MR/Prabhupada 0058 - आध्यात्मिक शरीर म्हणजे अनंतकाळचे जीवन



Lecture on BG 2.14 -- Mexico, February 14, 1975

वास्तविक, आध्यात्मिक शरीर म्हणजे परमानंद आणि ज्ञानाचे शाश्वत जीवन. आम्ही आता धरण केलेले हे शरीर, भौतिक शरीर. ते शाश्वत ही नाही, ना परमानंदी, ना संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण. आपल्यापैकी प्रत्येकाला, माहीत आहे की हे भौतिक शरीर नश्वर आहे. आणि संपूर्ण अज्ञानात आहे. आम्ही काहीही सांगू शकत नाही, ह्या भिंती पलीकडे काय आहे. आम्हाला इंदीये आहेत, पण ती सगळी मर्यादित आहेत, सदोष. काहीवेळा, आम्हाला बघण्याचा खूपच अभिमान वाटतो आणि आव्हान देतो, " तुम्ही मला देव दाखवू शकता?" आपण लक्ष्यात ठेवायला विसरतो की जसा प्रकाश निघून जातो, माझी बघण्याची शक्ति निघून जाते. त्यामुळे हे संपूर्ण शरीर हे सदोष आहे आणि अज्ञानरूपी आहे. आध्यात्मिक शरीर म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण, एकदम विरुद्ध. आपल्याला ते शरीर पुढच्या जीवनात मिळू शकते, आणि आपल्याला त्या प्रकारचे शरीर कसे मिळेल या साठी जोपासले पाहिजे. आम्ही उच्च सूर्यमालेच्या प्रणाली मध्ये पुढील शरीर मिळण्यासाठी जोपासू शकतो. किंवा आम्ही कुत्रे आणि मांजरा सारखे पुढील शरीर मिळण्यासाठी जोपासू शकतो, आणि आम्ही असे शरीर शाश्वत, परमानांदी ज्ञाना प्रमाणे जोपासू शकतो. त्यामुळे सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्ती परमानंदी, ज्ञानी, अनंत काळासाठी पुढचे शरीर मिळवण्याचा प्रयत्न करेल. ते भगवद गीते मध्ये स्पष्ट केलेले आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम (भ.गी. १५.६). त्या जागी, त्या ग्रहावर, किंवा त्या आकाशात, जिथे जाल आणि तुम्ही या भौतिक जगात परत कधीच येणार नाही. या भौतिक जगात, जरी तुम्ही उच्च सूर्यमालेच्या प्रणालीत उन्नत झालात, ब्रह्मलोक, तरीही, तुम्हाला इथे परतून यावे लागेल. आणि आध्यात्मिक जगात जाण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले, घरी परत, जाऊ देवाचीया गावात, तुम्ही हे भौतिक शरीर स्वीकारण्यासाठी पुन्हा नाही येणार.