MR/Prabhupada 0170 - आपण गोस्वामींचे अनुसरण केले पाहिजे



Lecture on SB 1.7.8 -- Vrndavana, September 7, 1976


तर संहिता... संहिता म्हणजे वैदिक साहित्य. अशी अनेक दुष्ट आहेत,म्हणतात की " भागवत व्यासदेवांनी लिहिलं नसून, ते कोणी बोपदेव आहेत त्यानी लिहिलं. ते असं सांगतात, मायावादी, निरीश्वरवादी कारण जरी निरीश्वरवादी,किंवा मायावादी नेते शंकराचार्य, त्यांनी भगवतगीतेवर भाष्य लिहिलंय, पण त्यांनी श्रीमद्-भागवताला स्पर्श केला नाही कारण श्रीमद्-भागवतात गोष्टींची रचना इतक्या छानपणे केली आहे. क्रितवानुक्रम्य, की देव निराकार आहे हे मायावादीना सिद्ध करता येणं शक्य नाही. ते तस करू शकत नाहीत. आताच्या दिवसात ते, भागवतं त्यांच्या स्वतःच्या पद्धीतीने वाचतात, पण ते कोणत्याही शहाण्या माणसाला आकर्षित करत नाही. काहीवेळा मी पाहिलंय मोठा मायावादी श्रीमद्-भागवतातील एखादा श्लोक समजावून सांगतो. की "कारण तुम्ही देव आहात, म्हणून तुम्ही खुश झालात, मग देव खुश झाला." हे त्यांचं तत्वज्ञान. "तुम्हाला देवाला निराळं खुश करण्याची गरज नाही. जर तुम्ही मद्यपान करून आनंदी झालात, मग देवही संतुष्ट झाला. हे त्यांचं स्पष्टीकरण. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी ह्या मायावादी टीकेची निंदा केली आहे. चैतन्य-महाप्रभूंनी सांगितलंय,

मायावादी भाष्य सुनीले हय सर्व-नाश (चैतन्य चरितामृत मध्य 6.169)

मायावादी कृष्णेर अपराधी. त्यांनी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणतीही तडजोड नाही. मायावादी, ते श्रीकृष्णांचे अपराधी असतात.

तानहं द्विषतः क्रुरां (भगवद् गीता 16.19),

श्रीकृष्ण सुद्धा सांगतात. त्यांना श्रीकृष्णांबद्दल अतिशय मत्सर असतो. श्रीकृष्ण द्विभुज-मुरलीधर, श्यामसुंदर, आणि मायावादी वर्णन करतात "श्रीकृष्णांना हात नाहीत पाय नाहीत. ह्या सर्व कल्पना आहेत. हे किती आक्षेपार्ह आहे ते त्यांना माहित नाही. पण आपल्यासारख्या लोकांना चेतावणी देण्याकरिता, चैतन्य महाप्रभूंनी स्पष्टपणे सांगितलंय की "मायावादीनकडे जाऊ नका." मायावादी भाष्य सुनीले हय सर्व-नाश. मायावादी हाय कृष्णे अपराधी. हे चैतन्य महाप्रभूंचे विधान आहे. तर तुम्ही खूप सावध असले पाहिजे. कोणत्याही मायावादीनच ऐकू नका. वैष्णवांच्या वेषात अनेक मायावादी आहेत. श्री भक्तिविनोद ठाकुरांनी त्यांचाबद्दल स्पष्टीकरण दिलंय की येई 'ता एका कली-चेला तिलक गले माला, की "हे कलीचे अनुयायी आहेत. जरी त्यांनी नाकावर तिलक आणि गळ्यात माळ घातली, पण तो कली-चेला आहे. जर तो मायावादी असेल, सहज-भजन काछे संगे लय परे बल. तर या गोष्टी आहेत. तुम्ही वृंदावनला आला आहात. सावध रहा अतिशय सावध.

मायावादी भाष्य सुनीले (चैतन्य चरितामृत मध्य 6.169)

इथे अनेक मायावादी आहेत. अनेक तथाकथित तिलक-माला, पण तुम्हाला माहित नाही आत काय आहे. पण महान आचार्य, ते शोधू शकतात.


श्रुती-स्मृती-पुराणादी
पंचरात्री-विधीं विना
ऐकांतिकी हरेर भक्तिर
उत्पातायैव कल्पते (ब्रम्हसंहिता १.२.१०१)

ते केवळ गोंधळ निर्माण करतात. म्हणून आपल्याला गोस्वामींचे अनुसरण केले पाहिजे. गोस्वामींचे साहित्य, विशेषतः भक्तिरसामृतसिंधु, ज्याचे आपण भाषांतर केले आहे. The Nectar of Devotion, तुमच्यापैकी प्रत्येकाने ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे. मायावादी तथाकथित वैष्णवांचे बळी पडू नका. ते खूप धोकादायक आहे. म्हणून असं सांगितलंय

स संहितां भागवतिम कृत्वानुक्रम्य चात्मजा(SB 1.7.8)

हा अतिशय गोपनीय विषय आहे. त्यांनी ते शिकवलं,शुकदेव गोस्वामींना सूचना दिल्या.