MR/Prabhupada 0104 - हे जन्म मृत्यूचे चक्र थांबवा



Lecture on BG 9.1 -- Melbourne, April 19, 1976

पुष्ट कृष्ण: पशूच्या शरीरातील आत्मा मनुष्याच्या शरीरात कसा शिरतो? प्रभुपाद: जसा एक चोर तुरुंगात शिरतो. तो कसा मुक्त होईल? जेव्हा त्याची तुरुंगातील शिक्षेची मुदत संपेल, तेंव्हाच तो परत मुक्त होईल. आणि परत त्याने गुन्हा केला, त्याला परत तुरुंगात टाकण्यात येईल. म्हणून मनुष्य जन्म हा जाणून घेण्या करता, जसे मी सांगितले. माझ्या आयुष्याची समस्या काय आहे. मला मरायची इच्छा नाही; तरीही मला मृत्यू येणार. मला म्हातारं होण्याची इच्छा नाही; तरीही मला म्हातारपण येणार.

जन्म-मृत्यू-जरा-व्याधि-दु:ख-दोषानुदर्शनम (भ गी १३. ९)

म्हणून..... ज्याप्रमाणे तेच उदाहरण, चोर जेव्हा तो मुक्त असतो, जर त्याने विचार केला,की "मला सहा महिने अशा कष्टप्रद तुरुंगवासात का ठेवण्यात आलं? हे खूपच त्रासदायक आहे," वास्तविक तेव्हाच त्याला मनुष्य म्हणता येईल . जसे, मनुष्याला साधक बाधक विचार करण्याची शक्ती मिळाली आहे. जर त्याने विचार केला की "मला अशा कष्टप्रद अवस्थेत का ठेवण्यात आलंय ?

प्रत्यकाने हे स्वीकारलं पाहिजे की तो एक कष्टप्रद आयुष्य जगत आहे. प्रत्येकजण सुखाच्या शोधात आहे, पण कोणीही सुखी नाही. पण सुखी कसे व्हायचे ? ते फक्त मनुष्य जन्मात शक्य आहे. निसर्गाच्या कृपेने जर आपल्याला मनुष्य जन्म लाभला आणि आपण त्याचा नीट उपयोग केला नाही, जर कुत्र्या आणि मांजरा किंवा इतर प्राण्यांप्रमाणे जागून वाया घालवला, तर आपल्याला परत प्राण्याचे शरीर स्वीकारावे लागेल,आणि जेव्हा हे चक्र संपेल....

हे जन्म मृत्यूचे चक्र संपायला अनेक जन्म घ्यावे लागतील. जेव्हा हे चक्र संपेल, तेव्हा परत तुम्हाला मनुष्य जन्म मिळेल, अगदी तसेच जसे: एखाद्या चोराने आपली शिक्षा संपवल्यावर, परत तो एक मुक्त जीवन जगू शकतो. पण परत जर याने गुन्हा केला तर परत त्याला तुरुंगात जावे लागेल. कारण हे जन्म मृत्यूचे चक्र आहे. जर ह्या मनुष्य जन्माचा उपयोग हे जन्म मृत्यूचे चक्र थांबण्यासाठी केला. आणि जर आपण ह्या मनुष्य जन्माचा उपयोग हे चक्र थांबवण्यासाठी केला नाही, तर परत आपल्याला या जन्म- मृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागेल.