MR/Prabhupada 0212 - वैज्ञानिकदृष्ट्या, मृत्यूनंतर जीवन आहे

Revision as of 03:58, 27 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0212 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - C...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Garden Conversation -- June 10, 1976, Los Angeles

प्रभुपाद: आधुनिक शिक्षण ते हे समजू शकत नाही की जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग यांची पुनरावृत्ती त्रासदायक आहे . त्यांना ते समजत नाही. त्यांना ते का स्वीकारावे लागते ? स्वीकारा, त्यांना वाटते की दुसरा काही पर्याय नाही आहे . पण जर हे थांबवण्याचा एक मार्ग असेल, तर ते तो स्वीकारत का नाहीत ? हम्म? या शिक्षणाचे मूल्य काय आहे? जर ते योग्य आणि अयोग्य यात भेद करू शकत नाहीत. मृत्यू कुणालाहि आवडत नाही, पण मृत्यू आहे . कोणाला वृद्ध होणे आवडत नाही, पण तेथे वृद्धत्व आहे.

त्यांना वैज्ञानिक प्रगतीबद्दल अभिमान वाटतोय पण त्यांनी या मोठमोठ्या समस्या का सोडल्या ? हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे? जर ते योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखू शकत नाहीत, तर या शिक्षणाचा काय फायदा आहे? शिक्षण म्हणजे एखादा योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्यात समर्थ बनावा . पण ते करू शकत नाहीत, किंवा त्यांना हेही कळत नाही की मृत्यू चांगली गोष्ट नाही, पण ते मृत्यू कशाप्रकारे थांबवू शकतात याचे प्रयन्त का करत नाही आहेत ? प्रगती कुठे आहे? त्यांना विज्ञानाच्या प्रगतीचा अत्यंत अभिमान आहे. प्रगती कुठे आहे? तुम्ही मृत्यू थांबवू शकत नाही. तुम्ही वृद्ध होणे थांबवू शकत नाही. तुम्ही प्रगत औषध निर्मिती करू शकता, परंतु तुम्ही रोग का थांबवत नाही ? ही गोळी घ्या, आणि तुमचा आजार बरा होईल. ते विज्ञान कुठे आहे? हम्म?

नलिनीकंठ: ते म्हणतात की ते त्यावर काम करीत आहेत.

प्रभुपाद: हा आणखी एक मूर्खपणा आहे. फसवेपणा .

गोपवृंदपाल: जसे आपण सांगतो की, कृष्ण भावनामृत एक क्रमवार प्रक्रिया आहे, तसेच ते म्हणतात की त्यांची वैज्ञानिक प्रगतीदेखील एक हळुवार प्रक्रिया आहे.

प्रभुपाद: क्रमवार प्रक्रिया, परंतु त्यांना वाटते की ते मृत्यू थांबवू शकतील? आम्हाला खात्री आहे की आम्ही परत घरी जाणार आहेत आहोत, ईश्वर धामी , कृष्णाकडे . पण त्यांचा विश्वास कुठे आहे की ते मृत्यू, वृद्धत्व , रोग थांबवू शकतील?

डॉ. वोल्फ : आता सर्वात नवीन लहर म्हणजे ते म्हणत आहेत की ते प्रयत्न करत आहेत, त्यांनी हे सिद्ध केले आहे की मृत्यूनंतर जीवन आहे.

प्रभुपाद: हो ते आहे .

डॉ. वोल्फ : ते पुन्हा वैज्ञानिकदृष्ट्या हे करण्याचा प्रयत्न करतात

प्रभुपाद: त्यांना करू द्या. वैज्ञानिकदृष्ट्या, मृत्यूनंतर जीवन आहे. ते आपण वारंवार म्हणतो की, माझ्या मुलाचे शरीर मृत आहे, ते निघून गेले आहे, नष्ट झाले आहे. मला एक वेगळे शरीर मिळाले आहे. त्यामुळे मृत्यू नंतर जीवन आहे हे व्यावहारिक आहे. तर कृष्ण म्हणतो,

तथा देहान्तर-प्राप्ति: (भ गी 2.13) त्याचप्रमाणे,
न हन्यते हन्यमाने शरीरे (भ गी 2.20)

हे भगवंताचे आधिकारिक विधान आहे, आणि प्रत्यक्ष पाहता आपल्याला एका शरीरानंतर दुसरेहि शरीर प्राप्त होते , पण मी तसाच राहतो. मग आक्षेप कुठे आहे? त्यामुळे मृत्यू नंतर जीवन आहे. तथाकथित मृत्यू म्हणजे शरीरा नष्ट होणे. म्हणून जर आपण त्या जीवनाला प्राप्त करू शकू, जिथे मृत्यू नाही , तर ते शोधले पाहिजे. ही बुद्धिमत्ता आहे . याचा उल्लेख भगवद् गीतेमध्ये आहे, की जर तुम्ही फक्त कृष्णाला समजून घेतले . आणि आपण त्याच्याकडे परत जाण्यास समर्थ झालो मग पुन्हा मृत्यू होणार नाही