MR/Prabhupada 1080 - कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . एकच देव आहे - कृष्ण

Revision as of 10:21, 15 March 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1080 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


660219-20 - Lecture BG Introduction - New York


भगवद् गीते मध्ये सारांश सांगितल्याप्रमाणे - एकच देव कृष्ण आहे , कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही. शेवटच्या भागामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत ठामपणे सांगतात ,

अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: (भ गी १८।६६)

भगवंत जबाबदारी घेतात . जो प्रभूला शरण जातो, त्याची तो जबाबदारी घेतो , पापांच्या सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त करण्याची.

मल निर्मोचनं पुंसां
जल स्नानं दिने दिने
सकृद गीतामृत स्नानम
संसार मल नाषनम् (गीता महात्मय ३)

दररोज स्वतःला पाण्यामध्ये स्नान करून स्वच्छ करता येते, परंतु जो भगवद गीतेच्या पवित्र गंगे मध्ये मध्ये स्नान करतो , त्याचे गलिच्छ भौतिक जीवन पूर्णपणे नाश होते .

गीता सुगीता कर्तव्या
किमन्यै: शास्त्रविस्तरै:
या स्वयं पद्मनाभस्य
मुखपद्माद विनि:सृता (गीता महात्मय ४)

कारण भगवद-गीता हि परमेश्वराने स्वतः सांगितली आहे , लोकांनी .. लोकांनी इतर सर्व वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही . फक्त जर तो ध्यानपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतावाचतो आणि ऐकतो , गीता सुगीता कर्तव्या ... आणि एखाद्याने हे साधन सर्वप्रकारे अवलंबिले पाहिजे . गीता सुगीता कर्तव्य किमन्यै: शास्त्र-विस्तरै: . कारण वर्तमान काळातील लोक इतर अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत , सर्व वैदिक साहित्यात लक्ष घालणे त्यांना शक्य नाही. हे एक साहित्य ते पुरेसे आहे कारण हे सर्व वैदिक साहित्याचे सार आहे, आणि विशेषत: सर्व श्रेष्ठ ईश्वराने स्वतः मुखोद्गत केले आहे आहे .

भारतामृत सर्वस्वं
विष्णु वक्त्राद्विनि:सृतम्
गीता-गंगोदकं पीत्वा
पुनर्जन्म न विद्यते  :(गीता महात्मय ५)

असे म्हणतात की गंगा नदीचे पाणी जे पितात , ना सुद्धा मोक्ष मिळतो, मग भगवद् गीते विषयी काय बोलावे ? भगवद् गीता संपूर्ण महाभारत मधले अमृत आहे,आणि भगवान विष्णूंद्वारे बोलली गेली आहे. भगवान कृष्ण हे मूळ विष्णू आहेत . विष्णु वकृताद्विनि:सृतम । हे सर्वश्रेष्ठ ईश्वरीय व्यक्तिमत्वाच्या तोंडून निघत आहे . आणि गंगोदकम , असे म्हटले जाते की गंगा प्रभुंच्या कमल चरणातून प्रकट झाली आहे , आणि भगवद्गीता भगवंताच्या मुखातून प्रकट झाली आहे . अर्थात, परमेश्वराच्या मुखामध्ये आणि चरण कमळामध्ये काही फरक नाही. तरीही तटस्थ स्थितीतून आपण भगवद्गीता गंगेच्या पाण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे असे समजून याचा अभ्यास करू शकतो.

सर्वोपनिषदो गावो
दोग्धा गोपालनन्दन:
पार्थो वत्स: सुधीर् भोक्ता
दुग्धं गीतामृतं महत् (गीता महात्मय ६)

फक्त ... हे गीतोपनिषद हे गायीप्रमाणे आहे, आणि भगवान हे गौ बाळ म्हणून प्रसिद्ध आहेत ,आणि तो या गायीचे दूध काढत असे . सर्वोपनिषदो . आणि हे सर्व उपनिषदांचा सार आहे आणि ज्याला गायीची उपमा दिली आहे. आणि प्रभु प्रवीण गोपालक आहेत ते गायीचे दूध काढत आहेत . आणि पार्थो वत्स .आणि अर्जुन वासराप्रमाणे आहे . आणि सुधीर भोक्ता . आणि विद्वान आणि शुद्ध भक्त हे दूध पिण्यास पात्र आहेत . सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् . अमृत, भगवद्गीतेचे दुध, विद्वान भक्तांसाठी आहे .

एकं शासत्रं देवकीपुत्रगीतम्
एको देवो देवकीपुत्र एव
एको मंत्रस्तस्य नामानि यानि
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा (गीता महात्मय ७)

आता जगाने भगवद् गीते कडून ज्ञानाचा धडा शिकला पाहिजे . एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् । एकच शास्त्र आहे, एक सामाईक ग्रंथ संपूर्ण जगासाठी , संपूर्ण जगभरातील लोकांसाठी , आणि ते आहे भगवद्गीता . देवो देवकीपुत्र एव . आणि संपूर्ण जगासाठी एकच ईश्वर आहे, श्रीकृष्ण . आणि एको मन्त्रस्यतस्य नामानि । आणि एक भजन, एक मंत्र, एक स्तोत्र केवळ, एक प्रार्थना , किंवा एक भजन, जे आहे त्याचे नाव जपणे , हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे । एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापि एकं तस्य देवस्य सेवा । आणि केवळ एक काम आहे, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराची सेवा करणे . जर भगवद्गीतेकडून शिकले तर मग लोक इच्छुक आहेत , एक धर्म, एक देव, एक शास्त्र, एक व्यवसाय किंवा जीवनाचे एक कार्य असण्यात इच्छुक आहेत . याचा सारांश भगवद्गीतेमध्ये आहे. कि एक ,एक देव , कृष्ण . कृष्ण हा सांप्रदायिक देव नाही . कृष्ण नावापासून ... कृष्ण म्हणजे, आपण वर सांगितल्याप्रमाणे, कृष्णाचा अर्थ आहे परम आनंद .