MR/Prabhupada 0123 - सक्तीची शरणागती हि विषेश कृपा आहे

From Vanipedia
Jump to: navigation, search
Go-previous.png मागील पृष्ठ - व्हिडिओ 0122
पुढील पृष्ठ - व्हिडिओ 0124 Go-next.png

सक्तीची शरणागती हि विषेश कृपा आहे-
Prabhupāda 0123


Lecture-Day after Sri Gaura-Purnima -- Hawaii, March 5, 1969


भक्त: श्रीकृष्णांना आपण सक्तीने शरण जाण्यास विंनती करू शकतो का,आपल्या बद्धावस्थेमुळे. .

प्रभुपाद: हो तुम्ही त्यांना विनंती करू शकता. आणि ते काहीवेळा सक्ती करतात. ते तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवतात की तुमच्याकडे त्यांना शरण जाण्यावाचून दुसरा काही मार्ग राहात नाही हो ती विशेष कृपा आहे. ती विशेष कृपा आहे. हो. माझ्या अध्यात्मिक गुरूंना मी प्रचार करावा असं वाटत होत,पण मला ते आवडलं नाही,पण त्याने मला सक्ती केली. हो तो माझा स्वानुभव आहे. मला संन्यास घ्यावा आणि प्रचार करावा अशी काही इच्छा नव्हती, पण माझ्या अध्यात्मिक गुरूंना असं वाटत होत. माझी काही तशी प्रवृत्ती नव्हती,पण त्याने मला सक्ती केली. ते देखील केले जाते. ती एक विशेष कृपा आहे. जेव्हा त्याने सक्ती केली, त्यावळे,मी विचार केला की,"हे काय आहे? काय...?

मी काही चूक केली की काय किंवा आणखी काही?" मी गोंधळलो होतो. पण काही काळाने, मला समजले की मोठी कृपा माझ्यावर झाली आहे. तुम्ही बघा? तर जेव्हा श्रीकृष्ण कोणाला सक्तीने शरण जायला भाग पडतात,ती मोठी कृपा आहे. पण सामान्यपणे, तो असे करत नाही. पण ते असं अश्या माणसाच्या बाबतीत करतात जो श्रीकृष्णांची सेवा प्रामाणिकपणे करत आहे. पण त्याचवेळी त्याला भौतिक सुखाची थोडीशी इच्छा आहे. तसे असेल तर ते असं करतात "ह्या मुर्ख माणसाला माहित नाही तो भौतिक आनंद त्याला कधीही सुखी करत नाही. आणि तो प्रामाणिकपणे माझ्या कृपेची याचना करत आहे. म्हणून जी काही साधन,भौतिक सुखाची जी थोडीफार साधन त्याच्याकडे आहेत, ती काढून घेतात.

मग मला शरण येण्यावाचून त्याच्याकडे दुसरा काही मार्ग नसेल." हे भगवद्-गीता आणि श्रीमद्-भागवतात संगितलं आहे.

यस्याहमनुगृह्रामि हरिष्ये तद्-धनं सनै:(श्री भा १०।८८।८)

श्रीकृष्ण सांगतात की"जर मी कोणावर विशेष कृपा केली, तर मी त्याला कंगाल बनवतो. मी त्याची सगळी सुखाची साधन काढून घेतो." तुम्ही पाहिलंत? असं श्रीमद्-भागवतात संगितलं आहे.

कारण ह्या भौतिक जगात प्रत्येकजण सुखी बनण्याचा प्रयत्न करत आहे पुष्कळ पैसे कमवून,धंदा करून,नोकरी करून ह्या मार्गाने किंवा त्या मार्गाने. पण काही विशेष वेळी श्रीकृष्ण त्या माणसाची नोकरी किंवा धंदा यशस्वी होऊ देत नाहीत. तुम्हाला हे आवडलं का? (हशा) त्यावेळी श्रीकृष्णांना शरण जाण्यावाचून त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शल्लक रहात नाही बघितलेत? पण काहीवेळा, जेव्हा आपण आपल्या कमाईत किंवा धंद्यात अयशस्वी होतो, आपण दुःखी होतो की "अरे श्रीकृष्ण माझ्याशी इतक्या क्रूरपणे वागले की मी त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही." पण ती त्यांची कृपा असते, विशेष कृपा. तुम्ही ते त्या दृष्टीने समजले पाहिजे.