MR/Prabhupada 0204 - मला गुरूंची कृपा मिळत आहे. हीच वाणी आहे - प्रभुपाद



Morning Walk -- July 21, 1975, San Francisco

प्रभुपाद: तुम्ही दोघांची सांगड घातली पाहिजे. गुरू कृष्ण कृपाय पाय भक्ति लता बीज. (CC मध्य 19.151) दोन्ही, गुरूंची कृपा आणि कृष्णाची कृपा मिळविली पाहिजे. नंतर तुम्हाला मिळेल.

जैअद्वैता: ती गुरू कृपा मिळविण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

प्रभुपाद: कोण?

जैअद्वैता: आम्ही सर्वजण.

प्रभुपाद: हो. यास्य प्रसादात भगवत

प्रसादह: तुम्हाला गुरूंची कृपा मिळाली तर आपोआप श्रीकृष्ण ही मिळतील.

नारायण: गुरूची कृपा गुरूला संतुष्ट केल्यावरच मिळते का, श्रील प्रभुपाद?

प्रभुपाद: अन्यथा कशी?

नारायण: मला माफ करा?

प्रभुपाद: अन्यथा कशी मिळेल?

नारायण: मग त्या शिष्यांचे काय ज्यांना तुम्हाला पाहायची किंवा तुमच्याशी बोलायची संधी मिळाली नाही

प्रभुपाद: ते बोलत असतात, वाणी आणि वपु. जरी तुम्हाला त्यांचे शरीर दिसले नाही तरी त्यांचे शब्द घ्यावे, वाणी.

नारायण: पण त्यांना कसे कळेल की ते तुम्हाला संतुष्ट करीत आहेत, श्रील प्रभुपाद?

प्रभुपाद: तुम्ही जर खरोखर गुरूंच्या आज्ञेचे पालन केले तर ते संतुष्ट झाले असे समजावे आणि जर तुम्ही पालन केले नाही तर ते संतुष्ट कसे होतील?

सुदामा: इतकेचनाही तर तुमची कृपा सर्वत्र पसरली आहे. आणि जर आम्ही त्याचा लाभ घेतला तर, तुम्ही एकदा सांगितल्याप्रमाणे, आम्हाला त्याचा परिणाम जाणून येईल.

प्रभुपाद: हो

जैअद्वैता: आणि जर आम्हाला गुरूंच्या शब्दांवर विश्वास असेल तर आम्ही ते आपोआप करू.

प्रभुपाद: हो माझे गुरू महाराज1936 मध्ये गेले आणि मी हा संघ 1965, तीस वर्षानंतर. मग? मला गुरूंची कृपा मिळत आहे. हीच वाणी आहे. जरी गुरूंची शारीरिक उपस्थिती नसली तरी त्यांच्या वाणीचे पालन केले तर त्यांची मदत मिळेल.

सुदामा: याचा अर्थ असा की जोपर्यंत शिष्य गुरूंच्या आज्ञेचे पालन करीत आहे तोपर्यंत वियोगाचे कारण नाही.

प्रभुपाद: नाही. चखु दान दिलो जेई.... त्याच्या नंतर काय?

सुदामा: चखु दान दिलो जेई जन्मे जन्मे प्रभू सेइ

प्रभुपाद: जन्मे जन्मे प्रभू सेइ. मग वियोग कुठे आहे? ज्यांनी तुमचे डोळे उघडले ते तुमचे जन्म जन्मन्तराचे स्वामी आहेत.

परमहंस: तुम्हाला तुमच्या गुरुंचा तीव्र वियोग जाणवला नाही का?

प्रभुपाद: ते तुम्हाला विचारायची गरज नाही.