MR/Prabhupada 0152 - पापी व्यक्ती कृष्ण भावनामृत बनू शकत नाही



Lecture on BG 1.31 -- London, July 24, 1973


कोणीही,प्रत्येकाला

गृहक्षेत्रसुताप्तवित्तै (श्रीमद्-भागवत ५.५.८)

पासून सुखी होण्याची इच्छा असते. गृहस्थ जीवन आणि थोडी जमीन हवी. त्याकाळी कारखाने नव्हते. म्हणून कारखाने म्हणजे नाही. जमीन. जर तुम्हाला जमीन मिळाली,मग तुम्ही तुमचे धान्य पिकवू शकता. पण खरंतर तर आपलं जीवन आहे. इथे या गावात आपण इतकी जमीन रिकामी पडलेली पाहतो. पण ते त्यांचा धान्य पिकवत नाहीत. ते गायीपासून अन्न बनवतात,गरीब गाय तिची हत्या करतात आणि तिला खातात. हे चांगलं नाही. गृह-क्षेत्र. तुम्ही गृहस्थ बना, पण तुम्ही तुमच धान्य जमिनीतून पिकवा, गृह-क्षेत्र. आणि जेव्हा तुम्ही धान्य पिकवल, मग मुलांना जन्म द्या, गृहक्षेत्रसुताप्तवित्तै भारतातील गावात, तिथे अजूनही हि पद्धत आहे, गरीब शेतकऱ्यांमध्ये, की जर एखादा शेतकरी गाय पाळू शकत नसेल तर, तो लग्न करणार नाही. जोरू आणि गोरु. जोरु म्हणजे बायको, आणि गोरु म्हणजे गाय. जर एखादा गाय सांभाळू शकत असेल तर तो बायको सुद्धा सांभाळू शकतो. जोरु आणि गोरु कारण जर त्याने बायको केली, लगेच मुलं होतील. पण जर तुम्ही मुलांना गायीचं दूध देऊ शकला नाहीत तर ती अशक्त,फार निरोगी नसतील त्यांनी पुरेसे दूध प्यायले पाहिजे.

म्हणून गायीला माता मानले जाते. कारण एका आईने मुलाला जन्म दिला, दुसरी आई दूध पुरवत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गायीला आई मानलं पाहिजे, कारण ती दूध पुरवत आहे. तर आपल्या शास्त्रानुसार सात माता आहेत. आदौ माता, माझी आई , जिच्यापासून मी जन्म घेतला आदौ माता ती माता आहे. गुरु-पत्नी, शिक्षकांची पत्नी. ती सुद्धा माता आहे. आदौ माता गुरु-पत्नी, ब्राम्हणी. ब्राम्हण पत्नी. ती सुद्धा माता आहे. आदौ माता, गुरु-पत्नी, ब्राह्मणी, राज पत्नीका, राणी माता आहे. तर किती झाली? आदौ माता,गुरु-पत्नी, ब्राह्मणी, राज-पत्नीका, मग धेनु. धेनु म्हणजे गाय. ती सुद्धा माता आहे. आणि धात्री धात्री म्हणजे सुईण. धेनु धात्री तथा पृथ्वी, पृथ्वी सुद्धा. पृथ्वी सुद्धा माता आहे. सामान्यपणे लोक जिथे त्यांनी जन्म घेतला.त्या जन्मभूमीची काळजी घेत असतात, ते चांगलं आहे. पण त्यांनी गोमातेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पण ते मातेची काळजी घेत नाहीत.

म्हणून ते पापी आहेत. त्यांना दुःख सहन करावे लागेल. त्याना करावे लागेलच. युद्ध,रोगराई,दुष्काळ होणारच. लोक जेव्हा पापी बनतात, लगेच आपोआपच निसर्गाचा कोप होतो. तुम्ही ते टाळू शकत नाही. म्हणून कृष्णभवनामृत चळवळ म्हणजे सगळ्या समस्यांवर उपाय आहे. लोकांना पापी न बनण्याबाबत शिकवतात. कारण एक पापी मनुष्य कृष्णभावनामृत बनू शकत नाही. कृष्णभावनामृत बनणे म्हणजे की त्यांनी त्याची पाप कर्म सोडून दिली पाहिजेत.