MR/Prabhupada 0082 - कृष्णा सर्वत्र उपस्थित आहे



Lecture on BG 4.24 -- August 4, 1976, New Mayapur (French farm)

भक्त: आम्ही असे म्हणतो की श्रीकृष्ण आध्यात्मिक अंतर्गत उपस्थित आहेत. जीवांच्या हृदया अंतर्गत.

प्रभुपाद: श्रीकृष्ण सर्वत्र उपस्थित आहे.

भक्त: एक व्यक्ती म्हणून किंवा शक्ति म्हणून?

प्रभुपाद: त्याच्या शक्ति मध्ये. तसेच व्यक्ती. व्यक्ती आपण आपल्या सद्य दृष्टीने बघू शकत नाही, पण शक्ति आपल्याला जाणवते. हा मुद्दा जास्तीत जास्त स्पष्ट करा. त्यामुळे जेव्हा पूर्णपणे अनुभवल्यावर, नंतर हा श्लोक, की सर्व काही ब्रह्म आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म ... उन्नत भक्त, त्याला श्रीकृष्ण वगळता काहीही दिसत नाही.

भक्त: श्रील प्रभुपाद​, भौतिक शक्ति आणि आध्यात्मिक शक्ति मध्ये खरोखर काही फरक आहे का?

प्रभुपाद: आहे, फरक, अनेक फरक आहेत, तेच उदाहरण, वीज. त्यामुळे भरपुर गोष्टी काम करत आहेत, शक्तिचा फरक . तसेच डिक्टाफोन काम करत आहे, विजेवर, त्याच शक्ति द्वारे, वीज. त्यामुळे श्रीकृष्ण सांगतात अहं सर्वस्य प्रभवः (भ.गी.१०.८), तो सर्वांचे मूळ आहे.

भक्त: भगवद गीतेत स्पष्ट केले आहे की जीवनकाळात एक शरीर बदलतो, पण आम्ही बघतो की काळा माणूस गोरा कधीच बनत नाही. किंवा की तिथे स्थिरता आहे, तिथे शरीरात काही तरी स्थिर आहे जरी ते बदलते. ते काय आहे? हे कसे काय, शरीर बदलते तरी पण आपण एखाद्याला ओळखू शकतो त्याच्या तरुणपणापासून ते म्हातारपणा पर्यंत.

प्रभुपाद: तर जेव्हा तुम्ही पुढे उन्नती कराल तुम्हाला आढळेल की काळा आणि गोरा यात काही फरक नाही आहे. ज्या प्रमाणे एक फूल उमलते, तिथे भरपूर रंग असतात. तर ते एकाच स्रोतातून येत असते. जसे की तिथे तसा कुठलाच फरक नाही, पण त्याला सुंदर बनवण्यासाठी तिथे भरपूर रंग आहेत. सूर्यप्रकाशामध्ये सात रंग आहेत, आणि त्या सात रंगातून, एकाधिक रंग बाहेर येत आहेत, मूळचा एक रंग पांढरा, आणि कितीतरी रंग येतात. स्पष्ट झाले की नाही?

भक्त: श्रील प्रभुपाद, जर श्रीकृष्णांनी सगळे बनवले आहे आणि सर्वकाही श्रीकृष्णांच्या इच्छेने सादर होते, आम्ही खरोखर सांगू शकतो चांगले आणि वाईट काय?

प्रभुपाद: चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती मानसिक बनावट गोष्ट आहे. पण संपूर्णपणे, भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट वाईट आहे.