MR/Prabhupada 0245 - प्रत्येक जण त्याच्या किंवा तिच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0245 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0244 - हमारा तत्वज्ञान है कि सब कुछ भगवान के अंतर्गत आता है|0244|MR/Prabhupada 0246 - कृष्ण का भक्त जो बन जाता है , सभी अच्छे गुण उनके शरीर में प्रकट होते हैं|0246}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0244 - आपले तत्त्वज्ञान आहे सर्व काही भगवंताचे आहे|0244|MR/Prabhupada 0246 - कोणीही जो कृष्णाचा भक्त बनतो सर्व चांगले गुण त्याच्या शरीरात प्रकट होतात|0246}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 17: Line 17:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|-Z7lyOULm6M|प्रत्येक जण त्याच्या किंवा तिच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे - Prabhupāda 0245}}
{{youtube_right|JQeRD8ZbP5k|प्रत्येक जण त्याच्या किंवा तिच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे<br/> - Prabhupāda 0245}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 12:08, 1 June 2021



Lecture on BG 2.9 -- London, August 15, 1973


तर श्रीकृष्ण इंद्रियांचे स्वामी आहेत. संपूर्ण जग इंद्रियतृप्तीसाठी धडपड करत आहे. इथे साधे तत्वज्ञान आहे. सत्य,की "सगळ्यात पाहिलं आनंद घेऊ दे, श्रीकृष्णांना आनंद घेऊ दे. ते स्वामी आहेत. मग आपण आनंद घेऊ." तेन त्यक्तेन भुञ्जिथा. ईशोपनिषद सांगत सर्वकाही श्रीकृष्णांच्या मालकीचं आहे. ईशावास्यमिद सर्वं (ईशोपनिषद १) "सर्वकाही श्रीकृष्णांच्या मालकीचं आहे." श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे, पण आपण विचार करतो,"सर्वकाही माझ्या मालकीच आहे." ही माया आहे.

अहं ममेति (श्रीमद भागवतम ५.५.८)

अहं ममेति. जनस्य मोहोSयमहं ममेति. ही माया आहे. सगळे विचार करतात,"मी हे शरीर आहे, आणि सगळंकाही, जे काही या जगात सापडत, त्याचा उपभोग मी घेणार. हि संस्कृतीची चूक आहे. ज्ञान हे आहे: "सर्वकाही देवाच्या मालकीचे आहे. ते प्रेमळपणे जे काही घेण्याची अनुमती देतात ते मी घेतो." तेन त्यक्तेन भुञ्जिथा. हे वैष्णव तत्वज्ञान नाही; हे खरं आहे. कोणीही मालक नाही. ईशावास्यमिद सर्वं सगळं... श्रीकृष्ण सांगतात,मी भोक्ता आहे. मी मालक आहे."

सर्वलोकमहेश्वरम् (भ.गी. ५.२९)

महेश्वरम्. महा म्हणजे महान. आपण मालकी सांगू शकतो ईश्वरम, नियंत्रक, पण श्रीकृष्णनाचे वर्णन महेश्वरम असं केलंय "नियंत्रकांचा नियंत्रक." कोणीही स्वतंत्रपणे नियंत्रक नाही. म्हणून श्रीकृष्णनाचे वर्णन,केलंय,ह्रिषीकेश.

ह्रिषीकेन ह्रिषीकेश सेवनं भक्तिर उच्यते (चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०)

आणि भक्ती म्हणजे ह्रिषीकने ह्रिषीकेशची सेवा करणे. ह्रिषीक म्हणजे इंद्रिय. श्रीकृष्ण इंद्रियांचे स्वामी आहेत,आणि म्हणून, जिकही इंद्रिय मला मिळाली आहेत. श्रीकृष्ण स्वामी आहेत,श्रीकृष्ण मालक आहेत. तर जेव्हा आपली इंद्रिय इंद्रियांच्या स्वामींच्या समाधानासाठी गुंतवली जातात,त्याला भक्ती म्हणतात. ही भक्तीची व्याख्या आहे, भक्ती सेवा. आणि जेव्हा इंद्रिय, इंद्रिय संतुष्टी करण्यात गुंतवली जातात. स्वामींसाठी नाही, त्याला काम म्हणतात. काम आणि प्रेम. प्रेम म्हणजे श्रीकृष्णांवर प्रेम आणि सर्वकाही श्रीकृष्णांच्या समाधानासाठी करायचं. ते प्रेम. आणि काम म्हणजे सर्वकाही करायचं ते स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी. हा फरक आहे. इंद्रिय हे माध्यम आहे. एकतर आपण असं करू शकता, तुम्हची इंद्रिय संतुष्ट करा किंवा श्रीकृष्णांची इंद्रिय संतुष्ट करा. पण जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांची इंद्रिय संतुष्ट करता, तुम्ही परिपूर्ण बनता. आणि जेव्हा तुम्ही तुमची इंद्रिय संतुष्ट करता,तुम्ही अपूर्ण,तुमचा भ्रमनिरास होतो. कारण तुम्ही तुमची इंद्रिय संतुष्ट करू शकत नाही. ते श्रीकृष्णांशिवाय शक्य नाही

ह्रिषीकेन ह्रिषीकेश सेवनं भक्तिर उच्यते (चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०)

म्हणून आपण इंद्रिय शुद्ध केली पाहिजेत. आत्ताच्या क्षणी, प्रत्येकजण स्वतःची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

अहं ममेति जनस्य मोहोSयमहं (श्रीमद भागवतम ५.५.८)
पुंसा: स्रीया मैथुनी-भावम एतत

संपूर्ण भौतिक जग हे आहे... इथे स्त्री आणि पुरुष दोन जीव आहेत. पुरुष स्वतःची इंद्रिय संतुष्ट कारण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि स्त्रिया सुद्धा स्वतःची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला प्रेम म्हणतात... ते प्रेम नाही. ते शक्य नाही. कारण पुरुष आणि स्त्री,कोणीही इतर पक्षाच्या इंद्रियांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकजण त्याचे किंवा तिची इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्री पुरुषावर प्रेम करते ते स्वतःची इंद्रियतृप्ती करण्यासाठी, आणि पुरुष स्त्रीवर प्रेम करतो ते समाधानासाठी... म्हणून इंद्रियतृप्तीमध्ये थोडा काही गोंधळ झाला लगेच,घटस्फोट. "मला ते नको आहे."कारण केंद्र बिंदू स्वतःची इंद्रियतृप्ती आहे. पण आपण चित्र बनवू शकतो, प्रदर्शन,"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो." ते प्रेम नाही. याला काम म्हणतात,लालसा. या भौतिक जगात,प्रेमाची शक्यता असू शकत नाही. ते शक्य नाही तथाकथित, फसवं, फक्त फसवणूक आहे, "मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू सुंदर आहेस. ते माझ्या इंद्रियांना संतुष्ट करेल. कारण तू तरुण आहेस, ते माझ्या इंद्रियांना संतुष्ट करेल." हे जग आहे. भौतिक जग म्हणजे हे. पुमसः स्त्रिया मैथुनीभावमेतं संपूर्ण भौतिक जगाचे मूलभूत तत्व इंद्रिय संतुष्टी आहे.

यन्मैथुनादिगृहमेधिसुखं हि तुच्छं कण्डूयनेन करयोरिव दुःख दुःखं (श्रीमद भागवतम ७.९.४५) |