MR/Prabhupada 0244 - आपले तत्त्वज्ञान आहे सर्व काही भगवंताचे आहे

Revision as of 12:07, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.9 -- London, August 15, 1973


एक दिवशी पॅरिसमध्ये एक वार्ताहर माझ्याकडे आला,समाजवादीपार्टी (प्रेस). तर मी त्याला सांगितले की "आमचे तत्वज्ञान आहे सर्वकाही भगवंतांच्या मालकीचे आहे." श्रीकृष्ण सांगतात.

भोत्त्कारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् (भ.गी. ५.२९)

"मी उपभोक्ता आहे, भोक्ता." भोक्ता म्हणजे आनंद घेणारा. तर भोत्त्कारं यज्ञतपसां. ज्याप्रमाणे हे शरीर काम करत आहे. जीवनाचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण काम करत आहे. पण आनंदाची सुरुवात कुठून होते? आनंदाची सुरुवात पोटापासून सुरु होते. तुम्हाला पोटाला पुरेसे चांगले पदार्थ दिले पाहिजेत. जर पुरेशी ऊर्जा असल्यास आपण पचवू शकतो. जर पुरेशी ऊर्जा, मग सगळी इतर इंद्रिय बळकट होतात. मग तुम्ही इंद्रियतृप्तीचा आनंद घेऊ शकता. नाहीतर ते शक्य नाही. जर तुम्ही पचवू शकला नाहीत... ज्याप्रमाणे आता आम्ही वृद्ध माणसं आम्ही पचवू शकत नाही. तर इंद्रियांच्या आनंदाचा प्रश्नच येत नाही. पोटापासून आनंदाची सुरुवात होते.

जर पुरेसे पाणी असेल वृक्षाची घनदाट वाढ मुळापासून होते. म्हणून वृक्षाला पद-प म्हणतात. ते पाणी पायापासून पितात,मुळ,डोक्यापासून नाही. ज्याप्रमाणे आपण डोक्यापासून खातो. तर तिथे वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. जसे आपण तोंडाने खाऊ शकतो,वृक्ष,ते पायापासून खाऊ शकतात. पण एखाद्याने जेवलं पाहिजे. आहार-निद्रा-भय-मैथुन. तिथे जेवण आहे,एकत्र आपण पायाने किंवा तोंडाने,किंवा हाताने खातो. पण श्रीकृष्णांच्या बाबतीत., ते कोठूनही खाऊ शकतात. ते हाताने,पायाने,डोळ्याने,कानाने,कुठूनही खाऊ शकतात. कारण ते संपूर्ण अध्यात्मिक आहेत. त्याने हात,आणि पाय आणि कान आणि डोळे यात काही फरक नाही. ते ब्रम्हसंहितेमध्ये म्हटले आहे.


अंगानी यस्य सकलेन्द्रिय-वृत्तिमन्ति
पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरम जगन्ति
अानन्द-चिन्मय-सद्उज्वल-विग्रहस्य
गोविन्दम अादि पुरुषम तम अहम भजामि
(ब्रह्मसंहिता ५.३२)


तर या शरीरात आपल्या आनंदाची सुरुवात पोटापासून होते, त्याचप्रमाणे, वृक्षांची भरघोस वाढ त्यांच्या मुळांपासून सुरु होते. त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण सर्वांचे उगमस्थान आहेत.

जन्मादि अस्य यत: (श्रीमद भागवतम १.१.१)

मूळ. तर कृष्णभावनामृताशिवाय, श्रीकृष्णांना प्रसन्न केल्या शिवाय, आपण आनंदी होऊ शकत नाही. ही पद्धत आहे. म्हणून श्रीकृष्ण कसे प्रसन्न होतील? श्रीकृष्ण प्रसन्न होतील... आपण सर्व श्रीकृष्णांची मुलं आहोत,देवाची मुलं. सर्वकाही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे. हे सत्य आहे. आता,आपण कृष्ण प्रसाद घेऊन आनंद घेऊ शकतो,कारण तो मालक आहे,भोक्ता. उपभोगणारा. तर सर्वकाही प्रथम श्रीकृष्णांना अर्पण केलं पाहिजे,आणि मग तुम्ही प्रसाद घ्या. ते तुम्हाला आनंदी बनवेल. ते भगवद् गीतेत सांगितलंय. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् (भगवद् गीता ३.१३) "जे स्वतःसाठी अन्न शिजवतात,ते केवळ पापच भक्षण करतात."

भुन्जते ते त्व अघम पापम ये पचन्ति अात्म-कारणात (भ.गी. ३.१३).


सर्वकाही श्रीकृष्णांसाठी केलं पाहिजे,अगदी तुमचं भोजन,काहीही. इंद्रियतृप्ती,तुम्ही आनंद घेऊ शकता. पण श्रीकृष्णांनी आनंद घेतल्यावर. मग तुम्ही खाऊ शकता. म्हणून श्रीकृष्णांचे नाव ह्रिषीकेश आहे. ते स्वामी आहेत. इंद्रियांचे स्वामी. तुम्ही स्वतंत्रपणे इंद्रियांचा उपभोग घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सेवक. सेवक आनंद घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आचारी स्वयंपाकघरात खूप चांगले पदार्थ बनवतो,पण सर्वांच्या आधी तो खाऊ शकत नाही. ते शक्य नाही. मग त्याला कामावरून काढले जाईल. सगळ्यात आधी मालकाने घेतलं पाहिजे,आणि मग ते सगळी चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.