MR/Prabhupada 0142 - भौतिक निसर्गाच्या कत्तल प्रक्रियेला थांबवा



Lecture on SB 6.1.15 -- Denver, June 28, 1975


तर सगळ्यात पहिल्यांदा आयष्याचे ध्येय काय आहे हे लोकांना समजत नाही. आत्ताच्या क्षणी ते काळजी करत नाहीत. ते पापी जीवन आणि पूण्यवान जीवन यात फरक करत नाही. पण आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण अशा गोष्टी आहेत. जसे जर तुम्हाला काही आजार झाला, तर तो बाहेर येईल. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, त्यांनी काही फरक पडत नाही. इथे आपले डॉक्टर साहेब आहेत. त्यांना माहित आहे की जर तुम्हाला काही रोग झाला,तर तो बाहेर पडेल. म्हणून आपण अनेक संसर्गजन्य रोगांनी पछाडले गेले आहोत. तीन गुण आहेत - सत्वगुण, रजोगुण,तमोगुण- आणि आपल्या संसर्गानुसार आपल्याला वेगवेगळे शरीर स्वीकारावे लागते.

कर्मणा दैवानेत्रेण (श्री भ ३।३१।१)

आपण सगळेजण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करत असतो. आणि आपल्या संगानुसार विशिष्ट प्रकारचे शरीर आपल्याला स्वीकारावे लागते, तथा देहान्तर प्राप्ति (भ गी २।१३)

दुर्दैवाने,असं कुठलंही विज्ञान,महाविद्यालय,विश्वविद्यालय,नाही जे निसर्गाबद्दल माहिती शिकवेल,कशा गोष्टी चालू आहेत.

प्राकृतेः क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः (भ गी ३।२७)

प्रकृती तेथे आहे. म्हणून आपण या संक्रामक स्थितीमुळे भौतिक जगात आहोत. ही आपली समस्या आहे. आणि आपण मारणार आहोत. हे सत्य आहे. जर तुम्ही म्हणत असाल "मरणावर विश्वास ठेवत नाही," हे निमित्त नाही. मृत्यू अटळ आहे. आपला मृत्यू निश्चित आहे. तर अशाप्रकारे आपलं आयुष्य चाललंय. तर मनुष्य जीवनात आपण हे सुधारू शकतो.ही कृष्णभावनामृत प्रक्रिया आहे. की जर आपण वेगवेगळ्या भौतिक गुणांच्या सततच्या संगात सुधार आणला... आणि या संगाच्या परिणाम म्हणून, आपण एक शरीर स्वीकारतो आणि शरीराचा त्याग करतो, आणि परत दुसरं शरीर स्वीकारतो, परत देह सोडतो. हे थांबलं पाहिजे.

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम (भ गी १५।६)

काहीहीकरून किंवा इतर,जर तुम्ही स्वगृही जायला योग्य बनलात, देवाचिया द्वारी, यद्गत्वा, मग तुम्हाला परत यावं लागणार नाही. पण त्यांना हे समजत नाही की हे भौतिक बद्ध जीवन नेहमी कष्टमय असत. त्यानी स्विकारलं आहे, "हे खूप छान आहे." जनावर. जनावर, जसे गोहत्यागृह, पशुधन गोदाम, इतके सारे प्राणी आहेत, आणि त्यांची कत्तल होणार आहे. सगळ्यांना माहित आहे,त्यांनासुद्धा माहित आहे, जनावर. पण त्यांच्या पशुवृत्तीमुळे, ते काही करू शकत नाहीत. तसेच, आपल्याला सुद्धा या भौतिक जगाच्या गोहत्यगृहात टाकलं आहे. त्याला मृत्युलोक म्हणतात. प्रत्येकाला माहित असत की त्याची कत्तल होणार आहे.

आज किंवा उद्या किंवा पन्नासवर्षांनी किंवा शंभर वर्षां नंतर, प्रत्येकाला माहित आहे की त्याची कत्तल होणार आहे. तो मरणार. मृत्यू म्हणजे वध. कोणालाही मारायचं नाही. प्राण्यांसुद्धा, मृत्यू आवडत नाही. पण त्यांना जबरदस्तीने मृत्यू येतो. ह्याला हत्या म्हणतात. तसेच, कोणाला मृत्यू हवाय? कोणालाही मृत्यू नकोय. पण निसर्गनियमानुसार त्याला मृत्यू येणार. तो कत्तलखाना. संपूर्ण भौतिक जग कत्तलखाना आहे. आपल्यला ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याला मृत्युलोक म्हणतात.ही समस्या आहे. पण ते हे खूप गंभीरपणे घेत नाहीत, प्राण्यांसारखे. प्राणी,ते गंभीरपणे घेत नाहीत. आणि जरी त्याला माहित असे की तो मरणार. तो काही करू शकत नाही. तर आपली परिस्थिती अशी आहे. मृत्यू-संसार-सागरात.

तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजं तमः तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् (भ गी १२।७)

तर आपण आपली परिस्थिती समजली पाहिजे. कोणीही मारू इच्छित नाही. पण त्याची कत्तल होते. पुन्हा संधी दिली जाते,दुसरे शरीर,परत कत्तल होते. हा निसर्गनियम आहे. चालूच राहणार.

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४)

आपण भौतिक निसर्गाच्या या कत्तल प्रक्रियेस गंभीरपणे समजून घेतले पाहिजे,ती बुद्धिमत्ता आहे. नाहीतर,कुत्रा आणि मांजरांसारखे आनंदी व्हा. "अरे, मी खूप चांगले खात आहे आणि उड्या मारत आहे. मला कत्तल होण्याची काळजी नाही," ती काही खूप चांगली हुशारी नाही, बुद्धिमत्ता हि आहे की कशी ही निसर्गाची कत्तल करण्याची प्रक्रिया थाबवू. ती बुद्धिमत्ता आहे. त्यावर चर्चा होत आहे. म्हणून कोणीही भक्तिमार्गाचा अवलंब करून कत्तल होण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडू शकतो. ते इथे म्हंटले आहे,

केचित्केवलया भत्त्क्या (श्री भ ६।१।१५)

केचित. ते खूप सामान्य नाही. खूप क्वचित एखादा कृष्णभवनामृत स्वीकारतो. केचित्केवलया भत्त्क्या. फक्त भक्ती मार्गाने, एखादा कत्तल होण्याच्या धोकादायक स्थितीतून बाहेर पडू शकतो.केचित्केवलया भत्त्क्या (श्री भ ६।१।१५)

आणि ते कोण आहेत? वासुदेवपरायणाः श्रीकृष्णांचे भक्त. श्रीकृष्णांचे नाव वासुदेव आहे. ते वसुदेवांचे पुत्र आहेत. म्हणून त्यांचे नाव वासुदेव आहे. तर वासुदेवपरायणाः. परायणाः म्हणजे "आपले अंतिम ध्येय वासुदेव आहे, अजून काही नाही. त्यांना वासुदेवपरायणाः म्हणतात.वासुदेवपरायणाः.अघं धुन्वन्ति. अघं म्हणजे भौतिक मलिनता.आपण कायम भौतिक गुणांच्या संगात असतो. म्हणून जर आपण वासुदेवपरायणाः बनलो.

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः (श्री भ ६।१।१५)

तीच गोष्ट. इथे म्हटलंय केचित - म्हणजे खूप क्वचित. श्रीकृष्णांनी पण भागवद गीतेत सांगितलंय वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ( भ गी ७।१९). सुदुर्लभः फार क्वचित.