MR/Prabhupada 0137 - आयुष्याचे ध्येय काय आहे ? देव म्हणजे काय ?



Lecture on BG 7.4 -- Nairobi, October 31, 1975


ह्रिषीकेश: "भाषांतर - पृथ्वी,पाणी,हवा,अग्नी,आकाश,मन,बुद्धी आणि अहंकार - सगळ्या मिळून माझ्या आठ निरनिराळया भौतिक शक्तींचा अंतर्भाव आहे."

प्रभुपाद:

भूमिरापोsनलो वायुः
खम मनो बुद्धिर एव
अहंकार इतियम् मे
भिन्न प्रकृतिर् अशटधा :(भ गी ७।४)

श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगत आहेत.भगवंत स्वतः भगवंत म्हणजे काय सागत आहेत. ते वास्तविक ज्ञान आहे. जर आपण देवाबद्दल तर्क केले, तर ते शक्य नाही. भगवंतांच्या अनंत शक्ती आहेत. आपण समजू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण,सुरवातीला सांगतात,

असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु (भ गी ७।१).

समग्रं. समग्रं म्हणजे जेकाही... किंवा समग्रं म्हणजे संपूर्ण. तर जे काही अभ्यासाचे विषय आणि ज्ञान आहे, त्या प्रत्येक गोष्टीची बेरीज, एक. त्या सगळ्याचा मतितार्थ भगवंत आहेत. म्हणून त्यांनी सुरवातीपासून स्वतःबद्दल समजावून सांगितले. सर्वात प्रथम,कारण आपल्याला भगवंताबद्दल काहीही माहिती नाही - पण व्यवहारात आपण विस्तीर्ण जमीन, प्रचंड पाणी,समुद्र,विस्तीर्ण आकाश,मग अग्नी. अनेक गोष्टी, भौतिक गोष्टी,मनसुद्धा... मन पण भौतिक आहे. आणि मग अहंकार, प्रत्येकजण विचार करतो की "मी अमुक आहे. मी..."

कर्ताहमिति मन्यते.अहंकारविमूढात्मा.

हा खोटा अहंकार. हा अहंकार म्हणजे खोटा अहंकार. आणि दुसरा शुद्ध अहंकार आहे. शुद्ध अहंकार म्हणजे अहं ब्रह्मास्मि, आणि खोटा अहंकार : "मी भारतीय आहे," "मी अमेरिकन आहे," "मी आफ्रिकन आहे," "मी ब्राह्मण आहे," "मी क्षत्रिय आहे," मी हा आहे." हा खोटा अहंकार, तर अत्ता ह्या क्षणी... ह्या क्षणी नव्हे सतत,आपण ह्या सगळ्या गोष्टीनी वेढलेले आहोत. ही आपल्या तत्वज्ञानाची सुरवात आहे. हि जमीन कुठून आली? हे पाणी कुठून आले? हा अग्नी कुठून आला? ही नैसर्गिक चौकशी आहे. हे आकाश कुठून आले? हे अनेक लाखो, तारे इथे कसे आले? तर बुद्धिमान मनुष्यांना ह्या शंका आहेत . तात्विक जीवनाची ही सुरुवात आहे.

म्हणून जो विचारवंत मनुष्यांचा गट आहे, हळूहळू, ते भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास जिज्ञासू असतात. तर श्रीकृष्ण तिथे आहेत आणि ते स्वतः समजावून सांगतात,"मी असा आहे." पण दुर्दैवाने आपण श्रीकृष्णांना जाणू शकत नाही,परंतु आपण भगवंतां विषयी तर्क करत बसतो. हा आपलं आजार आहे. श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत, भगवंत स्वतः समजावत आहेत. आपण ते विधान मानत नाही,परंतु आपण ते नाकारतो. किंवा आपण भगवंतांना निराकार मानतो,अनेक गोष्टी. हा आपला आजार आहे. म्हणून आधीच्या श्लोकात हे स्पष्ट केल आहे.

मनुष्याणां सहस्रेशु
कश्चिद् यतति सिद्धये
यतताम् अपि सिद्धानां
कश्चिन्मां वेत्तितत्त्वतः
(भ गी ७।३)

अनेक लाखो व्यक्तींपैकी प्रत्यक्षात ते जाणून घेण्यास गंभीर आहेत. "आयुष्याचे ध्येय काय आहे? भगवंत काय आहेत? माझं काय नातं आहे..." कोणालाही स्वारस्य नाही. जसे...

स एव गो-खरह (श्री भ १०।८४।१३)

प्रत्येकाला कुत्रा आणि मांजरांप्रमाणे शारीरिक संकल्पनेत स्वारस्य आहे. हि स्थिती आहे. फक्त आत्ता नाही, सतत, ही भौतिक अवस्था आहे. पण कोणीतरी, मनुष्याणां सहस्रेषु, लाखांमधील एक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, हे आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी. आणि अशा परिपूर्णतेतून... परिपूर्णता म्हणजे त्याची घटनात्मक अवस्था जाणून घेणे. की तो हे भौतिक शरीर नाही, तो एक आत्मा आहे,ब्रम्हन. ही परिपूर्णता,ज्ञानाची परिपूर्णता,ब्रम्ह-ज्ञान.