MR/Prabhupada 1078 - मन आणि बुद्धि चौवीस तास परमेश्वराच्या स्मरणात

Revision as of 08:48, 13 March 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1078 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


660219-20 - Lecture BG Introduction - New York


जेव्हा आपण चौवीस तास परमेश्वराच्या स्मरणात मन आणि बुद्धि या दोन्ही गोष्टीं केंद्रित करतो जेव्हा तुम्हाला परम परमेश्वराविषयी प्रेमाची तीव्र भावना प्राप्त होते, तेव्हा हे शक्य आहे की आपण आपले भौतिक कर्तव्य पार पाडत असताना परमेश्वराचे स्मरण करू शकतो . तर आपल्याला तसा भाव विकसित करणे आवश्यक आहे. जसे अर्जुन नेहमीच कृष्णाचा विचार करत असे . तो चौवीस तासामध्ये , एक सेकंदही कृष्णाला विसरू शकत नव्हता . सतत कृष्णाचा सहवास . त्याच वेळी, एक योद्धा म्हणून काम करत होता . भगवान कृष्णाने अर्जुनाला युद्ध सोडण्यास नाही सांगितले , जंगलात जा, हिमालयालात जा आणि ध्यान कर असे नाही सांगितले .

जेव्हा अर्जुनाला योग पद्धती चे अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला , त्याने ते नाकारले . की "ही पद्धत माझ्यासाठी शक्य नाही." मग परमेश्वर म्हणाले ,

योगिनाम् अपि सर्वेषां मद गतेनांतरात्मना (भ गी ६।४७) । मद गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां स मे युक्तामो मत: ।

तर जो नेहमीच परमेश्वराचे चिंतन करत असतो , तोच महान योगी आहे तो सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे, आणि त्याच वेळी तो सर्वात मोठा भक्तही आहे. भगवंत सुचवतात कि,

तस्मात सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च (भ गी ८।७) ।

"तू क्षत्रीय म्हणून युद्ध सोडू शकत नाही. पण त्याचवेळी जर तू माझे चिंतन करणे शिकले पाहिजे , ते शक्य आहे ",

अंत काले च मां एव स्मरण (भ गी ८।५), " मग मृत्यूच्या वेळीही माझे स्मरण होणे शक्य होईल " . मयि अर्पित मनो बुद्धिर् माम् एवैष्यसि असंशय: । पुन्हा तो म्हणतो यात काही संशय नाही . जर एखादा पूर्णपणे परमेश्वराच्या सेवेत अर्पण झाला आहे , परमेश्वराच्या अद्वितीय प्रेमपूर्वक सेवेत,
मयि अर्पित मनो बुद्धिर् (भ गी ८।७) ।

कारण आपण आपल्या शरीरासोबत प्रत्यक्षात कार्य करत नाही. आपण आपले मन आणि बुद्धी वापरून कार्य करतो. तर जर आपली बुद्धिमत्ता आणि मन नेहमी भगवंताच्या स्मरणात गुंतले असतील, तर नैसर्गिकरित्या आपली इंद्रिये प्रभूच्या सेवेमध्ये गुंततील . हेच भगवद्गीतेचे रहस्य आहे. आपल्याला ही कला शिकायची आहे , कशाप्रकारे दोन्ही मन आणि बुद्धि , यांना परमेश्वराच्या विचारात गुंतवू शकतो . आणि ते आपल्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मदत करेल किंवा आध्यात्मिक वातावरणात , या भौतिक शरीराला सोडल्यानंतर . आधुनिक शास्त्रज्ञ, ते एकत्र वर्षानुवर्षे प्रयत्न करीत आहेत, चंद्र ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याकडे अजूनपर्यंत कोणताही पध्दत नाही. परंतु येथे भगवद्गीतेमध्ये, येथे एक सूचना आहे. समजा एक माणूस आणखी पन्नास वर्षे जगतो आणि तो ... तर कोणीही पन्नास वर्ष त्याला आध्यात्मिक संकल्पनांमध्ये प्रगत होण्यासाठी प्रयत्न करत नाही. ही एक चांगली कल्पना आहे . पण दहा वर्ष किंवा पाच वर्षांसाठीही या प्रथेचा एखादा प्रामाणिक प्रयत्न करतो,

मयि अर्पित मनो बुद्धिर (भ गी ८।७)... हा फक्त सरावाचा प्रश्न आहे. आणि हा प्रयत्न भक्ती प्रक्रियेद्वारे फार सहज शक्य होऊ शकतो , श्रवणं . श्रवणं . सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे ऐकणे .

श्रवणं कीर्तनं विष्णो:
स्मरणं पादसेवनम्
अर्चनं वन्दनं दास्यं
सख्यमात्मनिवेदनम् (श्री भ ७।५।२३)

या नऊ प्रक्रिया आहेत , त्यात सर्वात सोपी प्रक्रिया आहे फक्त ऐकणे.