MR/Prabhupada 0025 - आम्ही अस्सल गोष्ट देऊ , ते काम करणार



Conversation with Yogi Amrit Desai of Kripalu Ashram (PA USA) -- January 2, 1977, Bombay

योगी अमृत देसाई: माझ्या मनात तुमच्या साठी खूप प्रेम आहे आणि दर्शनासाठी याव अस वाटल. प्रभुपाद: धन्यवाद

योगी अमृत देसाई: मी भक्तांशी बोलत होतो. मी सांगितले की तुम्ही... प्रभुपाद: तुम्ही डाॅ मिश्र बरोबर आलात का?

योगी अमृत देसाई: नाही. मी इथे सर्व भक्तांना सांगत होतो. मी सांगितलं कि श्री प्रभुपाद हे पहिले मनुष्य आहेत ज्यांनी भक्ती पश्चिमेत पोचवली, जिथे सर्वात जास्त गरज आहे. कारण तिथे ते खूप विचार करतात. प्रेम मार्ग इतका खोल आहे. प्रभुपाद: हे पहा. तुम्ही प्रत्यक्ष अस्सल गोष्ट सादर केली

योगी अमृत देसाई: अतिशय अस्सल. प्रभुपाद: ती सफल होईल.

योगी अमृत देसाई: त्यामुळे ती सुंदर वाढत आहे, कारण ती अस्सल आहे. प्रभुपाद: आणि त्यांना अस्सल गोष्ट देणे भारतीयांचे कर्तव्य आहे. ते पर-उपकार आहे. माझ्या आधी हे सर्व स्वामी आणी योगी फसवणुक करायला तिथे गेले होते.

योगी अमृत देसाई: नाही, ते मान्य होणार नाही अशी भीती वाट्ल्यामुळे ते सत्य सांगायला घाबरले होते. प्रभुपाद: त्यांना सत्य काय आहे हे माहित नव्हते. (हसणे) घाबरले नव्हते. का? जर तो सत्याच्या मार्गावर आहे, तर त्याला भीती का असावी?

योगी अमृत देसाई: बरोबर आहे.

प्रभुपाद: विवेकानंदांना देखील सत्य काय आहे हे माहित नव्हते.

योगी अमृत देसाई: सर्व मार्ग, योग्य. हे पहा, आपण आल्यावर... मी 1960 मध्ये तिथे होतो. मी योग शिकवायला सुरुवात केली. पण आपण आल्यावर मी निर्भयपणे भक्ती आणि मंत्र जाप शिकवू लागलो. त्यामुळे आता आश्रममध्ये भक्ती बरीच आहे, खूप भक्ती आहे. ती त्यांना द्यायची मला भीति वाटत होती म्हणून तुम्हांला दिली. कारण मी विचार केला, "ते ख्रिस्ती आहेत. त्यांना इतकी भक्ती आवडणार नाही. त्यांना गैरसमज होइल." पण आपण एक चमत्कार केला आहे. देव, श्रीकृष्ण, ह्यांनी आपल्या माध्यमातून चमत्कार केला आहे. ते पृथ्वीवर खूप आश्चर्यकारक, महान चमत्कार आहे. मला त्याबद्दल खात्री आहे.

प्रभुपाद: तुमचा उदारपण तुमच्या वाक्यात झळकतो. आपण अस्सल वस्तू दिली, तर ती जरूर फळते.

योगी अमृत देसाई: अगदी बरोबर. मी सुद्धा तेच करत आहे. सगळे.... आश्रमात कायमस्वरूपी राहणारे सुमारे 180 लोक आहेत, आणि ते सर्व ब्रह्मचर्य पाळतात. प्रत्येकजण 4:00 वाजता जागा होतो, आणि 9:00 वाजता झोपतो. आणि ते एकमेकांना स्पर्श देखील करत नाही. ते सगळे वेगवेगळ्या क्वाॅर्टर मध्ये झोपतात. ते सत्संग मध्ये सुद्धाअगदी वेगवेगळे बसतात. सर्व काही कठोर शिस्तीत्. नशा नाही, दारू नाही, मांस नाही, चहा नाही, कॉफी नाही, लसूण नाही, कांदा नाही. शुद्ध.

प्रभुपाद: खूप चांगलं आहे. होय. आम्ही हे सर्व पाळतो.

योगी अमृत देसाई: होय.

प्रभुपाद: पण तुमच्या कडे विग्रह आहेत का?

योगी अमृत देसाई: होय. प्रभु श्रीकृष्ण आणि राधा आमचे विग्रह आहेत. माझे गुरू स्वामी क्रुपालू-आनंदी आहेत. ते... बडोदा जवळ त्यांचे आश्रम आहे. त्यांनी २७ वर्षे साधना केली, आणि १२ वर्षे मौन पाळले. अनेक लोकांच्या विनंती मुळे गेल्या काही वर्षांत ते वर्षातून एकदा किंवा दोनदा बोलत आहेत.

प्रभुपाद: ते जाप करत नाहीत?

योगी अमृत देसाई: ते जाप करतात. मौन दरम्यान, ते जाप करू शकतात. कारण ते म्हणतात ... आपण जेव्हा प्रभूंचे नाव घेतो, ते म्हणजे मौन तोडणे नव्हे म्हणून ते जाप करतात.

प्रभुपाद: मौन म्हणजे निरर्थक गोष्टींची चर्चा न करणे. आपण हरे कृष्ण जाप करू शकतो. हेच खरे मौन. विफळ वेळ घालवण्यापेक्शा हरे कृष्ण चा जाप करावा. ते सकारात्मक आहे. आणि शांतता नकारात्मक आहे. निरर्थक गोष्टींची चर्चा बंद करा. अर्थपूर्ण गोष्टी करा.

योगी अमृत देसाई: बरोबर! हे योग्य आहे.

प्रभुपाद: परम दृष्ट्व निवर्तते (भ.गी. २.५९).परम दृष्ट्व निवर्तते. निरर्थक गोष्टींची चर्चा बंद केली तर श्री कृष्ण...परम दृष्ट्व निवर्तत. आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या की आपण नैसर्गिकरित्या कचराचा त्याग करतो.. म्हणुन सगळ्या भौतिक गोष्टी कचराच आहेत. कर्म, ज्ञान, योग, सर्व भौतिक आहे. कर्म, ज्ञान, योग, योग सुद्धा, सर्व भौतिक आहे.