MR/Prabhupada 0046 - तुम्ही पशु बनू नका - प्रतिकार करा



Morning Walk -- May 28, 1974, Rome

योगेश्वर: जाण्यापुर्वी भगवान माझ्याकडे प्रश्नांची एक यादी देऊन गेला आहे , मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो ?

प्रभुपाद: हो

योगेश्वर: एक समस्या जी सतत घडताना दिसत आहे , आतन्कवाद्यांचा प्रादुर्भाव सांगायचा अर्थ असा की, जे लोक काही राजकीय, मुख्यत्वे राजकीय कारणांसाठी प्रेरित असतात.

प्रभुपाद: पूर्ण मूळ सिद्धांत जे मी आधीच समजावले आहे , कारण ते पशु आहेत . तर काहीवेळा क्रूर प्राणी . बस . प्राणी . विविध प्रकारचे प्राणी आहेत . वाघ आणि सिंह , ते क्रूर प्राणी आहेत . पण तुम्ही पशू समजात राहत आहात . तर पशू समाज , इतर काही प्राणी जे अतिशय क्रूर असतात ,त्यात काही आश्चर्यकारक नाही. अखेर, तुम्ही पशू समाजात रहात आहात. तर तुम्ही मनुष्य बना , आदर्श व्हा . हाच एकमेव उपाय आहे . आम्ही आधीच जाहीर केले आहे, हा पशू समाज आहे , एखादा भयंकर प्राणी बाहेर येतो, त्यात काय आश्चर्य आहे ? शेवटी हा पशू समाजच आहे वाघ येतो किंवा हत्ती येतो , ते सर्व प्राणीच आहेत .

पण तुम्ही पशू बनू नका . विरोध करा . त्याची गरज आहे . मनुष्याला समंजस प्राणी म्हंटलं जातं . जर तुम्ही तर्क कराल , ते आवश्यक आहे . जर तुम्ही एक पशु बनून राहिलात , एक वेगळ्या प्रकाराचा पशू , तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही . तुम्हाला वास्तवात मनुष्य बनाव लागेल . परंतु ,

दुर्लभं मानुषं जन्म तद अपि अध्रुवं अर्थदं (श्री भ ७।६।१ )

हे लोग , त्यांचं जीवनात काही ध्येय नाही . मानवाचं ध्येय काय आहे ते जाणत नाहीत . तर त्यांची पशू प्रवृत्ति समायोजित केली जाते , या प्रकारे , त्या प्रकारे , या प्रकारे ,त्या प्रकारे . जसे ते नग्न नृत्य पाहायला जातात . पशू प्रवृत्ति , तो त्याच्या पत्नीला रोज नग्न पाहत आहे . आणि तरी तो नग्न नृत्य पाहायला जातोय , आणि काही पैसे भरतोय . कारण या पशुते व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच प्रतिबद्धता नाही. हो कि नाही ? तर दुसऱ्या स्त्रीला नग्न पाहण्यात काय अर्थ आहे ? तुम्ही प्रत्येक दिवस , प्रत्येक रात्र ,तुमच्या पत्नीला नग्न पाहत आहात . का तुम्ही ? ... कारण त्यांना दुसऱ्या कशाची ओढ नाही . पशू .

पुन: पुनश चर्वित चर्वनानां (श्री भ ७।५।३० )


जसे कुत्रा , कुत्र्याला चव काय आहे हे माहीत नाही . तो केवळ चावत आहे, एक हड्डी , इथून , तिथून ,इथून ,तिथून , कारण तो पशू आहे .त्याला दुसऱ्या कशाची ओढ नाही . तर हा पूर्ण समाज पशू आहे . विशेष रूपाने पाश्चिमात्य . आणि त्यांनी त्या पशु प्रवृत्तीवर आधारित एक संस्कृती बनवली आहे , म्हणजे " मी हे शरीर आहे , आणि माझ्या जीवनाचा सर्वोत्तम उपयोग इंद्रिय तृप्ती आहे ." हे पशुवत आहे . "मी हे शरीर आहे " शरीर म्हणजे इंद्रिये . " आणि इंद्रियांना संतुष्ट करणं ही उच्चतम पूर्णता आहे . " ही त्यांची संस्कृती आहे . तर तुम्हाला वास्तविक मानवी संस्कृतीचा परिचय द्यावा लागेल. तुम्ही आश्चर्यचकित नका होऊ , जर पशु , वेगळ्या रूपात , वेगळ्या आकारात , बाहेर येईल , अखेर तो प्राणी आहे . मूलभूत सिद्धांत आहे पशुता . कारण तो विचार करत आहे , " मी हे शरीर आहे ..." जसे कुत्रा विचार करत आहे , " मी कुत्रा आहे , अतिशय ताठ आणि मजबूत कुत्रा ."

तर दुसरा मनुष्य विचार करत आहे , " मी मोठे राष्ट्र आहे ." पण मूलभूत सिद्धांत काय आहे ? एक कुत्रा देखील त्याच्या शरीराच्या आधारावर विचार करत आहे, आणि हे मोठे राष्ट्र सुद्धा शरीराच्या आधारावर विचार करत आहे. तर या कुत्र्यात आणि या मोठ्या राष्ट्रात काही फरक नाही आहे . फरक फक्त इतकाच आहे कि , मनुष्याला निसर्गाची भेट म्हणून अधिक चांगली इंद्रिये मिळाली आहेत . आणि त्याच्याकडे शक्ति नाही किंवा शिक्षण नाही या इंद्रियांचा योग्य उपयोग करून घ्यायला कसे अध्यात्मात अग्रेसर व्हावे , आणि या भौतिक जगातून मुक्त व्हावे. त्याचे ज्ञान त्याला नाही . तो त्या चांगल्या बुद्धिमत्तेचा वापर केवळ पशुतेसाठी करत आहे . हा अर्थ आहे . त्याच्याकड़े शिक्षण नाही कि कसा या चांगल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा . म्हणून तो केवळ पशुता वापरत आहे . आणि संपूर्ण जगभरातील लोक जेव्हा पाश्चिमात्यांना बघतात , "ते प्रगत आहेत " ते काय आहे ? पशुतेची प्रगती . मूलभूत सिद्धांत तोच राहतो पशुता . ते आश्चर्यचकित होतात . ते सुद्धा अनुकरण करतात . तर ते पशुतेचा विस्तार करत आहेत , पशु संस्कृति . आता आपल्याला मानवी सभ्यतेच्या फायद्यासाठी प्रतिकार करण्याची गरज आहे.