MR/Prabhupada 0017 - अध्यात्मिक ऊर्जा आणि साहित्य ऊर्जा



Lecture on Sri Isopanisad, Mantra 1 -- Los Angeles, May 2, 1970

ह्या भौतिक जगतात दोन शक्ति कार्यशील असतात : आध्यात्मिक शक्ति आणि भौतिक शक्ति. भौतिक शक्ति म्हणजे ही आठ प्रकारची भौतिक मूलतत्वे होत. भूमिरापोSनलो वायु: (भ.गी.७.४) पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी, आणि अहंकार. हे सर्व भौतिक आहेत, आणि तसेच सूक्ष्म, सूक्ष्म, सूक्ष्म, सूक्ष्म आणि मोठा, मोठा, मोठा, मोठा. ज्याप्रमाणे पाणी हे पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे, त्यानंतर अग्नी हा पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे, नंतर वायू हा अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे, नंतर आकाश, किंवा अंतरिक्ष, वायुपेक्षा सूक्ष्म आहे. तसेच, बुद्धी ही आकाशापेक्षा सूक्ष्म आहे, किंवा मन हे आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. मन... तुम्हाला माहीत आहे, मी खूप वेळा उदाहरण दिली आहेत: मनाची गति. कितीतरी हजारो मैल काही सेकंदात तुम्ही जाऊ शकता. जितका तो सूक्ष्म होतो, तेव्हडा शक्तिशाली. त्याचप्रमाणे, शेवटी, जेव्हा तुम्ही अध्यात्मिक भागात येतात, सूक्ष्म, ज्यापासून सगळे उत्पन्न होते, अरे, ते फारच शक्तिशाली असते. ती आध्यात्मिक शक्ति, ते भगवद गीते मध्ये नमूद केले आहे. ती आध्यात्मिक शक्ति काय आहे? ती आध्यात्मिक शक्ति म्हणजे हे जीव आहेत. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् (भ.गी.७.५). श्रीकृष्ण म्हणतात, "ह्या भौतिक शक्ति आहेत, या पलीकडे आणखी एक आहे, आध्यात्मिक शक्ति." अपरेयम. अपरा म्हणजे कनिष्ठ. अपरेयम. "ही सर्व वर्णन केलेली भौतिक तत्वे, ती कनिष्ठ शक्ति आहेत. आणि या पलीकडे सर्वोच शक्ति आहे, माझ्या प्रिय अर्जुना." ते काय आहे? जीवभूतां महाबाहो: "हे जीव." त्या सुद्धा शक्ति आहेत, आम्ही जीव, आम्ही सुद्धा शक्ति आहोत, पण श्रेष्ठ शक्ति. किती श्रेष्ठ? कारण ययेदं धार्यते जगत् (भ.गी.७.५). श्रेष्ठ शक्ति ही कनिष्ठ शक्तिला नियंत्रित करत आहे. जडत्वाला शक्ति नसते. मोठे विमान, आकर्षक यंत्र, आकाशात उडत आहे, भौतिक गोष्टींनी बनले आहे. पण अध्यात्मिक शक्ति जर नाही तर, वैमानिक, तिथे आहे, ते निरुपयोगी आहे, ते निरुपयोगी आहे. हजार वर्ष जेट विमान विमानतळावर उभे असेल; छोटा कण आध्यात्मिक शक्ति जर नसेल तर ते उडू शकणार नाही, तो वैमानिक, येईल आणि हात लाविल. त्यामुळे देव समजण्यास अडचण काय आहे? म्हणून साधी गोष्ट, की जर हे अवाढव्य यंत्र ... जेणेकरून अनेक अवाढव्य यंत्र सामुग्री आहेत, त्यांना आध्यात्मिक शक्तिचा स्पर्श न करता हलवू शकत नाही, एक मानव किंवा एक जीवित. तुम्ही ही अपेक्षा कशी करू शकता की ही संपूर्ण भौतिक शक्ति स्वयंचलित आहे किंवा कोणाच्याही नियन्त्रणाशिवाय? कसे आपण त्या मार्गाने आपल्या वितर्क लावू शकता? हे शक्य नाही. म्हणूनच कमी बद्धी असलेल्या वर्गातली माणसे, त्यांना हे कळू शकत नाही की ही भौतिक शक्ति सर्वोत्तम भगवान कसे नियंत्रित करतात.