MR/Prabhupada 0237 - आपण कृष्णाचे नाव घेऊन त्याच्या संपर्कात येतो , हरे कृष्ण

Revision as of 16:48, 19 September 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0237 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.3 -- London, August 4, 1973

प्रद्युम्न: भाषांतर - "हे पार्थ! अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप ऊठ."

प्रभूपाद: तर भगवान,श्रीकृष्ण,उत्साह वाढवत आहेत. क्षुद्रं हृदयदौर्बल्यं "क्षत्रियाने अशाप्रकारे बोलणे की, 'नाहीं नाही, मी माझ्या नातलगांची हत्या करू शकत नाही. मी माझी शस्त्र खाली ठेवतो.' हि दुर्बलता आहे, भ्याडपणा आहे. तू असा मूर्खपणा का करत आहेस?" क्षुद्रं हृदयदौर्बल्यं "याप्रकारची करुणा, क्षत्रिय म्हणून असलेले आपले कर्तव्य नाकारणे, हा फक्त हृदयाचा दुबळेपणा आहे. त्याला काही अर्थ नाही." क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपपद्यते "विशेषता तू. तू माझा मित्र आहेस. लोक काय म्हणतील? मनाचा दुबळेपणा सोडून दे आणी उत्तिष्ठ,उभा रहा, धैर्य धर. श्रीकृष्ण अर्जुनानाला लढण्यासाठी कसे प्रेरित करत आहेत ते पहा. लोक अज्ञानात असतात आणि काहीवेळा ते टीका करतात "श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तेजित करत आहेत. तो अतिशय सभ्य, अहिंसक मनुष्य आहे,आणि श्रीकृष्ण त्याला लढण्यासाठी उत्तेजना देत आहेत." याला म्हणतात जड-दर्शन.जड-दर्शन.जड-दर्शन म्हणजे भौतिक दृष्टी. म्हणून शास्त्र सांगत,अतः

श्रीकृष्ण नामादी ना भवेद ग्राह्यम इन्द्रियै (चै च मध्य १७।१३६).

श्रीकृष्ण नामादी. हरे कृष्णाचा जप करून आपण श्रीकृष्णांच्या संपर्कात येतो. ती आपल्या श्रीकृष्णानं बरोबरच्या संबंधाची सुरवात आहे.नामादी. तर शास्त्र सांगत,अतः श्रीकृष्ण नामादी. आदी म्हणजे सुरवात. आपला श्रीकृष्णांन बरोबर काही संबंध नाही. पण जर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला, लगेच आपली श्रीकृष्णांन बरोबरच्या संबंधाची सुरवात होईल. तर याचा सराव केला पाहिजे. असं नाही की लगेच मी श्रीकृष्णांना जाणले. तस नाही आहे... अर्थात,एखादा प्रगत असेल,तर ते शक्य आहे. श्रीकृष्ण नामादी. नाम म्हणजे नाव. श्रीकृष्ण केवळ नाव नाही. आदी ती सुरवात आहे. पण रूप, कार्य. ज्याप्रमाणे

श्रवणं किर्तनं (श्री भ ७।५।२३)

श्रवणं किर्तनं श्रीकृष्णांन बद्दल स्तुती किंवा वर्णन. तर त्यांना रूप आहे. नाम म्हणजे नाव,आणि मग रूप म्हणजे स्वरूप. नाम,रूप... लीला, गुण, परिवार,त्यांचे पार्षद; हे सगळे... अतः

श्रीकृष्ण नामादी ना भवेद (चै च मध्य १७।१३६)

ना भवेद ग्राह्यम इन्द्रियै सामान्य इंद्रियांनी आपण जणू शकत नाही... एकतर श्रीकृष्णांचे नाव... आपण ऐकतो,श्रीकृष्णांचे नाव कानाने श्रवण करतो. पण जर आपण आपले कान शुद्ध केल्याशिवाय... अर्थात, श्रवणाद्वारे, ते शुद्ध होतील. आपण मदत केली पाहिजे. मदत म्हणजे अपराध टाळणे, दहा प्रकारचे अपराध. अशाप्रकारे आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला मदत करू शकतो. ज्याप्रकारे जर मला आग पेटवायची आहे, लाकूड सुकवून मला प्रज्वलन प्रक्रियेस मदत केली पाहिजे. लगेच आग पेटेल. त्याचप्रमाणे,फक्त जप करून, ते आपल्याला मदत करेल पण थोडा वेळ लागेल. पण जर आपण अपराध टाळले, मग खूप लवकर शुद्ध होईल. कृती केली जाईल.