MR/Prabhupada 0133 - मला हवा होता एक शिष्य जो माझ्या आदेशाचे पालन करेल



Arrival Lecture -- San Francisco, July 15, 1975

त्यामुळे काहीवेळा लोक मला खूप मोठं श्रेय देतात की मी पूर्ण जगभर फार छान कार्य केलं. पण मला माहित नाही की मी चांगला माणूस आहे. पण मला एक गोष्ट माहित आहे,की श्रीकृष्णांनी जे सागितलं ते मी सांगत आहे. एवढंच. मी त्यात काही भर, फेरफार,करत नाही. म्हणून मी भगवद्-गीता जशी आहे तशी मांडत आहे. ह्याच श्रेय मी घेऊ शकतो,की मी कोणतीही भर घालत नाही किंवा फेरफार करत नाही. आणि मी प्रत्यक्ष पाहत आहे ते यशस्वी झालं. मी गरीब भारतीय आहे. मी युरोपियन आणि अमेरिकन लोकांना लाच दिली नाही. मी अमेरिकेला माझ्या बरोबर चाळीस रुपये घेऊन आलो,आणि आता त्याचे माझ्याकडे चाळीस कोटी झाले. तर हि जादू नाही. (तुम्ही मागच्या बाजूला जाऊ शकता, तुम्ही झोपले आहात.) तर हे गुपित आहे. की जर तुम्हाला प्रामाणिक गुरु बनायचं असेल... जर तुम्हाला फसवायचं असेल,ती वेगळी गोष्ट आहे. असे पुष्कळ फसवणारे आहेत.लोकानासुद्धा फसवून घ्यायची इच्छा असते. जेव्हा आपण असे म्हणतो की "जर तुम्हाला माझा शिष्य बनायची इच्छा आहे, तर तुम्हाला चार गोष्टी सोडाव्या लागतील.

अवैध लैंगिक सबंध नाही,मद्यपान,चहा सुद्धा नाही आणि धूम्रपान,मांस भक्षण आणि जुगार हे सगळं सोडावं लागेल. आणि ते माझ्यावर टीका करतात,"स्वामीजी पुराणमतवादी आहेत." आणि जर तुम्ही म्हणालात "जे तुम्हाला आवडेल करा,काहीही मूर्खपणा करू शकता. तुम्ही फक्त हा मंत्र घ्या आणि मला $१२५ द्या,"त्याना आवडेल. कारण अमेरिकेत $१२५ म्हणजे काहीच नाही. कोणताही माणूस लगेच पैसे देऊ शकेल. मी जर असं फसवलं असत तर लाखो डॉलर गोळा केले असते. पण मला तस करायचं नव्हतं. मला असा एक शिष्य हवा होता जो माझ्या शिकवणीचे अनुकरण करेल. मला लाखो डॉलर नको. एकस चंद्र तमो हंन्ति न च तारा सहस्र्श: जर आकाशात एक चंद्र असेल,तर तो प्रकाश देण्यासाठी पुरेसा आहे. लाखो चांदण्याची गरज नाही. एकतरी शिष्य शुद्ध भक्त झाला आहे का हे बघायचं माझा काम आहे. अर्थात,हे माझं भाग्य आहे की मला अनेक प्रामाणिक आणि शुद्ध भक्त मिळाले आहेत. पण मला एक जरी मिळाला असता तरी मी समाधानी असतो. तथाकथित लाखो चांदण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच प्रक्रिया आहे,आणि ती अगदी सोपी आहे. आणि जर आपण भगवद्-गीतेतील उपदेश जाणला आणि मग आपण श्रीमद्-भागवत अभ्यासायला घेतलं... किंवा जरी तुम्ही त्याचा अभ्यास केला नाही,चैतन्य महाप्रभूंनी सोपी पद्धत सांगितली आहे. त्याची सुद्धा शास्त्रामध्ये शिफारस केली आहे:

हरेर् नाम हरेर् नाम हरेर् नाम एव केवलम्
कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिर् अन्यथा (चै च अादि १७।१२१)

जर वैदिक साहित्याचा अभ्यास करायचा असेल,तर फार चांगलंच आहे. हे ऐकायला बरं वाटेल. तर आता आपलीकडे पन्नास पुस्तक आहेत. तुम्ही अभ्यास करा. तत्वज्ञान,धर्म,समाजशास्त्र,सगळ्यात विद्वान पंडित बना. श्रीमद्-भागवतात सर्वकाही आहे, राजकारण सुद्धा. आणि संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण मनुष्य बना. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे वेळ नाही,तुम्ही विद्वान नाही, तुम्ही सगळी पुस्तक वाचू शकत नाही,तर फक्त हरे कृष्ण जप करा. दोन्ही प्रकारे किंवा कुठलीही एक.

कोणत्याही प्रकारे तुम्ही परिपूर्ण बनू शकता. जर हरे कृष्ण जप केलात आणि तुम्ही पुस्तक वाचू शकला नाहीत तरी तुम्ही परिपूर्ण बनालं. आणि जर तुम्ही पुस्तक वाचलीत आणि हरे कृष्णाचा जप केलात, ते तर फारच चांगलं आहे. पण त्यात काही तोटा नाही. जर तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप केलात पण तुम्ही पुस्तक वाचू शकला नाहीत, काहीही हरकत नाही. त्यात काही तोटा नाही. जप पुरेसा आहे. पण जर तुम्ही पुस्तक वाचलीत तर तुम्हाला विरोध करणाऱ्या पक्षापासून बचाव करू शकाल. ते तुमच्या प्रचार कार्याला उपयोगी पडेल. कारण प्रचार कार्यात तुम्हाला अनेक प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. विरोध करणाऱ्या अनेक लोकांना भेटावं लागत पुस्तक,वैदिक साहित्य वाचून जर तुमच्या स्थितीत तुम्ही बळकट असलात ,मग श्रीकृष्णनाचे तुम्ही फार फार लाडके बनाल. श्रीकृष्ण सांगतात,

ना च तस्मात् मनुश्येशु
कस्चित् मे प्रिय-कृत्तम (भ गी १८।६९)
य इमम् परमम् गुह्यम्
मद-भक्तेशू अभिदास्यति (भ गी १८।६८)


जो कोणी ह्या गुह्य ज्ञानाचा प्रचार करेल, 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भगवद्-गीता १८.६६). जर त्याने जगाला हा योग्य संदेश समर्थपणे दिला. मग लगेच भगवंतांनची त्याला शाब्बासकी मिळते.