MR/Prabhupada 0211 - आपले ध्येय आहे श्री चैत्यन्य महाप्रभूंची इच्छा प्रस्थापित करणे



Lecture on CC Adi-lila 1.4 -- Mayapur, March 28, 1975


श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेशिवाय आपण कृष्ण भावनामृतात उडी मारू शकत नाही. आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्याद्वारे जाणे म्हणजे सहा गोस्वामींद्वारे जाणे. हि परंपरा प्रणाली आहे. म्हणून नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, एइ छाय गोसाई जार तार मुइ दास. ता-सबार पद-रेणु मोर पंच-ग्रास. हि परंपरा प्रणाली आहे. तुम्ही उडी मारू शकत नाही . तुम्हाला परंपरा प्रणालीतून जावे लागेल . तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक गुरुमार्फत गोस्वामींबरोबर संपर्क साधावा लागेल , आणि गोस्वामींच्या माध्यमातून श्री चैतन्य महाप्रभुच्या जवळ जावे लागेल , आणि श्री चैतन्य महाप्रभूंद्वारे तुम्हाला कृष्णाशी संपर्क साधावा लागेल. हा मार्ग आहे. म्हणून नरोत्तम दास ठाकूर म्हणाले , एइ छाय गोसाई जार तार मुइ दास . आपण दासांचे दास आहोत . ती चैतन्य महाप्रभुचे शिक्षण आहे,

गोपी-भर्तु: पद-कमलयोर दास-दासदासानुदास (चै च मध्य 13.80)

तुम्ही जितके जास्त दासाचे दास बनता तितकेच तुम्ही अधिक परिपूर्ण होता आणि जर तुम्हाला अचानक प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्ही नरकात जाणार आहात. बस तसे करू नका. हि श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे. जर तुम्ही सेवक , सेवक , सेवक , यांच्याद्वारे जाल तितकी तुमची अधिक प्रगती होईल . आणि जर तुम्हाला वाटले आता आम्ही गुरु बनलो आहोत , मग तुम्ही नर्काकडे जात आहात . हि प्रक्रिया आहे . दास - दासानुदास: चैतन्य महाप्रभु म्हणाले . तर , सेवक सेवक , सेवक , शंभर वेळा सेवक , म्हणजे आता तो प्रगत आहे . तो कुशल आहे . आणि जो थेट गुरु बनतो , तो नरकात आहे . तर अनार्पित-चरिम् चिरात . तर आपण नेहमीच श्रीला रूप गोस्वामींचे निर्देश ऐकावे . म्हणून आम्ही प्रार्थना करतो , श्री चैतन्य-मनो भीष्ट्म स्थापितम् येन भू-तले . आपले ध्येय आहे , श्री चैतन्य महाप्रभुंची इच्छा पूर्ण करणे . तेच आपले काम आहे .

श्री चैतन्य-मनो अभीष्ट्म स्थापितम् येन भू-तले . श्रीला रूप गोस्वामींनी ते केले . त्यांनी आपल्याला इतकी पुस्तके दिली आहेत . विशेषतः भक्ती -रसामृत-सिंधू , जे आपण इंग्रजीमध्ये भक्तीचे अमृत म्हणून भाषांतर केले आहे भक्तियुक्त सेवेचे विज्ञान समजण्यासाठी . श्रीला गोस्वामींचे हे मोठे योगदान होते , भक्त कसे बनावे . भक्त कसे बनावे . हि एक भावना नाही , हे एक विज्ञान आहे . हि कृष्ण भावनामृत चळवळ मोठे विज्ञान आहे . यद विज्ञान-समन्वितम । जानम् मे परमम् गुह्यम यद विज्ञान समन्वितम. हि केवळ एक भावना नाही तुम्ही याला एक भावना म्हणून समजाल, तर तुम्ही गोंधळ निर्माण कराल . रूप गोस्वामींचे तसे निर्देश आहेत . ते म्हणाले ,

श्रुति-स्म्रति-पुराणादि
पंचरात्रिकि-विधिम- विना
एकांतिकि हरेर भक्तिर
उत्पातायैव कल्पते ( भ र सि १।२।१०१)