MR/Prabhupada 0079 - मला श्रेय नाही



Lecture on SB 1.7.6 -- Hyderabad, August 18, 1976

आता हे विदेशी, ते हिंदू नाहीत, किंवा भारतीय, किंवा ब्राह्मण. ते कसा लाभ घेत आहेत? ते मूर्ख आणि हरामखोर नाहीत. ते प्रतिष्ठित कुटुंबातुन येत आहेत, सुशिक्षित. त्यामुळे आमची ईराण मध्ये सुद्धा केंद्रे आहेत. तेहरान मध्ये, मी नुकताच तिथुनच येत आहे. आम्हाला भरपूर मुसलमान विध्यार्थी मिळाले आहेत, आणि ते सुद्धा त्याचा लाभ घेत आहेत. आफ्रिकेत ते लाभ घेत आहेत. ऑस्ट्रेलियात ते लाभ घेत आहेत. सर्व जगभरात. ते चैतन्य महाप्रभूंचे धेय आहे. प्रथिवीते आछे यत नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार हैबे मोर नाम​ हे चैतन्य महाप्रभूंचे पूर्वानुमान आहे. जितकी शहरे आणि गावे सर्व जगभरात आहेत, हे कृष्णभावनाभावित आंदोलन पसरत जाईल. तर मला काही नावलौकिक नको आहे, पण तो फक्त एक लहान प्रयत्न आहे, आणि नम्र प्रयत्न आहे. जर एक माणूस हे करू शकत असेल, जर तुम्ही म्हणाल, थोडी सफलता, मग आपण सर्व मिळून का नाही? चैतन्य महाप्रभूंनी सर्व भारतीयाँना मुखत्यारपत्र दिलेले आहे. भारत​-भूमिते हैल मनुश्यजन्म यार् (चै. च​. अदि ९.४१). ते बोलत आहेत मनुष्यांकडे, कुत्र्या आणि मांजराकडे नाही. तर मनुश्यजन्म यार् जन्म सार्थक करि. सर्व प्रथम, जीवनाचा हेतू काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला जन्म सार्थक म्हणतात. जन्म सार्थक करि कर पर​-उपकार​. जा. सर्वत्र कृष्णभावनाभावित होण्यासाठी फार चांगली मागणी आहे.