MR/Prabhupada 0097 - मी साधा टपालखात्याचा शिपाई आहे



His Divine Grace Srila Bhaktisiddhanta Sarasvati Gosvami Prabhupada's Appearance Day, Lecture -- Los Angeles, February 7, 1969


जर आपण हि चळवळ पुढे न्यायला कठीण संघर्ष केला,तर,आम्ही अगदी, तुम्हाला कोणी अनुयायी मिळणार नाही, पण भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतील. आणि आपलं उद्दिष्ट श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हे आहे. त्याला भक्ती म्हणतात.

ह्रिषीकेन ह्रिषीकेश-सेवनं भक्तिरुच्यते (चै च मध्य १९|१७०)

भक्ती म्हणजे त्याच्या संतुष्टीसाठी सगळी इंद्रिये गुंतवणे होय. भौतिक जीवन म्हणजे स्वतःची इंद्रियतृप्ती. "मला हे आवडते. मला ते आवडते. मला काहीतरी करायचे आहे. मला काहीतरी गायचे .किंवा कुठलातरी जप,काहीतरी खायचे,किंवा कशाला तरी स्पर्श, किंवा काहीतरी चाखायचे आहे." हे काहीतरी म्हणजे... ते म्हणजे इंद्रियतृप्ती. ते म्हणजे भौतिक जीवन. "मला अशा मऊ त्वचेला स्पर्श करायचा आहे. मला चव घ्यायची आहे,त्याला काय म्हणणार,रुचकर अन्न. मला ह्याचा गंध घ्यायचा आहे.मला असं चालायचं आहे."

तीच गोष्ट- चालणं,चव घेणं किंवा दुसरं काही -ते श्रीकृष्णांसाठी केलं पाहिजे.एवढच. दुसऱ्या कशाला स्पर्श करण्याऐवजी, जर आपण भक्ताच्या पवित्र चरणकमलांना स्पर्श केला, तर त्या स्पर्शचा नक्कीच फायदा होईल त्याज्य पदार्थ खाण्याऐवजी, जर आपण कृष्ण प्रसाद ग्रहण केला,तर ते योग्य आहे. कुठल्यातरी गोष्टीचा गंध घेण्याऐवजी,जर आपण श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घेतला... तर काहीही थांबत नाही. जर तुम्हाला तुमच्या काम जीवनाचा उपयोग करायचा असेल तर तो कृष्णभावनामृत मुलांना जन्माला घालण्यासाठी करा. काहीही थांबवले नाही. फक्त ते शुद्ध केले. एवढेच.असा सगळा कार्यक्रम आहे. "हे थांबवा" हा प्रश्नच उदभवत नाही. थांबा असू शकत नाही.

हे कसे थांबवता येईल? समजा मी मनुष्यप्राणी आहे. जर कोणी म्हणाले,"अरे,तुम्ही खाऊ शकत नाही,हे शक्य आहे का? मी खाल्लेच पाहिजे. तर तिथे थांबवण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न ते शुद्ध करण्याचा आहे. तर... आणि इतर तत्वज्ञान असे आहे,मला म्हणायचे आहे,जबरदस्तीने खाली वाकुन ते रिकामं करा,जसे ते म्हणतात,"फक्त इच्छाहीन बना."ते वकील. तर मी इच्छाहीन कसा असू शकतो? इच्छा हि असणारच. पण इच्छा भगवान श्रीकृष्णांची असली पाहिजे. तर हि फार चांगली पद्धती आहे. आणि अगदी इतर हे फार गंभीरपणे घेत नाहीत किंवा ते आमचे तत्वज्ञान स्वीकारत नाहीत. जर तुम्ही प्रयत्न केलात,ते तुमचं कर्तव्य आहे. भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतील. आपले आचार्य संतुष्ट होतील,गुरु महाराज संतुष्ट होतील. आणि यस्य प्रसादाद् भगवत्... जर ते संतुष्ट झाले,तर तुमचं कार्य संपल. असं नाही की बाकीचे समाधानी आहेत की नाही. तुमच्या जपामुळे काहीजण समाधानी होतील- नाही,आम्ही त्याचा विचार करत नाही.

तो समाधानी होईल किंवा होणार नाही. पण जर मी योग्य प्रकारे जप केला,तर माझे पूर्वज,आचार्य संतुष्ट होतील ते माझे कर्तव्य आहे, संपल,जर मी स्वतःच्या पद्धतीने शोध लावला नाही. म्हणून मी खूप प्रसन्न आहे की अनेक चांगली मुलं आणि मुली माझ्या मदतीकरता पाठवली आजच्या शुभ दिवशी भगवंतांची कृपा राहो. आणि इथे माझं काही नाही, मी साधा टपालखात्याचा शिपाई आहे. मी जे माझ्या गुरु महाराजांकडून ऐकलंय ते मी तुम्हाला देत आहे. फक्त तुम्हीही अशाच पद्धतीने वागा,आणि तुम्ही पण सुखी व्हाल. आणि जग सुखी होईल, आणि श्रीकृष्ण आनंदी होतील, आणि सगळेच...