MR/Prabhupada 0185 - आपण या आकाशीक प्रतिक्रियांमुळे विचलित होऊ नये



Lecture on SB 3.26.35-36 -- Bombay, January 12, 1975


एखाद्या प्रणाली मध्ये अडकून राहू नका . प्रणाली गरजेची आहे , जर आपण सर्वोच्च साक्षात्कार होण्यासाठी प्रगती करत असाल तर . परंतु आपण जर फक्त एका प्रणालीचे अनुसरण केले परंतु सर्वोच्च समजून घेण्याच्या बाबतीत पुढे जात नसू , तर श्रीमद-भागवतमनुसार किंवा वेदिक पद्धतीनुसार, हे केवळ प्रेमाचे श्रम आहे. हे आहे ... याचे काही मूल्य नाही. म्हणून, भागवत सांगते , "ती प्रथम-श्रेणीची धर्मव्यवस्था आहे." मग फरक पडत नाही कि तुम्ही त्याला हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा बुद्ध या नावाने संबोधा . "तो प्रथमश्रेणीचा धर्म आहे जो अधोक्षज प्राप्त करण्यास आपल्याला मदत करतो." अधोक्षज , कृष्णाचे आणखी एक नाव. अधोक्षज म्हणजे असा विषय जो आपण केवळ मानसिक तर्काने समजू शकत नाही. किंवा प्रायोगिक ज्ञानाद्वारे,निरीक्षणाद्वारे प्रात्यक्षिक ज्ञान . त्याला अधोक्षज म्हणतात. अध: क्रतम् अक्षजम ज्ञानम् यत्र . तर अधोक ... आपल्याला त्या अधोक्षज कडे जायचं आहे. ज्ञानाचे वेगवेगळे टप्पे आहेत:

प्रत्यक्ष, परोक्ष, अपरोक्ष, अधोक्षज, अप्राकृत .

तर आपल्याला प्राप्त करायचे आहे अप्राकृत, दिव्य: भौतिक प्रकृतीच्या पलीकडचे. अधोक्षज हे ज्ञानाच्या अगदी जवळच्या खालच्या स्तरावर आहे , प्रत्यक्ष, परोकशापरोक्श . ते कनिष्ट अधिकारात आहे .

अर्चायम एव हरये पूजाम य: श्रद्धयेहते
न तद-भक्तेशु चान्येशु स भक्त: प्रकृत: स्म्रत: (श्री भ 11.2.47)

तर प्राकृत चरण प्रत्यक्ष ज्ञान आहे , प्रत्यक्ष धारणा आहे , आणि ज्ञान जे परम्परेने प्राप्त झाले आहे . प्रत्यक्ष, परोक्ष, मग अपरोक्ष, आत्म - बोध, मग अधोक्षज, अप्राकृत. तर कृष्ण भावनामृत अप्राकृत ज्ञान आहे . हे कृष्णाला जाणून घ्यायचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे , अप्राकृत ज्ञान. तर जोपर्यंत आपण अधोक्षज ज्ञानाच्या स्तरावर आहोत , तो नियंत्रक सिद्धांत आहे . आपल्याला नियंत्रक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले पाहिजे . आणि अप्राकृत ज्ञान परमहंसासाठी आहे. तिथे ... त्याला राग-भक्ती म्हणतात. या चरणांमध्ये, प्रत्यक्ष, परोक्ष,, यांना विधी-भक्ती असे म्हटले जाते. पण विधी-भक्तीशिवाय, आपण राग-भक्तीच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकत नाही, ते आमचे ध्येय आहे. रागानुगा, राग-भक्ति वृन्दावनातल्या भक्तांच्या पावलांचे अनुसरण करून केली जाते. त्याला राग-भक्ती म्हणतात. कृष्णाचे वैयक्तिक सहकारी. कृष्णाचे थेट वैयक्तिक सहकार्य नाही, पण कृष्णाच्या शाश्वत सहकाऱ्यांचे अनुसरण करून ,आपण राग-भक्तीच्या स्तरावर येऊ शकतो. त्याला म्हणतात परा-भक्ती . त्या परा-भक्तीची आवश्यकता आहे.

ब्रह्मा-भूत: प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षती
सम: सर्वेशु भूतेशु मद-भक्तिम लभते पराम (भ गी 18.54)

तर ही कृष्ण भावनामृत चळवळ हळूहळू राग-भक्ती किंवा परा-भक्तीच्या स्तरापर्यंत आपला विकास करण्यासाठी आहे . मग जीवन यशस्वी आहे. अशा प्रकारे आपण या हवेतील गोष्टींमुळे त्रस्त होऊ नये. जसे इथे म्हंटले आहे म्रदुत्वम् कठिनत्वम् च शैत्यम ऊश्नत्वम एव च . आम्ही या गोष्टींमुले अस्वस्थ आहोत . समजा आपण फरशी वर झोपलो आहोत . ते कठिनत्वम् आहे: हे फार कठीण आहे. पण आपल्याला जर एक उशी किंवा चांगली गादी दिली तर ते आहे म्रदुत्वम् . त्याचप्रमाणे, शीतोश्न . पाणी, काहीवेळा खूपच थंड असते आणि कधीकधी खूप गरम असते . पाणी तेच आहे; पण हवेतील व्यवस्थेच्या बदलांनुसार, हे वेगवेगळ्या स्थितीत भिन्न आहे, भिन्न स्थिती. आणि दुःख आणि आनंद यांचा स्रोत आहे हा स्पर्श , त्वचा. त्वचा स्पर्श आहे. म्हणून जर आपण हे पूर्णपणे समजून घेतले की "मी हे शरीर नाही" त्याला साक्षात्काराची गरज आहे ,आत्मअनुभूती .

जितके जास्त आपण अध्यात्मिक चेतनेत विकसित होत जातो तितके अधिक आपण आत्म-स्थ होत जातो . त्याला म्हणतात स्थित-प्रज्ञ . मग आपण विचलित होणार नाही. आणि आपण या परिस्थिनुसार बदलणाऱ्या किंवा हवेतील परिवर्तयामुळे अस्वस्थ न होण्याचा सराव केला पाहिजे. आपण केले पाहिजे कारण आपण इथले नाही आहोत , आपण जीव आत्मा आहोत , अहं ब्रह्मास्मी, माझे या भौतिक व्यवस्थेशी नाते नाही, पण मला त्याची सवय झाली आहे, तर सरावाने मला अध्यात्मिक स्थितीकडे यावे लागेल. आणि सरावात आवश्यक आहे सहिष्णुता . त्याला म्हणतात भजन, साधना किंवा तपस्या, तपश्चर्या, त्याग सहनशीलता. गोष्टी ज्या आपण नाही , परंतु कशा तरी प्रकारे आपण अशा भौतिक गोष्टींशी जोडले गेलो आहोत . आणि पुन्हा सराव करण्यासाठी, आध्यात्मिक व्यासपीठाकडे येण्यासाठी , त्या सहिष्णुतेल म्हणतात तपस्या. हा तपस्याचा अर्थ आहे. ताप म्हणजे 'वेदना. स्वेच्छेने काही वेदना स्वीकारणे.