MR/Prabhupada 0183 - श्रीयुत घुबड , कृपया डोळे उघड आणि सूर्याला पहा



Lecture on SB 6.1.37 -- San Francisco, July 19, 1975


देव अशी घोषणा करत आहे की "मी इथे आहे.मी आलो आहे "

परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम (भ गी 4.8)

"मी तुझ्यापुढे अवतरित झालो आहे, तुझी पीडा दूर करण्यासाठी" परित्राणाय साधुनाम. "तु मला समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेस , तर मी येथे आहे मी उपस्थित आहे. देव निराकार आहे असा विचार तू का करत आहेस ? मी येथे आहे, कृष्ण रूपात. तू पाहा , माझ्या हातात बासरी आहे. मला गायी खूप आवडतात. मी गायी आणि ऋषी आणि ब्रह्मा प्रत्येकावर समान प्रेम करतो ,कारण ते सर्व वेगवेगळ्या शरीरात असलेली माझी मुलेच आहेत." कृष्ण खेळत आहे. श्रीकृष्ण बोलत आहे. तरीही, हे मूर्ख कृष्णाला समजू शकत नाहीत. मग कृष्णचा दोष काय आहे? तो आमचा दोष आहे. घुबडसारखेच. घुबड कधीही डोळे उघडणार नाही हे पाहण्यासाठी कि सूर्यप्रकाश आहे .

तुम्हाला हे घुबड माहित आहेत ? तर ते उघडणार नाहीत. जरी आपण असे म्हणू की "श्रीयुत घुबड, आपले डोळे उघडा आणि सूर्याला पाहा," "नाही, सूर्य नाहीच आहे . मी पाहू शकत नाही." (हशा) हि आहे घुबड संस्कृती. तर आपल्याला या घुबडांबरोबर लढावे लागते . आपण फार बलवान असू शकता , विशेषतः संन्यासी. आम्हाला घुबडांसोबत लढावे लागते . आम्हाला त्यांचे डोळे बळजबरीने उघडावे लागतात , मशीन वापरून ( हशा) तर हे चालूच आहे. ही कृष्णभावनामृत चळवळ हि सर्व घुबडांच्या विरोधात लढा आहे तर इथे आव्हान केले आहे:

यूयम वै धर्म-राजस्य यदि निर्देश-कारिन: (SB 6.1.38)

निर्देश-कारिन: सेवकांचा अर्थ असा होतो की स्वामींच्या आज्ञांचे पालन करण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून निर्देश-कारिन: ते विवाद करू शकत नाहीत. नाही जे आदेश दिले आहे, त्याचे पालन केले जाते . म्हणून जर कोणी असा दावा केला तर ... तो अपेक्षित करत आहे ... मला वाटतं ... इथे विष्णुदुत यांचा देखील उल्लेख आहे,

वासुदेवोक्त- कारिन:

ते देखील सेवक आहेत. तर उक्त म्हणजे वासुदेवाने जे काही आदेश दिले आहे त्यांचे पालन ते करतात . त्याचप्रमाणे यमदुत, ते यमाराजाचे दास आहेत. त्यांनादेखील संबोधित करतात: निर्देश-कारिन: "तुम्ही जर खरोखरच यमराजाचे सेवक असाल, तर तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करता, मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे " म्हणून ते वास्तविक यमराजाचे प्रामाणिक सेवक आहेत, यात शंका नाही. आता ते याप्रकारे आपली ओळख देत आहेत,

यमदूत उचु: वेद-प्रनिहितो धर्म:

लगेच उत्तर मिळाले. "धर्म काय आहे ?" हा प्रश्न होता.लगेच उत्तर मिळाले. त्यांना माहित आहे धर्म काय आहे. प्रनिहितो धर्म: "धर्म म्हणजे जे वेदांमध्ये स्पष्ट केले आहे." आपण धर्म तयार करू शकत नाही. वेद ,मूळ ज्ञान आहे , वेद म्हणजे ज्ञान , वेदशास्त्र. तर निर्मितीच्या काळापासून, वेद ब्रह्माकडे सोपवण्यात आले होते. वेद, अपौरुशेय, अपौरुशेय; ते उत्पादित केलेले नाही. हे श्रीमद-भागवतममध्ये स्पष्ट केले आहे, तेने ब्रह्मा ह्रद आदि-कवये. ब्रह्मा, ब्रह्मा म्हणजे वेद. वेदाचे दुसरे नाव आहे ब्रह्म , अध्यात्मिक ज्ञान, किंवा संपूर्ण ज्ञान, ब्रह्म. तर तेने ब्रह्मा ह्रद आदि-कवये. तर अध्यात्मिक गुरुकडून वेदांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून असे म्हटले जाते की ब्रह्मा हा पहिला जिवंत प्राणी होता ज्याला वेद समजले. मग त्याला कसे कळले? शिक्षक कुठे होते ? दुसरा कोणताही प्राणी नव्हता . मग वेद कसे समजले? कृष्ण शिक्षक होता, आणि तो प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे .

ईश्वर: सर्व-भूतानाम ह्रद-देशे अर्जुन तिष्ठति(भ गी 18.61)

तर तो हृदयातून शिकवत आहे. तर कृष्ण शिकवतो - तो अत्यंत दयाळू आहे- चैत्य-गुरु च्या रूपात , ह्रदयातून , आणि तो आपला प्रतिनिधी बाहेरून पाठवतो. चैत्य गुरु आणि गुरू, दोन्ही प्रकारे कृष्णच प्रयत्न करत आहेत. कृष्ण खूप दयाळू आहे. म्हणूनच वेद, ते मानवनिर्मित पुस्तके नाहीत. वेद, अपौरुषेय , अपौरुषेय चा अर्थ आहे कि निर्माण न केलेले... आपण वेदांना सामान्य मानसिक अनुमानाने बनवलेले पुस्तक समजू नये . नाही. हे परिपूर्ण ज्ञान आहे. हे सामुर्ण ज्ञान आहे. आणि एखाद्याने ते जसेच्या तसे स्वीकारावे , कोणताही फेरबदल किंवा अर्थ न काढता. तर ते देवद्वारे बोलले गेले आहे . म्हणून भगवद् गीता ही सुद्धा वेद आहे. ती कृष्णाद्वारे बोलली गेली आहे. तर तुम्ही कोणतीही भर किंवा फेरबदल करू शकत नाही.ते जसे आहे तसे आपण घेणे आवश्यक आहे.मग आपल्याला योग्य ज्ञान मिळेल