MR/Prabhupada 0061 - हे शरीर त्वचा, हड्डी, रक्ताची एक पिशवी आहे



Northeastern University Lecture -- Boston, April 30, 1969


माझ्या प्रिय मुलांनो आणि मुलींनो , या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल खूप धन्यवाद . आपण हि कृष्ण भावना चळवळ पसरवत आहोत कारण या चळवळीची अत्यंत गरज आहे संपूर्ण जगात , आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे . तोच फायदा आहे . सर्व प्रथम, दिव्य स्तर म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जगण्याच्या स्थितीचा विचार केला तर आपण वेगवेगळ्या स्तरावर आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम दिव्य स्तरावर येणे आवश्यक आहे. त्यानंतर दिव्य ध्यानाचा प्रश्न येतो . भगवद-गीतेत , तिसऱ्या अध्यायात , आपल्याला सापडेल की बद्ध जीवनाचे विविध दर्जे आहेत . इन्द्रियाणि पराणि अहुर् .. (भ गी ३।४२ ) । संस्कृत, इन्द्रियाणि ।

सर्वप्रथम जीवनाची शारीरिक संकल्पना येते . आपल्यातील प्रत्येकजण या भौतिक जगात, जीवनाच्या या देह बुद्धी संकल्पने अंतर्गत आहोत. मी विचार करत आहे भारतीय "मी भारतीय आहे " तुम्ही विचार करत आहेत तुम्ही अमेरिकन आहात . कोणी विचार करत आहे " मी रशियन आहे " कोणी विचार करत आहे " मी कोणीतरी वेगळा आहे " तर प्रत्येक जण विचार करत आहे " मी हे शरीर आहे " . हा एक दर्जा आहे किंवा एक स्तर आहे . या स्तराला म्हणतात विषयी स्तर , कारण जोपर्यंत आपण देह बुद्धीत आहोत , आपण विचार करतो सुख म्हणजे इंद्रिय संतुष्टी. बस . सुख म्हणजे इंद्रिय संतुष्टी कारण शरीर म्हणजे इंद्रिये . तर

इन्द्रियाणि पराणयाहुरिन्द्रियेभ्य: परं मन: (भ गी ३।४२ )

प्रभू कृष्ण म्हणतात कि भौतिक बुद्धीमध्ये , किंवा देहबुद्धी मध्ये , आपली इंद्रिये खूप महत्वपूर्ण आहेत. वर्तमान काळात ते चालू आहे. वर्तमान काळात नाही; या भौतिक जगाच्या निर्मितीपासून . हाच आजार आहे कि " मी हे शरीर आहे ". श्रीमद-भागवत सांगते कि

यस्यात्म बुद्धि: कुणपे त्रि धातुके स्व-धी: कलत्रादिषु भौम इज्य-धि: (श्री भा १०।८४।१३ ), कि "जो कोणी यादेहबुद्धीची संकल्पना ठेवतो कि ' मी हे शरीर आहे ... ' अात्म बुद्धि: कुनपे त्रि धातु । आत्म-बुद्धि: चा अर्थ आहे या त्वचा आणि हड्डीच्या या पिशवी मध्ये स्वतःची संकल्पना करणे . ही एक पिशवी आहे . हे शरीर एक पोतं आहे त्वचा, हाडे, रक्त, लघवी, मल आणि खूप छान गोष्टींचं . आपण पाहत आहात? पण आपण असा विचार करीत आहोत की "मी हाडं आणि त्वचा आणि मल आणि मूत्र आहे. ते आपले सौंदर्य आहे. हे आमचे सर्वस्व आहे. "

बर्याच छान गोष्टी आहेत ... अर्थात, आपला वेळ खूप कमी आहे. तरीही मी एक लहानशी कथा सांगू इच्छितो, एक माणूस, एक मुलगा, एका सुंदर मुलीकडे आकर्षित झाला होता तर मुलगी सहमत नव्हती पण मुलगा सतत मागे होता . भारतामध्ये, मुली, त्यांची शुद्धतेकडे अतिशय कडकतेने लक्ष देतात . तर ती मुलगी सहमत नव्हती. शेवटी ती म्हणाली, "ठीक आहे, मी सहमत आहे. तिने ठरवले , "अशा अशा वेळी तू ये ." त्यामुळे मुलगा खूप आनंदी झाला आणि त्या सात दिवसांत तिने काही औषधे घेतली . आणि ती दिवस रात्र विष्टा आणि उलटी करत होती . आणि तिने हि विष्टा आणि उलटी एका छानशा भांड्यात ठेवली . मग जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा तो मुलगा आला आणि मुलगी दरवाजाजवळ बसलेली . मुलाने विचारले , "ती मुलगी कुठे आहे?" ती म्हणाली , "मीच ती मुलगी आहे " "नाही नाही, तू नाही आहेस तू खूप कुरूप आहेस ती सुंदर होती तू ती मुलगी नाही." "नाही, मीच ती मुलगी आहे, परंतु आता मी माझ्या सौंदर्याला वेगळे करून दुसऱ्या भांड्यात ठेवले आहे." ते काय आहे ? ' तिने दाखवले: "हे सौंदर्य आहे, ही मल आणि उलटी आहे. हे घटक आहेत ."

प्रत्यक्षात कोणीही खूप मजबूत किंवा खूप सुंदर असू शकते - जर तीन किंवा चार वेळा मल बाहेर जाईल, तर सर्व काही लगेच बदलेल . तर माझा मुद्दा असा आहे की, श्रीमद-भागवतममध्ये नमूद केल्याप्रमाणे हि देहबुद्धी खूप आशावादी नाही . यस्यात्म बुद्धि: कुणपे त्रि-धातुके (श्री भा १०।८४।१३ ) ।