MR/Prabhupada 0095 - आपलं उद्दिष्ट आहे शरण जाणे



Lecture on BG 4.7 -- Bombay, March 27, 1974


आपण शरण जातो,पण आपण कृष्णाला शरण जात नाही. हा खरा आजार आहे. हा खरा आजार आहे. आणि कृष्णभवनामृत चळवळ म्हणजे हा आजार बरा करणे. हा आजार बरा करणे. कृष्णही येतो.त्यांनी सांगितलंय,

यदा यदा हि धर्मस्य (भ गी ४।७)

धर्मस्य ग्लानि,धर्माच्या अमंलबजावणीत विसंगती निर्माण होते. जेव्हा ह्रास होतो, भगवान श्रीकृष्ण सांगतात,तदात्मानं सृजाम्यहम्. आणि अभ्युत्थानमधर्मस्य.

दोन गोष्टी आहेत. जेव्हा लोक कृष्णाला शरण जात नाहीत,ते अनेक "कृष्ण" निर्माण करतात. तर अनेक दुर्जन,तिथे शरण जाणे. ते अधर्मस्य. धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे. पण श्रीकृष्णांना शरण जाण्याऐवजी. त्यांना मांजरीला,कुत्र्याला, ह्याला, त्याला,अनेक गोष्टींना शरण जायची इच्छा असते. तो धर्म. तथाकथित हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म किंवा ख्रश्चन धर्माची स्थापना करायला भगवान श्रीकृष्ण अवतरत नाही. ते सनातन धर्माची स्थापना करायला अवतीर्ण होतात. सनातन धर्म म्हणजे आपण प्रामाणिक प्रतिनिधीला शरण जाणे.तो खरा धर्म. आपण शरण जातो. प्रत्येकाची काही मत आहेत. तो तिथे शरण जातो. एकत्रर राजकीय,सामाजिक,आर्थिक,धार्मिक काहीही.

प्रत्येकाचे काही विचार आहेत. आणि त्या आदर्शांचे नेते देखील तिथे आहेत. तर आपला उद्देश शरण जाणे. ते सत्य आहे. पण आपल्याला माहित नाही कुठे शरण जायचे.ती खरी अडचण आहे. आणि कारण चुकीच्या ठिकाणी विश्वास,ठेवल्यामुळे संपूर्ण जग अस्थिर आहे. आपण कधी ह्याला शरण जातो कधी त्याला सतत बदलत असतो.काँग्रेस पार्टी नको,आता कम्युनिस्ट पार्ट." पुन्हा, "कम्युनिस्ट पार्टी नको.हि... हि पार्टी,ती पार्टी." पार्टी बदलण्यात काय अर्थ आहे? कारण हि पार्टी किंवा ती पार्टी, ते भगवान श्रीकृष्णांना शरण जात नाहीत. म्हणून जोपर्यंत तुम्ही श्रीकृष्णांना शरण जात नाही.तोपर्यंत शांतता मिळणार नाही. हा मुद्दा आहे. फक्त तवे बदलून अग्नीच्या वापरात बचत होणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णनाचा शेवटचा संदेश

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहंत्वाम सर्वपापेभ्यो... (भ गी १८।६६)

तर धर्मातील विसंगती म्हणजे... ह्याचा पण श्रीमद्-भागवतात उल्लेख केला स वै पुंसां परो धर्मो .प्रथम श्रेणी किंवा श्रेष्ठ धर्म. पर: म्हणजे श्रेष्ठ,दिव्य.

स वै पुंसं परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे (श्री भा १।२।६)

जेव्हा आपण अधोक्षजाला शरण जातो... अधोक्षज म्हणजे सर्वोच्च दिव्यत्व,किंवा कृष्ण. श्रीकृष्णांचे दुसरे नाव अधोक्षज. अहैतुक्य अप्रतिहता अहैतुकी म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय. कोणत्याही कारणास्तव नाही की "श्रीकृष्ण असा आहे, म्हणून मी शरण जातो." नाही. कोणत्याही कारणाशिवाय. अहैतुक्य अप्रतिहता. आणि ते तपासता येत नाही, कोणीही तपासू शकत नाही. जर तुमची श्रीकृष्णांना शरण जाण्याची इच्छा असेल तर कोणतीही तपासणी नाही,अडथळा नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत करू शकता. तुम्ही करू शकता.

अहैतुक्य अप्रतिहता ययाsत्मा सुप्रसीदति (श्री भा १।२।६).

मग आपला,आत्मा,तुमचा आत्मा,तुमचं मन,तुमचं शरीर,संतुष्ट होईल. हि खरी पद्धत आहे.