MR/Prabhupada 0224 - तुमच्या मोठ्या इमारतीची निर्मिती, एका दोषपूर्ण पायावर



Arrival Address -- Mauritius, October 1, 1975

तत्वज्ञान एक मानसिक तर्क नाही. तत्वज्ञान हे मुख्य ज्ञान आहे जे इतर सर्व विज्ञानाचे स्रोत आहे. ते तत्वज्ञान आहे. म्हणून आमचे कृष्णभावनामृत आंदोलन लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या विज्ञानाच्या विज्ञानावर सर्व प्रथम आपण समजू की "आपण काय आहोत? तुम्ही हे शरीर आहात किंवा या शरीरापासून भिन्न आहात? हे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही तुमची मोठी इमारत निर्माण करत असाल, दोषपूर्ण पायावर, मग ती राहणार नाही. तिथे धोका असेल. तर आधुनिक संस्कृती या दोषपूर्ण कल्पनांवर आधारित आहे की "मी हे शरीर आहे." "मी भारतीय आहे," "मी अमेरिकन आहे," "मी हिंदू आहे," "मी मुस्लिम आहे," "मी ख्रिश्चन आहे." या सर्व जीवनाच्या शारीरिक संकल्पना आहेत. "कारण मला हे शरीर ख्रिश्चन आई आणि वडिलांकडून मिळाले आहे, म्हणून मी ख्रिश्चन आहे." पण मी हे शरीर नाही. "कारण मला हे शरीर हिंदू आई आणि वडिलांकडून मिळाले आहे, म्हणून मी हिंदू आहे." पण मी हे शरीर नाही.

म्हणून आध्यात्मिक समजासाठी, समजून घेण्यासाठी हे मूलभूत तत्व आहे, की "मी हे शरीर नाही; मी आत्मा आहे," अहं ब्रम्हास्मि. हि वैदिक सूचना आहे: "समजण्याचा प्रयत्न करा की तुम्ही आत्मा आहात; तुम्ही हे शरीर नाही." हे समजून घेण्यासाठी योग प्रणालीचा सराव केला जातो. योग इंद्रिय संयमः इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन, विशेषतः मन… मन मालक आहे किंवा इंद्रियांचे मुख्य आहे. मनः-षष्ठानीन्द्रियाणि प्रकृती-स्थानि कर्षति (भ.गी. १५.७) |आपण मन आणि इंद्रियांसह अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहोत, चुकीच्या संकल्पनेमुळे की हे शरीर म्हणजे आपण स्वतः आहोत. म्हणून जर आपण आपले मन इंद्रिय नियंत्रित करून एकाग्र केले, तर आपण हळूहळू समजू शकतो. ध्यानावस्थिततग्दतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः(श्रीमद भागवतम १२.१३.१) | योगी, ते परम व्यक्ती, विष्णूवर ध्यान करतात. आणि त्या प्रक्रियेद्वारे ते स्वतःला जाणतात. आत्मसाक्षात्कार जीवनाचा मुख्य उद्देश आहे. तर आत्मसाक्षात्काराची सुरवात हे समजण्यापासून आहे की "मी हे शरीर नाही; मी आत्मा आहे." अहं ब्रह्मास्मि.

तर या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे भगवद् गीतेत स्पष्ट केल्या आहेत. जर आपण योग्य मार्गदर्शना खाली काळजीपूर्वक केवळ भगवद् गीता वाचली, तर सर्वकाही स्पष्ट होईल, कोणत्याही अडचणी शिवाय, की "मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. माझे काम जीवनाच्या या शारीरिक संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. हे शरीर म्हणजे मी स्वतः आहे हे स्वीकारून मी कधीही सुखी होणार नाही हे ज्ञान चुकीच्या आधारावर आहे." अशाप्रकारे, जर आपण प्रगती केली, तर आपण समजू शकू, अहं ब्रह्मास्मि: "मी आत्मा आहे." मग मी कुठून आलो आहे? सर्वकाही भगवद् गीतेत वर्णन केले आहे, की आत्मा, श्रीकृष्ण सांगतात, भगवंत सांगतात, ममैवांशो जीव-भूतः (भ.गी. १५.७) "हे जीव, ते माझे अंश, किंवा ठिणगी आहेत." जसे मोठी आग आणि छोटी आग, दोन्ही आगच आहेत, पण मोठी आग आणि छोटी आग… जिथपर्यंत अग्नीच्या गुणवतेचा संबंध आहे भगवंत आणि आपण एकच आहोत. तर आपण समजू शकतो, आपण आपल्या स्वतःचा अभ्यास करून भगवंतांचा अभ्यास करु शकतो. ते देखील निराळे ध्यान आहे. पण ते परिपूर्ण असेल जेव्हा आपण ते समजू जरी गुणवत्तेत मी एक भगवंतांचा नमुना आहे किंवा समान गुणवत्तेचा, पण तरीही, ते महान आहेत, मी छोटा आहे." ती परिपूर्ण समज आहे.

अणु, विभू; ब्रम्हन,पर-ब्रह्मन; ईश्वर, परमेश्वर - हि एकदम परिपूर्ण समज आहे. कारण मी गुणात्मकरीत्या एक आहे, याचा अर्थ असा नाही की मी परम आहे. वेदामध्ये असे सांगितले आहे, नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां (कथा उपनिषद २.२.१३). आपण नित्य, शाश्वत आहोत; भगवंत देखील शाश्वत आहेत. आपण जीव आहोत; भगवान देखील एक जीव आहेत. पण ते जीवनाचे मुख्य आहेत; ते मुख्य शाश्वत आहेत. आपण देखील शाश्वत आहोत, पण आपण मुख्य नाही. का? एको यो बहुनां विदधाति कामान. ज्याप्रमाणे अपल्याला एका नेत्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे ते सर्वोच्च नेता आहेत. ते पालक आहेत. ते सर्वदर्शी आहेत. ते प्रत्येकाच्या गरजा पुरवतात. आपण पाहू शकतो की आफ्रिकेतील हत्ती. त्यांना अन्न कोण पुरवतो? तुमच्या खोलीतील भोकात लाखो मुंग्या आहेत. त्यांना कोण खायला घालत आहे? एको यो बहुनां विदधाति कामान तर अशा प्रकारे, जर आपण स्वतःला समजू शकलो, तो आत्मसाक्षात्कार आहे.