MR/Prabhupada 0101 - आमच्या निरोगी जीवन अनंतकाळचे जीवन आनंद साठी आहे



Press Conference -- April 18, 1974, Hyderabad

पाहुणा(१): या कृष्ण भावनेचा अंतिम उद्देश काय आहे?

प्रभुपाद: होय, अंतिम उद्देश हा, की... नाही, मी म्हणेन. अंतिम हेतू आहे, चेतनातत्व आणि जड वस्तू आहेत. ज्याप्रमाणे भौतिक जग आहे, तसेच आध्यात्मिक जग आहे. परस्तस्मात्तु भावोSन्योSव्यक्तोSव्यक्तात्सनातनः (भ.गी.८.२०) आध्यात्मिक विश्व शाश्वत आहे. भौतिक विश्व तात्पुरते आहे. आम्ही चैतन्य आत्मा आहोत. आम्ही शाश्वत आहोत. त्यामुळे आमचे काम आहे की आध्यात्मिक जगात परत जाणे. तसे नाही की ह्या भौतिक जगात राहायचे आणि शरीर बदलत राहायचे वाईटातून अती त्रासदायक किंवा अती त्रासदायक मधून वाईटात. एर, चांगले. ते आमचे काम नाही आहे. तो रोग आहे. आमचे निरोगी आयुष्य हे शाश्वत जीवनाचा आनंद घेण्यासाठी आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम (भ.गी.१५.६). बघा, आमचे मानवी जीवन हे तो पुर्णावस्तेचा टप्पा गाठण्यासाठी उपयोगात आणले पाहिजे - हे भौतिक शरीर जे सतत बदलत असते ते प्राप्त करण्यासाठी नाही, हे जीवनाचे ध्येय आहे.

अतिथी (2): ती पुर्णवस्था या एका जीवनात शक्य आहे?

प्रभुपाद: होय, एका क्षणात, आपण सहमत असल्यास. श्रीकृष्ण सांगतात की सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः (भ.गी.१८.६६) आम्ही पापी क्रियाकलाप केल्यामुळे शरीर बदलत असतो. पण जर आम्ही श्रीकृष्णांना शरण गेलो आणि कृष्णभावनाभावित झालो, ताबडतोब तुम्ही आध्यात्मिक व्यासपीठावर येता. मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते (भ.गी.१८.२६)

जितक्या लवकर तुम्ही श्रीकृष्णांचे निखळ भक्त होता, तुम्ही ताबडतोब हा भौतिक व्यासपीठ पार करून जाता. ब्रह्मभूयाय कल्पते. तुम्ही आध्यात्मिक व्यासपीठावर राहता. आणि जर तुम्ही आध्यात्मिक व्यासपीठावर मरण पावता, तर तुम्ही आध्यात्मिक विश्वात जाता.