MR/Prabhupada 0226 - भगवंतांचे नाव वैभव, कार्य, सौंदर्य, आणि प्रेमाचा प्रचार



Lecture -- Los Angeles, May 18, 1972

वास्तवात , कृष्ण या भौतिक जगात नाही . ज्याप्रमाणे एक मोठा माणूस, त्याचा कारखाना चालत असेल, त्याचा धंदा चालत असेल, पण तो तिथे उपस्थित असणे आवश्यक नाही. त्याचप्रमाणे त्यांची शक्ती काम करीत आहे, त्यांचे सहाय्यक त्यांचे अनेक देवता, ते काम करीत आहेत. शास्त्रात त्यांचे वर्णन आहे. सूर्याप्रमाणे. सूर्य व्यावहारिक कारण आहे या भौतिक वैश्विक प्रकटीकरणाचा, याचे वर्णन ब्रम्हसंहितेत आहे. यच्चाक्षुरेश सविता सकल ग्रहणांम राजा समस्त-सूर-मूर्तिर अशेषतेजा: यस्याज्ञया ब्रह्मती संभृत-काल-चक्रो गोविन्दम आदि पुरुषं तम् अहं भजामी गोविंद… सूर्याचे वर्णन आहे, भगवंतांचा एक डोळा. ते सर्वकाही पाहत आहेत. तुम्ही स्वतःला लपवू शकत नाही भगवंतांच्यापासून, जसे तुम्ही सूर्यप्रकाशापासून स्वतःला लपवू शकत नाही. तर, अशाप्रकारे, भगवंतांचे नाव, कोणतेही नाव असू शकते… आणि ते वैदिक साहित्यात स्वीकारले आहे की भगवंतांना अनेक नावे आहेत, पण हे कृष्ण नाव हे मुख्य नाव आहे. मुख्य. मुख्य म्हणजे प्रमुख. आणि हे खूप चांगल्याप्रकारे वर्णन केले आहे: "सर्व -आकर्षक." अनेक प्रकारे ते सर्व-आकर्षक आहेत.

तर भगवंतांचे नाव… कृष्णभावनामृत आंदोलन भगवंनतांच्या नावाचा प्रचार करीत आहे, भगवंतांचे वैभव, भगवंतांचे कार्य, भगवंतांचे सौंदर्य, भगवंतांचे प्रेम सर्वकाही. जश्या आपल्याला या भौतिक जगात अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, त्या सर्व, त्या श्रीकृष्णांमध्ये आहेत. जे काही तुम्हाला मिळाले आहे. जसे इथे या भौतिक जगात प्रमुख आकर्षण लैगिक आकर्षण आहे. तर ते श्रीकृष्णांमध्ये आहे. आपण राधा आणि श्रीकृष्णांची पूजा करतो. आकर्षण. पण ते आकर्षण आणि हे आकर्षण समान नाही. ते खरे आहे आणि इथे ते असत्य आहे. आपण देखील सर्वकाही अनुभवत आहोत जे आध्यात्मिक जगात हजर आहे, पण ते फक्त प्रतिबिंब आहे, त्याला वास्तविक मूल्य नाही. ज्याप्रमाणे शिंप्याच्या दुकानात, काहीवेळा अनेक सुंदर बाहुल्या असतात, सुंदर मुलगी उभी आहे. पण कोणीही तिच्याकडे पाहत नाही. कारण प्रत्येकाला माहित आहे की "ती खोटी आहे. ते कितीही सुंदर असले तरी, ती खोटी आहे." पण एक जिवंत महिला, जर ती सुंदर आहे, तर अनेक लोक तिच्याकडे पाहतात. कारण ती खरी आहे. हे एक उदाहरण आहे.

इथे तथाकथित जिवंत देखील मेलेले आहे, कारण शरीर भौतिक पदार्थ आहे. ते पदार्थाचा तुकडा आहे. जेव्हा त्या सुंदर स्त्रीचा आत्मा निघून जातो, कोणीही तिला पाहायला उत्सुक नसते. कारण ती शिंप्याच्या दुकानातील खिडकीतील बाहुली प्रमाणेच आहे. तर वास्तविक घटक आत्मा आहे, आणि कारण इथे सर्वकाही मृत पदार्थापासून बनले आहे, म्हणून ते केवळ अनुकरण, प्रतिबिंब आहे. वास्तविक गोष्टी आध्यात्मिक जगात आहेत. एक आध्यात्मिक जग आहे. ज्यांनी भगवद्-गीता वाचली आहे, ते समजू शकतात. आध्यात्मिक जगाचे वर्णन त्यामध्ये आहे: परस्तस्मात्तु भावो अन्यो अव्यत्त्को अव्यत्त्कत्सनातनः (भ.गी. ८.२०) | भावः म्हणजे प्रकृती. या प्रकृती व्यतिरिक्त अजून एक प्रकृती आहे. आपण हि प्रकृती आकाशाच्या मर्यादेपर्यंत पाहू शकतो. वैज्ञानिक, उच्च ग्रहापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या मोजण्यानुसार चाळीस हजार वर्षे लागतील. तर कोण चाळीस हजार वर्षे जगेल, जाईल आणि परत येईल? पण तिथे ग्रह आहे. तर आपण या भौतिक जगाची लांबी आणि रुंदी मोजू शकत नाही, आध्यात्मिक जगाबद्दल काय बोलणार. म्हणून आपल्याला अधिकृत सूत्रांकडून माहित असले पाहिजे. की अधिकृत स्रोत श्रीकृष्ण आहेत. कारण आम्ही आधीच वर्णन केले आहे की श्रीकृष्णांपेक्षा कोणीही अधिक बुद्धिमान किंवा ज्ञानी नाही.

तर कृष्ण हे ज्ञान देतात, की परस्तस्मात्तु भावो अन्यो (भ.गी. ८.२०) "भौतिक जगाच्या पलीकडे एक आध्यात्मिक आकाश आहे." तिथे अनेक ग्रह आहेत. आणि ते आकाश या आकाशाच्या तुलनेत खूप मोठे आहे. हे केवळ एक चतुर्थांश आहे. आणि आध्यात्मिक आकाश तीन-चतुर्थांश आहे. ते भगवद्- गीतेत वर्णन केले आहे, एकांशेन स्थितो जगात (भ.गी. १०.४२) हे भौतिक जग फक्त एक चतुर्थांश आहे, तर आध्यात्मिक जग तीन-चतुर्थांश आहे. समजा भगवंतांची निर्मिती शंभर टक्के आहे. हि फक्त पंचवीस टक्के आहे; पंच्यात्तर टक्के तिकडे आहे. त्याचप्रमाणे, जीव देखील, जीवांचा खूप लहान आंशिक भाग इथे आहे. आणि तिथे, आध्यात्मिक जगामध्ये, मोठा भाग तिथे आहे.