुरूंना स्वीकारावे लागेल जे या चार प्रकारच्या शिष्यत्वाच्या वारशामध्येच मोडतात. मग आपल्याला फायदा होईल. जर आपण एक तथाकथित गुरू स्वीकारले तर ते शक्य होणार नाही. आपल्याला अनुशासनाच्या वारशामधले गुरू स्वीकारावे लागतील . म्हणून इथे शिफारस केली आहे, तत -पुरुष- निसेवया : आपण त्याची प्रामाणिकपणे आणि आस्थेने सेवा केली पाहिजे. मग आपला उद्देश सफल होईल . आणि जर तुम्ही या संप्रदायाला स्वीकारलात , कृष्णाला जीवन समर्पित करण्याच्या . आणि तत पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच कृष्ण सेवेमध्ये मग्न रहाल म्हणजे ज्याला कृष्ण भावनामृत प्रचाराखेरीज इतर कशात रस नाही- मग जीवन यशस्वी होईल . आपण सर्व पापयुक्त फळांपासून मुक्त व्हाल , आणि शुद्ध झाल्याखेरीज ... कारण कृष्ण , किंवा देव शुध्द आहे .

अर्जुन म्हणाला , परम ब्रह्मा परम ब्रह्मा पवित्रम परमम भवान: " माझ्या भगवंता कृष्णा , तू परम पवित्र आहेस ." तर जोपर्यंत आपण पवित्र नाही आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकत नाहि . तसे शास्त्रामध्ये नमूद केले आहे .अग्नी बनल्याशिवाय तुम्ही अग्नीमध्ये प्रवेश नाही करू शकत . तसेच पूर्ण पावित्र झाल्याखेरीज तुम्ही भगवंताच्या धामात प्रवेश नाही करू शकत . ते सर्वच धार्मिक पद्धतीनी स्वीकारले आहे . ख्रिश्चन पद्धतही तशीच आहे , कि संपूर्ण पवित्र झाल्याखेरीज तुम्ही ईश्वराच्या घरी नाही जाऊ शकत .'