MR/Prabhupada 0004 - कोणत्याही मूर्खपणा शरण करू नका



Lecture on BG 10.2-3 -- New York, January 1, 1967

कार्यपध्दती आहे... ते सुद्धा भगवद गीते मध्ये नमूद केले आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया (भ.गी. ४.३४) जर तुम्हाला ते दिव्य विज्ञान समजून घ्यावयाचे आहे , तर तुम्हाला हे नितीतत्त्व अनुसरण करावे लागेल. ते काय आहे? तद्विद्धि प्रणिपातेन. तुम्हाला शरण जावे लागेल. एकच गोष्ट: फक्त जसे की नमन्ताएवा. जो पर्यंत तुम्ही दुसर्‍याचे वर्चस्व स्वीकारणारे होत नाही, तो पर्यंत तुम्ही एक शरणागत आत्मा होऊ शकत नाही. आणि कुठे ? प्रणिपात. अशी व्यक्ती आपणास कुठे आढळेल तो आहे... येथे एक व्यक्ती आहे जिथे मी शरण जाऊ शकतो. तर मग ह्याचा अर्थ असा आपणास एक छोटीसी चाचणी करावयास लागणार की आपण कोणास शरण जायचे. तेव्हडे मुबलक ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. कुठेही निरर्थक शरण जाऊ नका. तुम्हाला करावे लागेल... आणि ती बुद्धिमत्ता किंवा निरर्थकता कशी शोधून काढू शकतो? त्याचा शास्त्रा मध्ये देखील उल्लेख केलेला आहे. त्याचा कठ उपनिषद् मध्ये उल्लेख केलेला आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परि... (भ.गी. ४.३४). कठ उपनिषद् असे सांगतो की तद्-विज्नानार्थं स गुरुम् एवाभिगच्छेत् श्रोत्रियं ब्रह्म्-निष्ठम् [मु.उ.१.२.१२] हा श्रोत्रियं म्हणजे तो जो गुरूशिष्य परंपरे द्वारे आलेला आहे. आणि ह्याला काय पुरावा आहे की तो गुरूशिष्य परंपरे अंतर्गत आलेला आहे ? ब्रह्म्-निष्ठम्. ब्रह्म्-निष्ठम् म्हणजे त्याला परम सत्या विषयी पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला शरण जायचेच आहे. प्रणिपात. प्रणिपात. म्हणजे प्रक्र्ष्ट-रूपेण निपातम्, अट नाही.. जर तुम्ही अशी व्यक्ती शोधून काढली, मग तिथे शरण जा. प्रणिपात. आणि त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करा, त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा, आणि प्रश्न विचारा. सगळ्या गोष्टी उघड होतील. तुम्हाला अशी अधिकृत व्यक्ती शोधून काढलीच पाहिजे आणि त्याला शरण जा. त्याला शरण जाणे म्हणजे भगवंताना शरण जाणे कारण तो भगवंताचा प्रतिनिधी आहे. पण तुम्हाला प्रश्न करण्याची अनुमती आहे, वेळेचा अपव्यय करण्यासाठी नाही, पण आकलन होण्यासाठी. त्याला परिप्रश्न म्हणतात. ह्या काही कार्यपद्धती आहेत. तेथे सर्व काही आहे. आपल्याला फक्त ते स्वीकार करायचे आहे. पण आपण जर कार्यपद्धती स्वीकार केली नाही आणि फक्त उन्मादा मध्ये आपला वेळ वाया घालवला आणि तर्क आणि सर्व मूर्खपणाचे उपक्रम, आश्चर्य, जे कधीही शक्य नाही. तुम्ही कधीही समझू शकणार नाही भगवंत म्हणजे काय आहे. कारण भगवंत हे देवतांद्वारे सुद्धा समजण्याजोगे नाहीत आणि महान महर्षिंद्वारे सुद्धा. आमचा लहान प्रयत्न काय आहे? अशा आहेत कार्यपध्दती. आणि जर तुम्ही अनुसरण केले, असम्मूढः ,असम्मूढः , जर तुम्ही सिद्धांताचे पालन केलेत आणि मंद पण खात्रीलायक, असम्मूढः , कोणत्याही शंका विना, जर तुम्ही केले... म्हणजेच... प्रत्यक्षावगमं धर्म्यं जर तुम्ही अनुसरण केले, तुम्हाला अर्थ समजेल, स्वतःला , "होय, मला काहीतरी मिळत आहे" ते तसे नाही के तुम्ही दृष्टीहीन आहात, तुम्ही विचार न करता अनुसरण करीत आहात. जसे तुम्ही सिद्धांताचे अनुसरण कराल, तुम्ही समजू शकाल. फक्त जसे की तुम्ही योग्य पोषक खादयपदार्थ खाता, तुम्हाला स्वतःला सामर्थ्य अनुभवते, आणि तुमची भूक भागते. तुम्हाला कोणालाही विचारावे लागत नाही. तुम्हाला स्वतःला अनुभवेल . त्याचप्रमाणे, जर तुम्ही योग्य मार्गावर आलात, आणि जर तुम्ही सिद्धांताचे पालन कराल, तुम्हाला कळेल, "होय, मी प्रगती करत आहे." प्रत्यक्षा... नवव्या अध्यायामध्ये त्याने सांगितले आहे प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं. आणि ते अतिशय सुलभ आहे. आणि आपण आनंदी मनाच्या स्थितीत करू शकता. आणि काय कार्यपद्धती आहे ? आम्ही हरे कृष्णा जप करतो, आणि श्रीकृष्ण-प्रसाद् खातो आणि भगवद-गीता तत्वज्ञान शिकतो, चांगले ध्वनी संगीत एकतो. हे खूप अवघड आहे का ? हे खूप अवघड आहे का ? अजिबात नाही. अशा प्रकारे या कार्यपध्दती द्वारे आपण व्हाल असम्मूढः कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही. परंतु तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेण्यास इच्छुक असाल जेणेकरून पुष्कळ ढोंगी आहेत. अशा प्रकारे ढोंगी आणि फसवणूक झालेल्यांचा समाज घडवू नका. फक्त गुरूशिष्य परंपरा प्रणालीचे पालन करा प्रत्यक्षात वैदिक साहित्यात ती निर्धारित केलेली आहे, प्रत्यक्षात श्रीकृष्णाने शिफारस केली आहे. ती अधिकृत स्रोत मार्गाने समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यात ती लागू करण्याचा प्रयत्न करा. तर मग असम्मूढः स मर्त्येषु. मर्त्येषु म्हणजे... मर्त्या म्हणजे जे कोण मरणोन्मुख पात्र आहेत. कोण आहेत? हे बद्ध जीव, ब्रह्मा पासून आरंभ करून ते क्षुद्र मुंगी पर्यंत, ते सर्व मर्त्या आहेत. मर्त्या म्हणजे ती एक वेळ आहे जेव्हा ते मृत्यू पावणार आहेत. अशा प्रकारे मर्त्येषु . बेसुमार मरणोन्मुख समवेत तो सर्वाधिक बुद्धिमान बनतो. असम्मूढः स मर्त्येषु. का? सर्वपापै: प्रमुच्यते. तो पापयुक्त कृतिंमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या कर्मफलांपासून मुक्त आहे. या जगभरात, या भौतिक जगतामध्ये, मला असे सांगायचे आहे, हेतुपरस्पर किंवा अजाणतेपणे, आम्ही सर्व नेहमी पापयुक्त क्रिया करतच असतो. अशा प्रकारे आपल्याला या कर्मफलांपासून मुक्त झालेच पाहिजे. आणि त्यापासून कसे मुक्त झाले पाहिजे? आणि ते सुद्धा भगवद-गीते मध्ये नमूद केले आहे.. यज्ञार्थात्कर्मणोSन्यत्र लोकोSयं कर्मबन्धनः (भ.गी.३.९). जर तुम्ही केलत, केवळ श्रीकृष्णा करिता कर्म करा... यज्ञ म्हणजे विष्णू किंवा श्रीकृष्ण. जर तुम्ही फक्त श्रीकृष्णाकरिता कर्म केलेत, तर कुठल्याही कर्मफलांपासुन​ आपण मुक्त आहात. शुभाशुभ-फलैः. आम्ही काहीतरी शुभ किंवा अशुभ करीत असतो. पण जे कोणी कृष्णभावनाभावित आहेत आणि त्याप्रमाणे कर्म करीत आहेत, त्याला शुभ किंवा अशुभ काय आहे ह्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. कारण तो सर्वात जास्त शुभ संपर्कात आहे, श्रीकृष्ण. जेणेकरून म्हणून सर्वपापै: प्रमुच्यते. तो पापयुक्त कृतिंमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या कर्मफलांपासून मुक्त होतो. ही कार्यपद्धती आहे. आणि जर आपण ह्या कार्यपद्धतीचा अवलंब केला, जेणेकरून शेवटी आपण श्रीकृष्णांच्या सानिध्यात येऊ शकतो. आणि आमचे आयुष्य यशस्वी बनते. ही कार्यपद्धती अगदी सोपी आहे, आणि आपणास शक्य आहे, प्रत्येकजण अवलंब करू शकतो. अतिशय आभारी आहे.