MR/Prabhupada 0077 - तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या आणि तत्त्वज्ञानाने अभ्यास करू शकता



Ratha-yatra -- San Francisco, June 27, 1971


कृष्ण म्हणतो ते जे सतत, चोवीस तास कृष्णाच्या सेवेत मग्न असतात ... या विद्यार्थ्यांप्रमाणे , कृष्ण भावनामृत संघाचे सदस्य , तुम्हाला आढळेल ते चोवीस तास कृष्णच्या सेवेत रुजू आहेत । तेच कृष्ण भावनामृताचे वैशिष्ट्य आहे .ते नेहमी मग्न आहेत । हि रथ यात्रा जत्रा हे एक उदाहरण आहे , तर निदान एक दिवस , तुम्ही सर्व कृष्ण भावनामृतात गुंतले असाल , तर हा फक्त सराव आहे , आणि तुम्ही जर हा सराव तुमच्या आयुष्यभर कराल, तर मृत्यूच्या वेळेला सौभाग्याने जर तुम्हाला कृष्णाची आठवण आली तर तुमचे जीवन सफल आहे । तसा सराव असणे आवश्यक आहे।

यम् यम् वापी स्मरण लोके त्यजत्य अंते कलेवरं ""(भ गी 8.6)

तुम्हाला हे शरीर सोडायचे आहे , हे नक्की आहे . पण मृत्यूच्या वेळी , जर आपल्याला कृष्णाची आठवण आली , त्वरित तुम्हाला कृष्णाचे धाम प्राप्त होते । कृष्ण सर्वत्र आहे पण तरीही कृष्णाचे विशिष्ट धाम आहे , ज्याला गोलोक , वृंदावन म्हणतात । तुम्ही समजू शकता कि आपले शरीर , शरीर म्हणजे ही इंद्रिये , आणि इंद्रीच्यावर तिथे मन आहे , जे खूप सूक्ष्म आहे , जे इंद्रियांवर राज्य कारते , आणि मनाच्या वर आहे बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे आहे आत्मा । आपल्याला ज्ञान नाही , पण आपण भक्ती योगाचा सराव केला तर , हळूहळू आपण समजतो कि आपण कोण आहोत । मी हे शरीर नाही । हे , सामान्यतः मोठे मोठे विद्वान , तत्वज्ञ , वैज्ञानिक सुद्धा ते सुद्धा या भौतिक शरीराच्या कल्पनेत आहेत । प्रत्येकाला वाटत आहे , " मी हे शरीर आहे , " पण ते चूक आहे . आपण हे शरीर नाही . मी आताच समजावले . शरीर म्हणजे इंद्रिये आणि इंद्रिये मनाच्या नियंत्रणाखाली आहेत , आणि मन बुद्धीद्वारे नियंत्रित केले जाते , आणि बुद्धी आत्म्याद्वारे नियंत्रित केली जाते. ते तुम्हाला महित नाही .

आत्म्याचे अस्तित्व कसे जाणावे हे समजण्यासाठी संपूर्ण जगात शिक्षण व्यवस्था अस्तित्वात नाही. जी मनुष्यांसाठी समजण्याची मूलभूत गोष्ट आहे . मनुष्य जन्म हा इतर प्राण्यांसारखा वेळ वाया घालवण्यासाठी नाही आहे . फक्त खाणे , झोपणे , संसार करणे आणि बचाव करणे . हे प्राण्यांचे जीवन आहे मनुष्याची अधिक बुद्धिमत्तेचा वापर हे जाणण्यासाठी केला पाहिजे कि , " मी ..मी काय आहे ? मी एक जीव आत्मा आहे " जर आपण समजू शकलो कि " मी जीवात्मा आहे " , कि हे देह बुद्धी जिने जगात थैमान घातले आहे .. या देहबुद्धीमुळे मी विचार करत आहे " मी भारतीय आहे , " तुम्ही विचार करत आहात " अमेरिकन " तो काही अजून विचार करत आहे . पण आपण सर्व एकाच आहोत . आपण जीवात्मा आहोत . आपण सर्व शाश्वत सेवक आहोत कृष्णाचे , जगन्नाथाचे . तर आज खूप छान , शुभ दीवस आहे . या दिवशी कृष्ण भगवान , जेव्हा ते या पृथ्वीवर अस्तित्वात होते , ते कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहण सोहळ्याला उपस्थित होते आणि कृष्ण तत्याचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा सोबत , कुरुक्षेत्र भूमीला भेट देण्यासाठी आले . ती कुरुक्षेत्र भूमी अजूनही भारतात आहे.

जर एखाद्या दिवशी तुम्ही भारतात जाल तर तुम्हाला सापडेल कुरुक्षेत्राची जमीन तिथे आहे. म्हणून हा रथयात्रा समारंभ त्याच्या स्मरणार्थ केला जातो कृष्ण त्याच्या भावाबरोबर आणि बहिणीबरोबर कुरुक्षेत्र भेटीला आल्याच्या स्मरणार्थ . तर भगवान जगन्नाथ, भगवान चैतन्य महाप्रभू, ते परम आनंदात होते . ते राधाराणी सारखे प्रेमळ भावनेच्या मनस्थितीत होते. तर ते विचार करीत होते , "कृष्णा , परत वृंदावनात येथे परत या." त्यामुळे ते रथयात्राच्या पुढे नृत्य करीत होते आणि आपण समजून शकाल जर आपण प्रकाशित केलेल्या काही पुस्तके ... आपल्या संस्थेद्वारे प्रकाशित केलेली काही पुस्तके वाचलीत तर त्यातले एक पुस्तक आहे भगवान चैतन्यांची शिकवण . ते खूप महत्वाचे पुस्तक आहे . जर तुम्हाला कृष्णभावनामृत चळवळ जाणून घ्यायची असेल, तर आपल्याकडे पुरेशी पुस्तके आहेत. आपण वैज्ञानिकदृष्ट्या आणि तत्त्वज्ञानाने अभ्यास करू शकता. पण जर तुमचा अभ्यास करण्याकडे कल नसेल तर तुम्ही फक्त हरे कृष्ण जप स्वीकारा , हळूहळू युमच्यापुढे सर्व गोष्टी उघड होतील. आणि तुम्हाला कृष्णासोबतचा तुमचं नातं समजून येईल. तुम्ही या समारंभात भाग घेतल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे .

आता आपण हरे कृष्णाची स्तुती करू आणि जगन्नाथ स्वामींसह पुढे जाऊया. हरे कृष्णा.