MR/Prabhupada 0163 - धर्म म्हणजे देवांनी सांगितलेले कायदे आणि नियम



Lecture on BG 4.3 -- Bombay, March 23, 1974


आयुष्याचे ध्येय घरी परत जाणे, देवाच्याद्वारी परत जाणे. आयुष्याचे ते ध्येय आहे. आपण या भौतिक बद्ध आयुष्यात अडकलो आहोत. आम्ही इतके मूर्ख आहोत, जनवराप्रमाणे, आम्हाला माहित नाही. आम्ही दुःख भोगत आहोत. आम्हाला माहित नाही जीवनाचे ध्येय काय आहे. आयुष्याचे ध्येय ते सुद्धा भगवद् गीतेत वर्णन केले आहे.

जन्ममृत्यूजराव्याधीदुःख दोषानुदर्शनम् (भगवद् गीता 13.9)

केव्हा आपण ते समजणार "जन्म,मृत्यू,जरा व्याधी,याचा पृरावृत्ती करण्याच्या प्रक्रियेची मी अपेक्षा करत नाही..." कोणलाही मरायचं नाही, पण कोणाचं मरण चुकत नाही तो विचार करत नाही की "ही माझी समस्या आहे. मला मारायची इच्छा नाही, पण काहीही केलं तरी मृत्यू होणारच." तर ही समस्या आहे. या समस्येचे निराकरण कसे करावे याची काळजी कोणी घेत नाही. ते फक्त व्यस्त आहेत, मला म्हणायचे आहे,तात्पुरत्या समस्यांमध्ये. तात्पुरती समस्या ही समस्या नाही. वास्तविक समस्या कस मरण थांबवायचं, कसा जन्म टाळायचा , वृद्ध होणे कसे थांबवायचे आणि रोग कसे रोखायचे. ती खरी समस्या आहे. ते शक्य आहे जेव्हा तुम्ही या भौतिक जगातून मुक्त व्हाल . ही आपली समस्या आहे. तर श्रीकृष्ण परत इथे अवतरतात...

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत (भगवद् गीता 4.7)

धर्मस्य ग्लानि: ग्लानी: म्हणजे जेव्हा त्याची हानी होते. तर धर्माच्या नावाखाली तथाकथित धर्म लोक निर्माण करतात. "हा आमचा धर्म आहे." "हा हिंदू धर्म आहे." हा मुस्लिम धर्म आहे." " हा ख्रिश्चन धर्म आहे." किंवा " हा बुद्ध धर्म आहे. आणि "हा शीख धर्म आहे." "हा तो धर्म आहे,हा धर्म आहे..." त्यांनी अनेक धर्म, अनेक धर्म निर्माण केले आहेत. पण खरा धर्म आहे

धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतं (श्रीमद्-भागवत 6.3.19)

धर्म म्हणजे भगवंतांनी,देवांनी सांगितले कायदे आणि नियम. तो धर्म आहे.

धर्माची सोपी व्याख्या धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतं (श्रीमद्-भागवत 6.3.19)

ज्याप्रमाणे राज्याचे कायदे असतात, सरकारने दिलेले. तुम्ही कायदे ठरवू शकत नाही मा हे वारंवार सागितलं आहे. कायदे शासन बनवत. त्याचप्रमाणे भगवंत धर्माची स्थापना करतात. जर तुम्ही देवाचा धर्म स्वीकारलात, तर तो धर्म आहे. आणि देवाचा धर्म काय आहे? तुम्ही उभे असल्यास, तुम्ही इथे उभे रहा. इतर लोक पहात आहेत. देवाचा धर्म आहे... तुम्हाला भगवद् गीतेत सापडेल,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भगवद् गीता 18.66)

हा देवाचा धर्म आहे. "तुम्ही या सर्व धर्मांच्याबाबतीतील खोट्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही भक्त व्हा, मला शरणं या." हा धर्म आहे.