MR/Prabhupada 0149 - कृष्ण भावनामृत चळवळ म्हणजे परमोच्च वडील शोधणे



Tenth Anniversary Address -- Washington, D.C., July 6, 1976


तर ही कृष्णभावनामृत चळवळ म्हणजे परमोच्च वडील शोधणे. परमोच्च वडील. ते ह्या चळवळीचं सार आणि महत्वाचा भाग आहे. आपले वडील कोण आहेत हे जर आपल्याला माहित नसेल, तर ती खूप चांगली स्थती नाही. कमीत कमी भारतात तरी अशी रूढी आहे ,जर कोणी त्याच्या वडिलांचे नाव सांगू शकत नसेल, तर त्याला फार आदरणीय समजत नाहीत. आणि न्यायालयात अशी पद्धत आहे की तुम्ही तुमचं नाव लिहितांना तुमच्या वडिलांचे नाव लिहिलेच पाहिजे. ती भारतीय,वैदिक पद्धत आहे,आणि नाव, त्याच स्वतःच नाव, त्याच्या वडिलांच नाव आणि त्याच्या गावाचं नाव. हे तीन एकत्रित. मला वाटत हि पद्धत इतर देशात प्रचलित असू शकते, पण भारतात, अशी पद्धत आहे. पाहिलं त्याच स्वतःच नाव, दुसरं त्याच्या वडिलांचं नाव, आणि तिसरं गावाच किंवा देशाच नाव जिथे तो जन्माला आला. हि पद्धत आहे. तर वडील..., आपल्याला वडील माहित असले पाहिजे. ती कृष्णभावनामृत चळवळ. जर आपण आपल्या वडिलांना विसरत राहिलो,ती फार चांगली स्थिती नाही. आणि कशा प्रकारचे वडील?

परं ब्रम्ह परं धाम (भ गी १०।१२)

सर्वात श्रीमंत. गरीब वडील नाहीत जे आपल्या मुलांना जेवण देऊ शकत नाहीत. ते वडील नाहीत. एको यो बहुनां विदधाति कामान् ते वडील एवढे श्रीमंत आहेत की लाखो आणि करोडो आणि अरबो सजीव प्राण्यांना अन्न पुरवत आहेत. आफ्रिकेमध्ये शंभर आणि लाखो हत्ती आहेत. ते त्यांना अन्न पुरवत आहेत. आणि खोलीमध्ये एक भोक आहे, तिथे लाखो मुग्या असतील. ते त्यांना सुद्धा अन्न पुरवत आहेत.

एको यो बहुनां विदधाति कामान् नित्यो नित्यांनां चेतनश्चेतनानाम् (भ गी १५।१५)

हि वैदिक माहिती आहे. तर मनुष्य जीवन,वडील कोण हे जाणून घेण्यासाठी आहे. त्यांचा न्याय काय आहे. देव कोण आहे, आपलं त्यांच्या बरोबर काय नातं आहे. हे वेदांत आहे. काहीतरी मुर्ख बडबड करणे आणि वडीलांबरोबर कोणतंही नातं नसणे म्हणजे वेदांत नव्हे. श्रम एवं ही केवलं. जर तुम्हाला माहित नाही तुमचे वडील कोण आहेत...

धर्म: स्वनुस्थित: पुम्साम्
विश्वक्शेन कथासु य:
नोत्पादयेद् यदि रतिम्
श्रम एव हि केवलम् :(श्री भ १।२।८)

हे नको आहे. आणि श्रीकृष्णांनी सांगितलंय,

वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो (भ गी १५।१५)

तर तुम्ही वेदांतीस्ट झालात. ते चांगलं आहे. वेदांताच्या सुरवातीला असं सांगितलंय सगळ्याचे उगम स्थान परम सत्य आहे. अथातो ब्रम्ह जिज्ञासा. हि सुरवात आहे. मानवी जीवन परम सत्य जाणण्यासाठी आहे. जिज्ञासा. एखाद्याने संपूर्ण सत्य काय आहे हे विचारावे.संपूर्ण सत्य शोधण्यासाठी हे मनुष्य जीवन आहे. तर पुढील सूत्र लगेच म्हणत की परिपूर्ण सत्य हेच आहे की सर्व गोष्टींचं स्रोत कोण आहे. आणि ते सर्व काय आहे? आम्ही शोधतो त्या दोन गोष्टी: सजीव आणि निर्जीव. व्यवहारिक अनुभव. त्यांच्यातले काही सजीव आहेत.आणि काही निर्जीव आहेत. दोन गोष्टी. आता आम्ही निरनिराळ्या प्रकारे विस्तार करू शकतो. ती वेगळी गोष्ट आहे. पण दोन गोष्टी आहेत. तर ह्या दोन गोष्टी, आपण बघतो या दोन गोष्टींवर एक नियंत्रण कर्ता आहे.सजीव आणि निर्जीव. तर आपण विचारलं पाहिजे या दोन गोष्टींचा स्रोत कुठे आहे,सजीव आणि निर्जीव. काय स्थिती आहे? श्रीमद्-भागवतात स्थितीचे वर्णन आहे.,

जन्माद्यस्य यथोSन्वयाद् इतरतश्चार्थेषु अभिज्ञः (श्री भ १।१।१)

हे स्पष्टीकरण आहे. सर्व गोष्टींचा मूळ स्रोत अभिज्ञः आहे. कसे? न्वयाद् इतरतश्चार्थेषु. जर मी काही निर्माण केले. मला सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहित आहेत . न्वयाद् प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, मला माहित आहे. जर मी काहीतरी निर्माण... समजा जर मला काही विशेष पाककृती माहित असेल मग मला ती कशी करायची त्याची कृती माहित आहे. ते मूळ आहे. तर ते मूळ श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण सांगतात,

वेदहं समतीतानि (भ गी ७।२६) "मला भूतकाळ ,भविष्यकाळ ,आणि वर्तमान काळ सर्वकाही माहित आहे."
मत्त: सर्वं प्रवर्तते. अहमादिर्हि देवानां (भ गी १०।२) .

निर्मिती सिद्धांतानुसार... सिद्धांत नाही,सत्यस्थिती.ब्रम्हा,विष्णू, महेश्वर. तर या प्रमुख देवता आहेत. विष्णू मूळ देवता आहे. अहमादिर्हि देवानां. निर्मिती, प्रथम महा विष्णू;मग महाविष्णूंपासून गर्भोदकशायी विष्णू. गर्भोदकशायी विष्णूंपासून क्षीरोदकशायी विष्णू, विष्णूंचा विस्तार, आणि त्यांच्यापासून ब्रम्हाचा जन्म. गर्भोदकशायी विष्णूंपासून कमळावरती ब्रम्हाचा जन्म होतो. मग ते रुद्राला जन्म देतात. हे निर्मितीच स्पष्टीकरण आहे. तर श्रीकृष्ण सांगतात अहमादिर्हि देवानां. ते सुद्धा विष्णूंचे मूळ आहेत, शास्त्रावरून आपण म्हणतो,

कृष्णस्तु भगवान् स्वयम् (श्री भ १।३।२८)

मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि श्रीकृष्णांचे पहिले विस्तारित रूप बलदेव आहेत. मग चतुर-व्यूह, वासुदेव,शंकर्षण,अनिरुद्ध,त्याप्रमाणे. मग नारायण. नारायणापासून दुसरे चतुर-व्यूह,आणि दुसऱ्या चतुर-व्याहापासून, शंकर्षण .महाविष्णू. याप्रकारे तुम्ही शास्त्र शिकलं पाहिजे. ते तुम्हाला खरोखरच सापडेल, जस शास्त्रात सांगितलंय,कृष्णस्तु भगवान् स्वयम् आणि श्रीकृष्ण सांगतात,

अहमादिर्हि देवानां (भ गी १०।२)..
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते (भ गी १०।८).

आणि अर्जुन स्वीकारतो, परं ब्रम्ह परं धाम पवित्रं परमं भवान् (भ गी १०।१२).

तर आपण शास्त्र स्वीकारलं पाहिजे. शास्त्र-चक्षुषात:तुम्ही शास्त्राद्वारे पाहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही शास्त्र शिकलात,मग तुम्हाला सापडेल कृष्णस्तु भगवान् स्वयम्. तर ही कृष्णभावनामृत चळवळ म्हणजे मानव समाजापुढे भगवंतांच्या मेहतीचे सादरीकरण करणे. हि कृष्णभावनामृत चळवळ. १९६६ला हि चळवळ सुरु केली. तिची नोंदणी केली. आमच्या रुपानुगा प्रभूंनी आधीच स्पष्ट केले आहे. तर हि चळवळ गंभीरपणे घ्या. त्याच, श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षापूर्वी ऐतिहासिक सुरवात केली. आणि त्यांनी ही चळवळ शिष्य या नात्याने अर्जुनाबरोबर सुरु केली. मग चैतन्य महाप्रभूंनी पाचशे वर्षांपूर्वी, त्यांनी पुन्हा तीच चळवळ पुनरुज्जीवीत केली. ते स्वतः श्रीकृष्ण आहेत. आणि ती चालू आहे. असा विचार करू नका की ही निर्माण केलेली चळवळ आहे.नाही. हि अधिकृत चळवळ आहे आणि अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे.

महाजनो येन गतः स पंथाः (चै च मध्य: १७।१८६).

शास्त्रामध्ये महाजनांचा उल्लेख आहे. तर कृष्णभावनामृत चळवळीत स्थिर रहा आणि श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करा. आपल्याला अनेक साहित्य, अधिकृत साहित्य मिळाले आहे. आणि तुमचे जीवन यशस्वी बनवा.

धन्यवाद.