MR/Prabhupada 0023 - मरण्यापूर्वी कृष्णा जाणिव व्हा



Sri Isopanisad Invocation Lecture -- Los Angeles, April 28, 1970

तर इथे सांगितलं गेलाय कि, हे विश्व काळाने नियंत्रित आहे.. हा काळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचीच शक्ती आहे.. हे विश्व सुद्धा एक विशाल शरीर आहे... भौतिक शरीर.. जसं कि तुमचं शरीर.. सगळं काही सापेक्ष आहे.. आधुनिक विज्ञान, सापेक्षतेचा सिद्धांत... एक अणु, एक सूक्ष्म कण, एक मुंगी.. तर ह्या सगळ्यांचं जीवन सापेक्ष आहे... तुमचेहि जीवन सापेक्षच आहे. त्याच प्रमाणे.. हे विश्व.. हे विशाल शरीर.. हे विश्व करोडो वर्षांपर्यंत अस्तित्वात असेल... पण हे कधीच कायमचं अस्तित्वात नसेल... हि वस्तुस्थिती आहे.. हे विश्व एवढं विशाल आहे म्हणून, हे काही करोड वर्षं अस्तित्वात असेल... पण ह्याचा विनाश नक्की होईल.. हा नैसर्गिक नियम आहे.. आणि जेव्हा तो काळ पूर्ण होईल, तेव्हा ह्या क्षणिक प्रकटीकरणाचा अंत होईल... ..आणि हे पूर्ण सत्याच्या पूर्ण योजने मार्फत होईल. जेव्हा तुमचा काळ संपेल तेव्हा... नाही.. ह्या शरीरात आणखीन तुमचं अस्तित्व नाही... कोणीच हे टाळू शकत नाही.. ही यंत्रणा इतकी बलशाली आहे... कोणीच असं नाही म्हणू शकत कि मला आणखीन काही काळ इथे राहू दे... हे असंच घडतं... जेव्हा मी भारतात होतो, अलाहबाद मध्ये, तेव्हा आमचा एक.. खूप चांगलं मित्र.. तो खूप श्रीमंत हि होता.. तर त्याचा अंत जवळ आला होतं.. तर तो डॉक्टर ला जीव तोडून विनंती करीत होता कि "कृपा करून मला आणखीन कमीत कमी ४ वर्षांचं आयुष्य द्या.." "... माझ्या काही योजना आहेत जे मी पूर्ण नाही करू शकलो." बघितलंत.. आशा पाश शतैर बद्धाः... हे सगळं असुरी आहे... प्रत्येक जण विचार करतो.. "ओह! मला हे करायचंय, मला ते करायचंय..." नाही... डॉक्टर असो वा त्याचा बाप अथवा त्याच्या बापाचा बाप... कोणी वैज्ञानिक हे ठ्माबावू शकत नाही... "नाही ओ.. चार वर्ष काय.. चार मिनिटे देखील मिळणार नाहीत... तुम्हाला त्वरित जावे लागेल.." हा नियम आहे.. तर हि वेळ यायच्या अगोदर, व्यक्ती ने तत्परतेने कृष्ण भावनेचा अंगीकार केला पाहिजे... तूर्णं यतेत.. तूर्णं म्हणजे तत्परतेने.. अति तत्परतेने कृष्ण भावनेचा साक्षात्कार झाला पाहिजे.. अनु.. पाठोपाठ.. मृत्यू च्या पूर्वी, पुढील मृत्यू येते... त्याच्या आत तुम्ही तुमचं उरलेलं कार्य संपवायला हवं.. ह्याला बुद्धीमानी म्हणतात... नाही तर विनाश.. धन्यवाद!